-
न. सुवासिक फुलांचें अगर पदार्थांचें शुध्द सुवासिक सत्त्व , अर्क , सौगंधिक अर्क ; पुष्पगंधार्क ; निरनिराळे प्रकार :- १ वाळा ( हिंदी खस ), २ मेंदी ( हिं . हिना ), ३ गुलाब ( हिं . ), ४ मोतिया ( मोतियाच्या फुलांचें ), ५ पाच पानडी , ६ चमेली ( जाईजुईच्या फुलांचें ), ७ केवडा , वरील पदार्थ एका भांड्यांत पाण्यासह घालून त्याची वाफ करुन ती एका नळीद्वारां दुसर्या थंड भांड्यांत सांठवितात . त्या वाफेचें द्रवरुप तें अत्तर . [ अर . इत्र . तुल० इं . आटो ]
-
०जाळणें राचे दिवे लावणें - मूर्खपणानें उधळपट्टी करणें . अगोदर अत्तराचे दिवे जाळून मग काय धुळीचे दिवे खात जावयाचें आहे ?
-
राचे दिवे लावणें - मूर्खपणानें उधळपट्टी करणें . अगोदर अत्तराचे दिवे जाळून मग काय धुळीचे दिवे खात जावयाचें आहे ?
-
०गुलाब सभा बरखास्त होण्यापूर्वी सभासदांस पान - सुपारी , अत्तर , गुलाबपाणी वगैरे देण्याचा विधि ; ( सामान्यत : ) पानसुपारी ; संभावना . [ फा . ].
Site Search
Input language: