|
स्त्री. १ ( शब्दः ) पसरलेली , विलग स्थिति . २ ( ल . ) अव्यवस्थित , घालमेलीची , घोटाळयाची , गोंधळाची स्थिति ( धंदा , कारखाना , काम वगैरेची ). - वि . १ ( झाडें , घरें , वस्तू यांची ) मोकळी ; दूरदूरची ; पातळ ; बिनदाटीची ( स्थिति ). २ ऐसपैस ; मोकळीचाकळी ; लांबरुंद ; उघडी ; बंदिस्त नव्हे अशी ( जागा , भांडे ). ३ स्पष्ट ; घळमळीत ; मोकळेंचाकळें ; बिनघोटाळयाचें ; काठिण्यरहित ( भाषण , लेखन ). विसकळणें - उक्रि . अस्ताव्यस्त , गैरशिस्त , घोटाळयाचें , पांगापांग होऊन पडणें ; गोंधळ माजणें ; अव्यवस्थित होणें . विसकळित - धावि . १ अस्ताव्यस्त होऊन , पांगून पडलेलें . २ अव्यवस्थित , घोटाळयाचें , गुंतागुंत झालेलें .
|