|
न. १ काष्ठ . २ लांकडाचा तुकडा ; दांडका . ते यत्नातर मातले पशुवशा येती अहो ! लांकुडें। - मोकृष्ण ६८ . ३२ . ३ ( ल .) ताठ , टणक , न लवणारें शरीर , गात्र , शेंग इ० कोणताहि पदार्थ . म्हशीला शेतकर्यांने खाऊं घाअतलें नाहीं म्हणून ती लाकूड झाली . [ सं . लुगड ; प्रा . लक्कुड ; हिं लकडी ] ( लाकूड शब्दाच्या समासांत पूर्वपदीं लाकड असा उच्चार होतो ). ( वाप्र .) लाकडास माकड लावणें --- जिभेला कोरड पडणें ; जीभ वळणे ०पडणें --- काष्ठपण येणें ; लाकडासारखें जड होणें . सर्वेद्रिया लांकुड पडे । स्मृति भ्रमामाजी बुडे । मन होय वेडें । कोंडे प्राण। - ज्ञा ८ . २२७ . ०वळणें - होणें - काठी किंवा काष्ठाप्रमाणे निर्जीव - निःसत्व होणें . लाकडाचा तट --- पु . लांकडी कोट , भिंत ; लढाईत तोफेचे गोळे अंगावर येऊं नयेत म्हणून संरक्षणासाठी असा तट उभारतात . लांकडाचा क्षार - पु . एक क्षार . एखाद्या लांकडाचा काढलेला क्षार . कोरडचा क्षारास तैजस क्षार म्हणतात - योर १ . २५९ . लाकडाचें तखतेल - न . लाकडापासून काढलेलें तेल ; ( इं .) नाफतेल . वुड नाफ्था - सेंपू १ . १५३ . लाकडाचे दोर --- पुअव . लाकडामध्यें असलेल्या बारीक बारीक रेषा . लाकडी - स्त्री . ( खा .) काथी ; दंड आन ऐकेकापे एकेक लाकडी दीन आख्यों - केलेलें [ गुं .] ०खेळ - पु . लाकडी बाहुल्या इ० खेळणीं ; लाकडाच्या केलेल्या , भातुकली वगैरे खेळाच्या जिनसा ( पूर्वी सासर्याकडून नव्या सुनेस श्रावणपाटीवर देत ). ०घोडी - स्त्री . पफवाज ठेवण्याकरितां उपयोगांत आणतात ती लाकडी घडवंची . घोडी पहा . ०बोंब - पु . ( कों . नाविक ) नाळीच्य अबाहेर शीड लावण्यासाठी बुंधा दाटयावरील बोंब पातलीस अडकवून नाळीच्य अभुरडयास बांधलेले सरळ लांकूड . हा डोलकाठीप्रमाणें उभा न करतां पालथा ठेवितात . हा कलमीहून बराच लहान असतो . याच्या बुंध्यास भोंक पाडून त्यांत एक लाकडी खिळी ( लहानसा लाकडी खुंटा ) घालून त्या खिळीस फेरे घेऊन बांधतात . ०लास - पु ( चांभारी ) बुटांत घालावयाचा लाकडी ठोकळा ; कलबूत . लाकूड फांटे - पुअव . १ घर वगैरे बांधण्यासाठी उपयोगी काटक्या ; शेणी , गवत इ० जळण , सर्पण . ०भारा - पु . लाकडाचें ओझें - भारा ( डोक्यवर वाहण्याचा किंवा जनावरावर लादण्याचा ). ०मदारी - पु . अतिशय रोडका , कृश मनुष्य . मदारी पहा .
|