Dictionaries | References

मनकर

   
Script: Devanagari

मनकर     

वि.  मनोहर ; मन रमविनारा ; रम्य ; सुंदर . ' मोतीयांचा भांगु मनकरु । जैसा श्रृंधार गंगेचा अवतारु । आला जीवऊं अनंग सगरू । वादे चंद्रमौळीसी । ' - नरुस्व ९७ . ( सं . मन + कर ) मन नांगरणें , गोंधळणें - घाबरणेम ; सुचेनासें होणें . मन घाबरणें - भीतिग्रस्त होणें . मन घोटाळणें - मनाचा निश्चय न होणेम ; गुटमळणे . मन चरकणें - मनाला धका बसणें ; घाबरणें ; मागें घेणें . मन चळणें - दुसर्‍याच गोष्टीकडे लक्ष्य लागणें ; भलत्याच मार्गाला लागले . मन धावणें - ओढ लागणें . मन फिरणें - बेत बदलणें ; विचारांत बदल होणें . मन बदलणें - मन फिरणें . मनमुदा - वि . मनमुराद ; यथेच्छ ; मनमुक्त हवातेवढा . ' जमाव मनमुदेसारखा असिला पाहिजा म्हणुन लष्करांत राजश्री संताजी जाधवराव व दुर्गोजी भोइटे यांस कागद लेहून येथून गुणाजी गुजर पाठविले .' - पेद ३ . ११६ . ( सं . मन + मुदा ) मन वळविणें - एखाद्यास आपल्या मनाप्रमाणें वागावयास लागणें ; एखाद्याची समजूत करणें ; आपणांस अनुकूल करून घेणें ; प्रवृत्त करणें . मनांत येणें - विचार येणें . मनांत येउन जाणें - क्षणिक स्मरण होणें ; एखादा विचार येऊन जाणें . मनाला झोंबणें - मनाला चरका बसणें ; मनास लागणें ; दुःख होणें . मनाला येणें - पसंत पडणें . मनाला लागणें - टोंचणें ; दुःखदायक होणें . मनिंचा हेतु - उद्देश ; मनांतील इच्छित गोष्ट . मनींचा मांडा - मनांतील आवडती गोष्ट . मनीं येणे - कल्पना होणें ; विचार येणें ; वाटणें . मनींचा हेतु - इच्छा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP