-
स्त्री. १ चार वस्तूंचा समुदाय ( चार कागद , नाणीं , मोतीं इ० ) २ एकजुटीच्या , विचाराच्या चार मनुष्यांचा समुदाय ; उदा० चांडाळचौकडी . ३ कापडावरील , लुगडयावरील चौकट ; आडव्या - उभ्या रेषा ; चतुरस्त्र चिन्ह . ४ हरिणाचें उडया मारणें , बागडणें ; हरिणाची उडी . ५ कृत , त्रेता , द्वापर व कली या युगांचा मिळून होणारा काल ; उ० चौदा चौकडया रावणाचें राज्य ; बहात्तर चौकडया इंद्राचें राज्य . जैं चौकडिया सहस्त्र जाये । तैं ठायेठावो विळुचि होये । - ज्ञा ८ . १५६ . चौदा चौकडिया आयुष्यगणना । बंधुवर्ग जाणा कुंभकर्ण । - तुगा ३४६३ . ६ ( क . ) आठ लुगडयांचा समुदाय ; चोवीस मुट्टे किंवा तोबे . आज मी चौकडी सणगें विकलीं . एक चौकडी सुताचा काय भाव आहे ? [ चौकटी ] ( वाप्र . )
-
स्त्री. ( संगीत ) चीजव . ' प्रत्येक रांगांत मला इतक्या चौकड्या येतात .' - संधोक ६७ .
-
०भुलणें गुंग होणें - मोडून भुलून जाणें ; भांबावून जाणें ; बावचळणें ; गोंधळणें . सामाशब्द - ० ची गाडी --- स्त्री . चार घोडयांची राजाच्या स्वारीची गाडी , बगी , रथ . स्वारीबरोबर पिछाडीस एक चौकडीस गाडी ठेविणें - ऐरापु प्र . ९ . ५१० . चौकता पहा .
-
To be fascinated or bewildered. चौकडीचा or चौकड्याचा Having squares, tesselated--chintz, cloth, a pavement.
Site Search
Input language: