-
पुन . १ जोम ; शक्ति ; ताकद ; बळकटी . २ स्थैर्य ; दाढर्य ; गंभीरपणा ; दमदारपणा ; सहनशक्ति ( सजीव प्राणी , वस्तु यांची ). ३ वेग ; शक्ति ; आघात ; झपाटा ; गतीचा वेग ( वारा , बंदुकीची गोळी यांचा ). ४ जुलुम ; जबरदस्ती ; अन्याय . ५ दाब ; ताण ; नेट ; वजनाचा भार . सगळे भोई सारखे असले तर बरे , नाहीं तर ठेंगणा असतो त्याचे खांद्यावर भारीं जोर येतो . ६ जोष ; पूर्ण वेग ; भर ( रोग , पाऊस , थंडी यांचा ). ७ तालमींतील एक व्यायामविशेष ; दंड . ( क्रि० काढणें ). ८ ( नाविक ) पूर ; समुद्राची भरती ( विशेषत : पौर्णिमा - अमावस्येच्या दिवशींची ); भांग ; उधाण . ९ ( यंत्रशास्त्र ) प्रेरकशक्ति . १० महत्त्व ; भर ; या गोष्टीवर गव्हर्नरसांहेबांनीं बराच जोर दिला होता . - केले १ . १९९ . [ फा . झोर ; अर . जौर ] ( वाप्र . )
-
पु. ( गो . ) ज्वर ; ताप . [ सं . ज्वर ]
-
०करणें लावणें जोरास येणें = जबरदस्तीनें वागणें ; अडथळा करणें ; शक्तीची , बलात्काराची गरज उत्पन्न करणें ; तडीस नेण्यास , उरकण्यास कठिण करणें , जाणें आज पावेतों रुपये देतों देतों म्हणत होता पण अतां जोरास आला त्यापेक्षां उपास घातले पाहिजेत .
-
०देणें १ पुष्टी ; मदत , आधार देणें . २ महत्त्व देणें ; विशेष उल्लेख , निर्देश करणें . म्ह० जोर थोडा , आणि घुस्सा बडा . - भाब २४ . सामाशब्द - जोराचा - वि . नेटाचा ; अति मोठा .
Site Search
Input language: