Dictionaries | References

वेज

   
Script: Devanagari
See also:  वेजें , वेझ , वेझें

वेज     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; the eye of a needle &c. v पाड. वेजीं उतरणें To run or be enlarged in the bore.

वेज     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A bore. The eye of a needle.

वेज     

 न. १ मोतीं , मणी , रत्नें इ० ना पाडलेलें भोंक ; छिद्र . तया ब्रह्मस्वरूपाचा गुणीं । भणौनि सुवेंझु भरले मुक्तामणी । - ऋ २४ . - उषा १७२९ . २ सुई , दाभण इ० चें भोंक ; नेढें . ( क्रि० पाडणें ). ३ ( सामा . ) छिद्र ; भोंक . पडलें काळिजा वेज देवौघनागाचें तेज । - मोरामायणें १ . २५२ . ९६ . ४ वर्म ; लक्ष्य ; केंद्र . चुकलिया त्यागाचें वेझें । केला सर्व त्यागुही होय वोझें । निषिध्दें त्या सर्वत्र जुंझे । वीतराग ते । - ज्ञा १८ . १३४ . [ सं . वेध ; प्रा . वेज्झ ; का . वेज्ज ] वेझ देणें - भोंक पाडणें . प्रज्ञा फळतया अर्था वेझ देणे जें । - ज्ञा १८ . ८६३ ; - शिशु १०३७ . वेजीं पडणें - वेजीं उतरणें पहा . आतां नथ नका लपवूं . तीं उतरलेली वेजीं पडलेलीं मोतीं दिसूं देत सर्वांना . - भाऊ ४८ . वेजीं उतरणें - मोतीं , माणिक इ० वें भोंक , तार , रेशीम इ० च्या सततच्या घर्षणानें मोठें होणें ( वेज मोठें झाल्यास किंमत कमी होते ). शिंदे होळकर एवढे लढते सरदार असतां त्यांची केवळ हिंमत हरली . वेंजीं उतरलीं . - भाब १०४ . वेज टिकली - स्त्री . ( सोनारी ) ज्यांतून तार ओढली जाते तें लोखंडीपट्टीला पांडलेलें भोंक . वेझपट्टी - स्त्री . ( सोनारी ) चांदी - सोन्याचें सूत अगर तार ओढण्याची , भोकें असलेली पट्टी ; जंतरपट्टी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP