-
पु. ( सोने , चांदी इ० मौल्यवान पदार्थाचे ) वजन करण्याचे , वजनाचे एक परिमाण . हा सोळा माषांचा किंवा ऐंशी रतींचा असतो असे ग्रंथांत वर्णन आहे . त्यावरुन याचे वजन १०५ ( ट्रॉय ) ग्रेन होते . व्यवहारांत जवाहिर्याचे बारा माष ( मासे ) मिळून तोळा होतो त्यावरुन त्याचे वजन २१० ग्रेन ठरते . निरनिराळ्या व्यापार्याच्या प्रांती , शहरी तोळ्याचे निरनिराळे परिमाण आहे ते पुढे दिले आहे - पुणे , अहमदाबाद १९३॥ ( ट्रॉय ) ग्रेन , अहमदनगर १८८॥ ( ट्रॉय ) ग्रेन . सिंधप्रांत १८७॥ ( ट्रॉय ) ग्रेन जालना १८४॥ ( ट्रॉय ), मुंबई १८० ( ट्रॉय ) ग्रेन . कलकत्ता - १७९ . ६६६६६६ . - छअ १९८ . [ सं . तुल ]
-
०मासा ( प्रकृति , स्वभाव इ० कांचा ) चंचलपणा , नाजूकपणा दर्शविणारा शब्दसमूह . ह्याची प्रकृतिरोगाची भावना तोळामास आहे . = ह्याचा स्वभाव , ह्याची प्रकृति अगदी क्षुल्लक कारणानेहि बिघडण्याइतकी नाजूक आहे . मासा पाहणे कृपण , हाताचा जड असणे . तोळेवरी क्रिवि . ( ना . ) एखादे काम करण्याचे नांवाने मात्र , देणेघेणे मात्र तोळेवरीच !
-
m A weight of gold or silver.
-
तोळामासा expresses variableness or fickleness. Ex. ह्याची प्रकृती तोळामासा आहे.
Site Search
Input language: