-
स्त्री. ( व . ) रस्ता ; चाकोरी .
-
न. १ देणे ; देण्याची क्रिया ; धर्मादाय ; बक्षीस , देणगी देणे . ( समासांत ) विद्यादान - धनदान - कन्यादान इ० २ ( कायदा ) कांही मोबदला न घेतां एखाद्याने दुसर्यास आपली स्थावर किंवा जंगम जिनगी , मिळकत फुकट , धर्मार्थ देऊन टाकण्याचा व्यवहार . - घका ३६ . ३ ( सामा . ) स्वतःच्या मालकीची वस्तु दुसर्यास निरपेक्ष बुद्धीने देणे ; देणगी ; बक्षीस ; धर्मदाय . ४ ( सोंगट्यांच्या खेळांत ) फासे घरंगळते जमीनीवर टाकून ते स्थिर झाल्यावर त्यांच्या वरील पृष्ठभागांवर दिसणार्या ठिपक्यांची संख्या ; डाव . जसेः - पवबारा तेरा , छ तीन नऊ , दस दोन बारा इ० ( क्रि० पडणे ; देणे ). ५ माजलेल्या हत्तीच्या गंडस्थळातून वाहणारा मद . [ सं . ] म्ह ० ( गो . ) दानावर दक्षिणा = दक्षिणेवांचून दानाची सांगता होत नसते त्यावरुन मोठ्या नुकसानीच्या भरीस आणखी थोडेसे नुकसान झाल्यास ही म्हण योजतात . सामाशब्द -
-
न. देणगी ; साम , दान , दंड , भेद या उपाय चतुष्टांतील शत्रुस धन वगैरे देऊन संतुष्ठ करण्याचा मार्ग . - अवदान . ( सं .) दाम पहा .
-
०धर्म पु. ( व्यापक ). पुण्यप्राप्त्यर्थ केलेले दान ; ब्राह्मणभोजन , विहिरी खणणे , धर्मशाळा , देवळे बांधणे इ० परोपकाराची धार्मिक कृत्ये ; परोपकारार्थ केलेले द्रव्यव्यय ; दान देण्याचे धर्मकृत्य . [ दान + धर्म ]
Site Search
Input language: