|
पु. ( संगीत . ) एक राग . ह्या रागांत षड्ज , तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . जाति संपूर्ण संपूर्ण . वादी धैवत , संवादी गांधार गानसमय दिवसाचा पहिला प्रहर . अलैय्या , कुकुभ ; देवगिरी , नट , यमनी , शुक्ल , सर्पदा इ० प्रकार आहेत . [ हिं . ] ०थाट पु. ( संगीत . ) एका थाटाचें नांव ; ह्याचे स्वर येणेंप्रमाणें असतात . शुद्ध षड्ज , शुद्ध ऋषभ , शुद्ध गांधार , शुद्ध मध्यम , शुद्ध पंचप ; शुद्ध धैवत , शुद्ध निषाद . ०सप्तक न. स्वरसप्तक पहा .
|