-
वि. तीन प्रकारचा ; तीन स्वरुपाचा . ( समासांत ) त्रिविध - दान - पापपुण्य - स्नान इ० . = तीन प्रकारचे , स्वरुपाचे म्हणजे कायिक , वाचिक व मानसिक दान , पुण्य , पाप इ० शिवाय सात्विक , राजस , तामस आणि आध्यात्मिक , आधिदैविक , आधिभौतिक इ० दुसरे तीन प्रकारांचे गट आहेत . ते त्या त्या शब्दांच्या अर्थामध्ये पहावे . तेचि ज्ञानत्रयवशे । त्रिविध कर्म जे असे । - ज्ञा १८ . ५८५ . [ सं . त्रि + विधा = प्रकार , जाति ]
-
०अवस्था स्त्री. जीवाच्या तीन अवस्था ; जागृति ; स्वप्न व सुषुप्ति .
-
०आहार पु. सात्विक , राजस व तामस अशा तीन प्रकारचे कर्म .
-
०तप न. कायिक , वाचिक व मानसिक अशा तीन स्वरुपाचे तप .
Site Search
Input language: