|
स्त्री. १ थांबविलेली , आटोपून धरलेली स्थिति ; ( होडी इ० ची ); थोपवून धरणे . २ पाण्याची थाप ; धक्का ; बंधारा . मुक्काम ; टप्पा ; विरामस्थान . ह्या डोंगरात चढताना तीन थोपी घ्याव्या लागतात . ४ मुक्कामाचे कारण . ५ ( ल . ) शेवट ; सीमा ; मर्यादा . ( क्रि० राखणे ; संभाळणे ; टाळणे ; टळणे ). ६ घट्ट उभे राहणे ; दम धरुन असणे ; जागा संभाळणे . ( क्रि० राखणे , ठेवणे ; धरणे ; संभाळणे ; बुडविणे ; बुडणे ; नाश करणे , होणे ). आणीबाणीची वेळ , पत सांभाळणे ; अब्रूचे जतन . एवढ्या रुपयांनी माझी थोप धरली . [ ध्व . सं . स्था ] थोपटणे - सक्रि . १ थापटणे ; हळू हळू थापडणे . २ फुस लावणे ; थापटून , गोंजारुन वश करणे . [ सं . स्फोटनं ] ०टीव वि. थोपटून आकार आणलेले , घडलेले ( मडके , मातीचे चित्र , पोळी , गोंवरी इ० ). ( वाप्र . ) थोप राखणे ठेवणे धरणे पूर्वस्थितीत चालविणे , राखणे , संभाळणे ( राज्य , संस्था , मनुष्य , पशु , वस्तु ).
|