Dictionaries | References ब बरडी Script: Devanagari See also: बंटी , बरंडा , बरटी , बरड , बरडखरड , बरडा , बरडी सुपारी Meaning Related Words बरडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. माळ जमीन , भरड . वेधतां कठिणशा बरडातें । - किंगवि २६ .( कों . ) भाताचें आवण काढल्यावर पुन्हां आवणासाठीं दुसर्या वर्षापावेतों पडीत टाकलेली जमीन . [ ता . वरडु = रुक्षता ] - वि .आंत मुरुम , गोटा , वाळू व तांबडी माती असणारी ; ओसाड ; नापीक ; निकस ( जमीन ). कर्माकर्माचे गुंडे । बांध घातले दोहींकडे । नपुंसकें बरडें । रानें केलीं । - ज्ञा १३ . ४७ .भाकड . कीं कामधेनु पय : पान । बरड गायीस मागतसे । - भवि १० . १२२ .ओबडधोबड ; खडबडीत . कीं बरड गोटे चिंतामण । परी अभंग जाहले कीं । - भवि १० . ५ .( ल . ) देवीचे व्रण असलेला ( चेहरा ). [ बरड द्वि . ] बरडरान - न . माळरान . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP