Dictionaries | References

जाग

   
Script: Devanagari

जाग     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : जागरण

जाग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
from populousness, during festivities &c.: also the constant presence and watchfulness of an animal in any place. Ex. त्या रानांत वाघाची जाग होती तों गुरें जात नसत; घरांत मांजराची जाग असली म्हणजे उंदीर भितात.

जाग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Waking. The bustling, stirring, swarming, animated state (of a house; village &c.) from populousness, during festivities &c.: also the constant presence and watchfulness of an animal in any place.

जाग     

ना.  जागृती , झोपेतून उठणे , निद्रा समाप्ती ;
ना.  सावध , हालचाल .

जाग     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : चाहूल, जागृतावस्था

जाग     

 पु. ( कों . ) १ ( कुण . ) मृताच्या दहाव्या किंवा बाराव्या रात्रीं केलेलें जाग्रण . अंगात येऊन आपल्या मरणाचें कारण सांगावें , पुरलेल्या पैशाची जागा दाखवावी किंवा आपल्या गुप्त गोष्टी सांगाव्या म्हणून त्याच्या कुटुंबांतील माणसें जाग्रण करितात ; यावेळीं चार देवझाडें मिळवून वाद्यादि पूर्वक समारंभ करतात . - स्त्री . १ जागृतावस्था ; जागरण . ( क्रि० होणें ; येणें ). २ ( राजा . ) हालचाल ; गडबड ; गजबज . ( घर , खेडेगांव यांतील ) ३ गर्दी ; गोंगाट ( दाट वस्तींतील , जत्रेंतील ). ४ कोणत्याहि प्राण्याची एखाद्या जागेंतील सतत वस्ति ; पाहरा ; वचक बसण्याजोगें अस्तित्व . त्या रानांत वाघाची जाग होती म्हणून गुरें जात नसत . घरांत मांजराची जाग असली म्हणजे उंदरांचा उपद्रव होत नाहीं . ५ वस्ती . यवतेश्वराच्या डोंगरावर मनुष्याची जाग असल्यामुळें तो डोंगर न चढतां ... - स्वप ३६४ . ६ ( गो . ) चाहूल . [ सं . जागृ ] सामाशब्द -
०माग  स्त्री. जाग अर्थ ४ पहा . जागणा - वि . जागा ; जागृत . जागता - वि . १ जागरूक ; सावध ; दक्ष २ शक्ति , गुण आणि सामर्थ्य यांनीं युक्त ; तात्काल फलदायी ; उपासकाला पावणारी ( देवाची मूर्ति , मंत्र - तंत्र , औषध ) या गांवचा देव असा जागता आहे कीं , तत्काल धावण्यास पोंचतो . मंत्र जागता असला तर तत्काल विष उतरेल . ३ तजेलदार ; तेजस्वी ; टवटवी असणारा ; ज्याची सुधारणा आणि रक्षण काळजीपूर्वक होतें असा ; संस्कृतिसंपन्न ; सुस्थितीनें युक्त ( धर्म , विधि , चाल ) ४ तरतरीत जोमदार ( मन , बुध्दि इ० ). ५ ताजेंतवानें न गंजलेलें ; मलिन नसलेलें ( मिळविलेलें ज्ञान ). ६ लोकांच्या डोळयांपुढें असणारा व ज्याची लोकांना नेहमीं आठवण होते असा ; अविस्मृत ( मेलागेला माणूस , गोष्ट , प्रसंग ). जागतीजोत - स्त्री . जागता अर्थ २ पहा . कडक ; सामर्थ्यानें युक्त अशी देवी , देव मंत्र , औषध सद्य : परिणामी तात्काल फलदायी गोष्ट ; खडखडीत दैवत ; रामबाण औषध , ( पुष्कळ देवस्थानांतून कांहीं विशिष्ट प्रसंगीं मूर्तीच्या अंगांतून ज्योत बाहेर पडते व म्हणून देवत्व नष्ट झालें नसून अद्याप आहे असें मानतात ). जागती जोती काढिली हनुमान रूपें । - सप्र . ३ . ४२ . [ जागती + ज्योत ] जागतीझोंप , जागती निद्रा - स्त्री . १ गाढ नसलेली झोंप ; थोडीशी चाहूल लागतांच जाग येते अशी झोंप . २ डुलक्या घेणें ; पेंगणें .
०भाषा  स्त्री. प्रचलित भाषा ; जिवंत भाषा . संस्कृत जागती भाषा नाहीं . जागणें - अक्रि . १ जागत राहणें ; सावध राहणें ; लक्ष ठेवणें . २ निजून उठणें ; जागे होणें , असणें ; झोंप न घेणें , टाकून देणें . सूर्य देखोनि उदयाचळीं । जागिन्नले समस्त । - मुआदि २९ . १३० . ३ पाहरा करणें ; सावधगिरी ठेवणें ४ लक्ष देणें ; दख्खल ठेवणें ; काळजी घेणें ( धंदा , नोकरी , इनाम , शपथ , वचन यांची ) त्यानें वचन दिलें होतें पण त्यास तो जागला नाहीं ५ ताजें असणें ; म्हटल्यावेळीं तयार असणें ; आठवणें ; कायम राहणें ; स्मरणें ( अभ्यासिलेलें शास्त्र इ० ). व्यासंगानें श्रुत जागे । - लेलेशास्त्री . म्ह० १ सारी रात्र जागली आणि शेंगावांगीं रांधली = व्यर्थ श्रम आणि प्रयत्न . २ जागेल त्याची वांठ आणि निजेल त्याला टोणगा . [ सं . जागृ - जागरण ] जागर , जागरण - पुन . १ जागेपणा जागृतावस्था . ल पोरांचे गडबडीमुळें रात्रीस चारी प्रहर जागर पडला . २ निद्रा संयमन ; देखरेख पाहरा . ३ पोवती ( नारळी , श्रावणशुध्द ) पौर्णिमा . ४ देवतेच्या उद्देशानें विवक्षित कालपर्यंत जागण्याचा प्रकार . नवरात्रामध्यें देवाजवळ कथा करून कालचें नाटक . ६ पुनरावृत्ति ; उजळणी करणें ; नवें , ताजें करणें ( वेदघोषानें मंत्र ). मंत्रजागर [ सं . जागृ . ]
०घालणें   ( माण . ) खंडोबाच्या नांवानें वाघ्यामुरळया आणून त्यांची पूजा करून त्याना जेवावयाला घालून नाचविणें जागरा - वि . १ भारी जागणारा . २ जागा राहणारा ; दक्ष ; सावध . जागरूक - वि . १ जागता पहा . २ स्पष्ट ; उघड ; टिकाऊ तोंडावर फेंकता येण्याजोगा ( पुरावा ). ३ जागरणशील . जागरें - न . जागृति ; जागेपण . नीद मारूनि जागरें । नांदिजे जेंवि । - अमृ . ४ . १ . जागल - स्त्री . १ पहारा ; राखण ; सावधानता . २ पहारेकर्‍याचा पगार . ३ जागरण ; जागृतावस्था . मला रात्रीं जागल घडली . जागलकी - स्त्री . जागल्याबद्दलची मजुरी ; राखणावळ . गांवांत घोडें , गाढी मुक्कामाला रात्रीं राहिली तर महार जागले अर्धा आणा जागलकी घेतात . - गांगा ९७ . जागल्या , जागळया - पु . पहारेकरी ; रखवालदार ; प्रवाश्यांच्या सामानावर पाहरा करणारा खेडयांतील महार ; रामोशी . जागवणें , जागविणें - उक्रि . १ जागें , जागृत करणें , ठेवणें ; जागें राहून काळ काढणें . २ पहारा करणें ; नजर ठेवणें . ३ ( सामा . ) राखणें ; पाळणें ; ठेवणें , वाक्यरचनेंत याचा पुष्कळ शब्दांशी जोडून उपयोग करितात . जसें - अब्रू - नाम - नांव जागविणें = अब्रू , नांव सांभाळणें ; शील राखणें . दिवस जागविणें = दिवस राखणें ; त्या दिवशीं जें कर्तव्य , जे विधी करावयाचे असतील ते करणें . नियम - नेम - जागविणें = स्वत : चा नेम , चाल राखणें ; चालविणें . सती जागविणें = सतीची चिता प्रज्वलित ठेवणें , विझूं न देणें . गौर जागविणें = गौरीला , देवीला जागविणें ; रात्रभर गौरीप्रीत्यर्थ जागरण करणें . जागसूद - वि . ज्याची झोंप चटकन उघडते असा ; चटकन जागा होणारा . २ जागता ; सावध . तूं जागसूद ऐस मी निजतों . ३ सावध , गाढ नसलेली ( झोंप ).

Related Words

जाग   जाग येवप   जाग हाडपी   vigil   शेळकुंडाची आग व पिलाची जाग   चिंता करी राग, तेव्हां आत्‍मा धरी जाग   waking   trampling   awake   trample   come alive   waken   wake up   awaken   arouse   wake   watch   उलव   जागमाग   भूंक   जागप   जागें   जागोवपी   झोपमोड   मोठें पोट आईजवळ आणि अवघड झोंप नवर्‍याजवळ   अड़ोसी-पड़ोसी   झुंजूमुंजू   चरमराहट   पाय पसरणें   alert   watchful   किलबिल   कुलबुलाहट   roused   चुळबुळ   कुंडमंडप   घणघणाट   जागना   आहट   चेव   फडफड   मचान   जागृत   धर्मगुप्त   धृतराष्ट्र   ध्रुव   भीमसेन   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP