|
पु. १ धोंडा ; फत्तर ; शिला ; शस्त्रावांचून सामान्य प्रयत्नांनी फुटत नाही व पाण्याने विरघळत नाही असा पृथ्वीचा अवयवभूत पदार्थ . २ न्हावी लोकांचा वस्तर्यास धार लावण्याचा दगड ; निष्णा . - स्त्री . मोठा खडक ; शिला . हा शब्द आणि या दर्जाचे इतर शब्द उ० दगडमाती , धोंडा , माती , कपाळ इ० शब्द , जेव्हां एखाद्या माणसाची बुद्धि , ज्ञान , मालमत्ता वगैरे कुचकामाची आहे असे दाखवावयाचे असते तेव्हा उपयोगांत आणतात . जसेः - त्याला काय येते दगड ! त्यापाशी काय आहे माती . - वि . ( ल . ) अज्ञ ; अडाणी ; मूर्ख ; मंद बुद्धीचा ( माणूस ). बोधुनि दगडासी कां न भागावे । - मोउद्योग ११ . ७७ . [ सं . दृषद ; का . दक्कड = मजबूत ] ( वाप्र . ) ०उचकणे ( ल . ) एखाद्यावर तुफान रचणे ; एखाद्याविरुद्ध मसलत करणे . ०उचलणे घेणे हाती घेणे फेकणे मारणे , दगडमार करणे ( ल . ) रागाने वेडावून जाणे ; बेफाम रागावणे . दगड खाऊन दगड जिरविणे ( कर . ) अतिशय सशक्त किंवा प्रखर कोठ्याचा असणे . ०चहूकडे पाहणे - प्रत्येक उपाय अथवा युक्ति योजून पाहणे ; सर्व दिशांनी प्रयत्न करणे . टाकून पाहणे - प्रत्येक उपाय अथवा युक्ति योजून पाहणे ; सर्व दिशांनी प्रयत्न करणे . ०टाकून पहाणे - घेणे - तळ शोधणे अथवा खोली काढण्याचा प्रयत्न करणे ; खुबीदार प्रश्न विचारुन दुसर्याच्या मनांतील विचारांची अटकळ करणे . दगडन धोंडे - ( बायकी ) सटरफटर क्षुद्र गोष्टी . दगडाखाली हात सांपडणे - गुंतणे - कांही दुःखकारक अडचणींत , पेंचात , नुकसानकारक कामांत , सांपडणे . दगडा खालून हात काढून घेणे - अडचणींच्या कामांतून स्वतःस युक्तीने मोकळे करुन घेणे . दगडाचा दोर होत नाही - भलत्याच वस्तूपासून भलत्याच वस्तूची अपेक्षा करणे या अर्थी . दगडाची साल काढणे , दगडाचा दोर काढणे - दुष्कर , अद्भुत किंवा अशक्य गोष्ट करणे . दगडाचे नांव धोंडा धोंड्याचे नाव दगड - जेव्हा एखादी गोष्ट इतकी स्पष्ट असते की तिच्या संबंधाचा वाद फुकट असतो अशा प्रसंगी योजतात . दगडापरीस ईट , वीट मऊ - ( हाल , अपेष्टा इ० ) दोन स्थितींची , गोष्टींची तुलना करुन त्यांतल्या त्यांत एक बरी असे दर्शविणे ; निरुपाय म्हणून मोठ्या संकटापेक्षा लहान संकट पत्करणे . दगडाशी गांठ पडणे - कठोर , गळग्रह अथवा न देते कूळ इ० कांच्या तावडीत सांपडणे . दगडाशी भांडणे - बलाढ्य शत्रु , मोठी अडचण , कठिण काम इ० कांशी झगडणे . दगडास पाझर आणणे - येणे - फुटणे - निघणे , दगडास पान्हा आणणे - नैसर्गिक नडी , अडचणी न जुमानतां आपले हेतु सिद्धीस नेणे ; कठिण हृदयाच्या अथवा कंजूष मनुष्यास द्रव आणणे ; अशक्य गोष्ट घडवून आणणे ; दगडापासून दूध काढणे . सामाशब्द - ठाव पहाणे - घेणे - तळ शोधणे अथवा खोली काढण्याचा प्रयत्न करणे ; खुबीदार प्रश्न विचारुन दुसर्याच्या मनांतील विचारांची अटकळ करणे . दगडन धोंडे - ( बायकी ) सटरफटर क्षुद्र गोष्टी . दगडाखाली हात सांपडणे - गुंतणे - कांही दुःखकारक अडचणींत , पेंचात , नुकसानकारक कामांत , सांपडणे . दगडा खालून हात काढून घेणे - अडचणींच्या कामांतून स्वतःस युक्तीने मोकळे करुन घेणे . दगडाचा दोर होत नाही - भलत्याच वस्तूपासून भलत्याच वस्तूची अपेक्षा करणे या अर्थी . दगडाची साल काढणे , दगडाचा दोर काढणे - दुष्कर , अद्भुत किंवा अशक्य गोष्ट करणे . दगडाचे नांव धोंडा धोंड्याचे नाव दगड - जेव्हा एखादी गोष्ट इतकी स्पष्ट असते की तिच्या संबंधाचा वाद फुकट असतो अशा प्रसंगी योजतात . दगडापरीस ईट , वीट मऊ - ( हाल , अपेष्टा इ० ) दोन स्थितींची , गोष्टींची तुलना करुन त्यांतल्या त्यांत एक बरी असे दर्शविणे ; निरुपाय म्हणून मोठ्या संकटापेक्षा लहान संकट पत्करणे . दगडाशी गांठ पडणे - कठोर , गळग्रह अथवा न देते कूळ इ० कांच्या तावडीत सांपडणे . दगडाशी भांडणे - बलाढ्य शत्रु , मोठी अडचण , कठिण काम इ० कांशी झगडणे . दगडास पाझर आणणे - येणे - फुटणे - निघणे , दगडास पान्हा आणणे - नैसर्गिक नडी , अडचणी न जुमानतां आपले हेतु सिद्धीस नेणे ; कठिण हृदयाच्या अथवा कंजूष मनुष्यास द्रव आणणे ; अशक्य गोष्ट घडवून आणणे ; दगडापासून दूध काढणे . सामाशब्द - ०खाण णी स्त्री . दगडांची खाण . ०घाशा वि. १ हेंगाडा ; रानटी अडाणी ; अकुशल ( न्हावी , कारागीर इ० ). २ ओबडधोबड , वाईट आकाराचा ( जिन्नस ). ०घाशी स्त्री. १ कठिण , श्रमाचे काम . २ ( माण . ) दळण्याचे काम खेरीजकरुन इतर काम न ऐकणारी स्त्री . - वि . श्रमदायक , कष्टकारक , कठिण व दुःखदायक ( काम ). २ कष्टाळू ; हटून , तटून , झटून मेहनत करणारा ; उद्योगी . ३ त्रासदायक रीतीने हट्ट करणारा ; आग्रही घासाघिश्या . [ दगड + घासणे ] दगडचौथ , दगडीचौथ स्त्री . गणेशचतुर्थी . ( या दिवशी जर चंद्र पाहिला तर चोरीचा आळ येतो म्हणून तो टाळण्यासाठी दुसर्यांच्या घरावर दगड फेकण्याची जुनी पद्धत होती यावरुन रुढ ). ०छाप पु. शिळाछाप ; लिथोग्राफ या इंग्रेजी शब्दास प्रतिशब्द ; ते यंत्र ; किंवा लिहिण्याची तसली तर्हा . ०तळी स्त्री. उचलून दुसरीकडे नेतां येण्याजोगे दगडाचे भांडे ; दगड कोरुन तयार केलेले ताट , वाटी , दगडी ( कढी इ० पातळ पदार्थ ठेवण्याची ). ०पोळ स्त्रीन . ( चुना , माती विरहित ) नुसत्या दगडांची घातलेली भिंत , गडगा . [ दगड + पोळी ] ०पोळे न. नकली अथवा खोटे पोवळे . ०फूल न. पावसाळ्यामध्ये दगडांवर ( अथवा लांकडावर ) उगवणारी पांढरी वनस्पति . हिचा औषधांत व मसाल्यांत उपयोग करतात . रंग पांढराकाळा मिश्र असतो . [ सं . गिरीपुष्पक ; हिं पत्थर का फूल ; बं . शैलेज ; गुज . पत्थरफूल ; तेलगु - शैलेयमनेदव्यभु ; फा . दहाल ] ०फोड स्त्री. कठिण ; अवघड ; दुःखदायक श्रमाचे ( काम ). २ परिश्रमी ; जबरदस्त ; प्रचंड ( निश्चयाचा प्रयत्न अथवा वर्तन ). ३ जोराचे ; जाचक ; कडक ; कटु ; राग आणणारे ( भाषण ). ४ सडूसडून पडणारा ( पाऊस ); भडिमाराचा ; तडाक्याचा ( मारा ). ०फोडीचे - अतिशय अवघड अथवा श्रमाचे काम . काम - अतिशय अवघड अथवा श्रमाचे काम . ०फोड्या वि. १ दगड फोडणारा . २ दगडफोड ( - वि . ) पहा . ३ हट्टी ; आग्रही . कपाळफोड्या पहा . ०मय वि. ( अप्रशस्त पण रुढ ) ज्यामध्ये फार दगड आहेत असा ; दगडाळ ; ( देश , जागा इ० ). ०माळरान पुन . दगडांनी व्यापलेले , भरलेले ( रान , जमीन , ओसाड प्रदेश ) ०शिवणी स्त्री. ( बायकी . ) एक खेळ . यांत एका मुलीने डाव घेऊन बाकीच्या मुलींनी दगडावर उभे राहावयाचे व त्या मुली आपआपले दगड बदलीत असतांना डाव घेणार्या मुलीने त्यांना शिवावयाचे व ज्या मुलीस ती शिवेल त्या मुलीवर डाव जाऊन पूर्वी जिच्यावर डाव होता तिने दगडावर उभे राहून खेळावयास लागावयाचे . ०सर स्त्री. पावसाची जोराची सर , वृष्टि . [ दगड + सर = वृष्टि ] ०ळ डाळ वि . दगडांनी भरलेली ; लहान लहान गोटे असलेली ; दगडमय ( जमीन ). म्ह ० बायको तोंडाळ , शेत दगडाळ . दगडाचा माच , दगडाची माचण पुस्त्री . दगडांचा अथवा खडकाचा थर . दगडाची छाती स्त्री . १ ( ल . ) साहसी , निर्भय , बेदरकार ; धैर्यवान व सोसक मनुष्य . २ धारिष्ट अथवा प्रचंड धैर्य ; दृढनिश्चय ; दिलेरी . ( क्रि० करणे ). दगडाचे पेंव न . १ दगडांनी भरलेले पेंव . २ ( ल . ) कठिण ; असाध्य काम ( लग्न वगैरेचे ) करण्यास , सहन करण्यास कठिण व त्रासदायक असे काम , गोष्ट . म्ह ० दगडाचे पेंव घालतां खळबळ काढतां खळबळ = तयार करण्यास व निस्तारण्यास दोहींसहि अवघड अथवा त्रासदायक काम , गोष्ट . दगडावरची रेघ स्त्री . कधी न पुसला जाणारा ठसा ; न मोडणारी चाल ; न फिरणारे शासन ; खोटे न ठरणारे शब्द ; वज्रलेप , कायमची अथवा खात्रीची गोष्ट ; याच्या उलट पाण्यावरची रेघ . दगडी वि . १ दगडाच्या जातीचा ; दगडाचा केलेला ; दगदासंबंधी . २ दगडमय ; दगडाळ . दगडी आंबा पु . एका जातीचा आंबा . याची साल जाड असून हा पिकावयास फार दिवस लागतात . दगडी काव स्त्री . कावेची कठिण जात ; लोखंडी काव . दगडी कोळसा पु . खाणीतून निघणारा कोळसा ; हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवरील अरण्ये व वनस्पती भूकंपादि कारणाने भूगर्भात गाडल्या गेल्यावर त्यांच्यावर अनेक रासायनिक क्रिया होऊन त्यांपासून हा कोळसा बनतो . दगडी जोंधळा शाळू पु . जोंधळ्याची एक जात . याचे कणीस भरदार असून दाणा कणखर असतो . दगडी निंबू न . निंबाची एक जात . याची साल जाड असते . याचा उपयोग रंगांत वगैरे करतात . हे खाण्याजोगते नसते . दगडी मुरुम पु . १ मुरमाची कठिण जात . २ दगडाचे फोडून केलेले लहान लहान तुकडे ; बारीक खडी . मुरुम पहा . दगडी सुपारी स्त्री . सुपारी पहा . दगडी हळद स्त्री . गर्द तांबड्या रंगाची हळदीची कठिण जात . दगड्या वि . १ जड ; ठोंब्या ; मूर्ख टोणपा . २ ( मुलांच्या खेळांत ) संख्या पुरी करण्याकरितां घेतलेला काल्पनिक मुलगा ; पित्त्या ; ( कों . ) जवरामसणा . दगड्याधोंड्या पु . दांडगाईने मनुष्याचे अथवा वस्तूचे नांव विचारणारास उत्तरादाखल दिलेले त्या मनुष्याचे अथवा वस्तूचे नांव .
|