-
न. १ झोंप ; नीज ; निजणें ; निजण्याचा व्यापार . कृष्ण तयां ध्यानीं आसनीं शयनीं । - तुगा २२ . २ बिछाना ; मंचक ; चटई ; माचा ; खाट ; पलंग ; आंथरूण ; शय्या ; शेज . नसतां ... पयःफेन शुभ्र मृदु शयन । - मोस्त्री ४ . ४४ . ३ आडवें होणें ; जमीन , पलंग इ० वर निजणें ; अंग टाकणें ; अंगाखालीं घेणें . शयनी एकादशी - स्त्री . आषाढ शुध्द एकादशी , ह्या दिवशीं विष्णु झोंपी जातात व चातुर्मास्य संपेपर्यंत उठत नाहींत . [ सं . ] शयनीय - वि . निजण्यास योग्य . शय्या - स्त्री . १ बिछाना ; आंथरूण . २ खाट ; पलंग . ३ शयन पहा . [ सं . ] शय्यादान करणें - १ मृताची शय्या ब्राह्मणास देणें ; उत्तरक्रियेंतील दान . २ सती जाणें . शय्यादान करणें मला आणून द्या शिर । - पला ४० , १०४ . शायी - वि . निजणारा ; झोंपणारा . ( जेथें किंवा ज्याप्रकारें असेल तो शब्द पूर्वी योजतात ) उदा० जलशायी ; शेषशायी ; भूशायी ; सुखशायी ; उत्तानशायी . [ सं . ]
-
śayana n S Sleeping, reposing: also reclining or lying. 2 A bedstead, couch, mat, anything on which to lie and repose.
-
n Sleeping. A bedstead.
-
ना. अंग टाकणे , आडवे होणे , गाई , झोप , डोळा लागणे , निज , बामकुसी , सुषुप्ती .
Site Search
Input language: