|
स्त्री. १ समुदाय ; लवाजमा ; परिवार ; इतमाम . २ स्वारी ; मिरवणूक ( राजा किंवा देव यांची , यांत कोतवाली घोडे , ईटवाले , बोथाटीवाले , बंदुकवाले , भालाईत , सांगवाले , आणि बाणाईत असे सहा प्रकारचे लोक असतात , शिवाय कोतवाली घोडेहि असतात ). श्रीमंताची भेट घेतली जिलीब चाले मोहरें । - ऐपो २८६ . [ फा . जिलव , जिलबी ] ०दार पु. जिलीबमधील माणूस ; नोकर ; हुजर्या . ०हुद्दे पुअव वरील ईट इ० सहा प्रकारचीं शस्त्रें धारण करणारे हुद्देदार . जिलवीस - क्रिवि . स्वारींत पुढें . जिलवीचा घोडा - पु . कोतवाली घोडा .
|