-
अत्रुण कुल, फ्लॅकोर्टिएसी
-
तांबट, अत्रुण, अट्टाक व काकर इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. बेंथॅम व हूकर यांनी याला सॅमिडेसी असे संबोधले असून एंग्लर व प्रँटल यांनी फ्लॅकोर्टिएसी नावानेच त्याचा उल्लेख व अंतर्भाव पराएटेलीझ गणात केला आहे. हचिन्सन यांनी बिक्सेलीझ (केसरी गण) मध्ये समाविष्ट केले आहे. प्रमुख लक्षणे - वृक्ष व झुडपे, पाने चिवट, साधी एकाआड एक, सोपपर्ण, नियमित चार किंवा अधिक भाग प्रत्येक पुष्पमंडलात असतात. पुष्पदले कधी सर्पिल, कधी पाकळ्यांचा अभाव, असल्यास सुट्या व अनेक, संदले २-१
-
सुटी किंवा जुळलेली, केसरदले अनेक व कधी त्यांचे अनेक संघ, बहुधा ऊर्ध्वस्थ, २-१० किंजदलांच्या किंजपुटात तटलग्न बीजकाधानीवर अनेक बीजके, मृदुफळात किंवा बोंडात एक किंवा अनेक सपुष्क बिया व त्यावर कधी बीजोपांग
Site Search
Input language: