Dictionaries | References

अवदिशीं पुर्‍या आणि सणीं घुगर्‍या

   
Script: Devanagari

अवदिशीं पुर्‍या आणि सणीं घुगर्‍या

   [ अवदिशीं = आडदिवशीं, भलत्याच दिवशीं
   अशुभ दिवशीं ] पुढें सण असतां भलत्याच दिवशीं पुर्‍या वगैरेचें सुग्रास जेवण करुन जेवावयाचें व पुढची कांहीं काळजी करावयाची नाहीं व प्रत्यक्ष सणाच्या दिवशीं कांहीं शिल्लक नाहीं म्हणून केवळ घुगर्‍यासारखें काहींतरी खाऊन रहावयाचें, हा प्रकार आचरटपणाचा आहे. यापेक्षां योग्य वेळीं योग्य गोष्ट म्हणजे आडवारीं घुगर्‍या खाऊन निर्वाह करणें व सणाच्या दिवशीं पुर्‍या वगैरे मिष्ठान्न खाणें, हें योग्य होय. भलत्याच वेळीं जवळ असलेली पुंजी उडवून टाकून योग्य वेळीं दीनपणा पतकरणें, हें तारतम्याचा आभार दाखवितें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP