Dictionaries | References

ओढुन चंद्रबळ

   
Script: Devanagari

ओढुन चंद्रबळ

  न. १ आवडणार्‍या वस्तूविषयीं वरून वरून नावड दाखविण्याचें ढोंग करणें ; आग्रहाची आवश्यकता . ( क्रि० आणणें ). ' हं तोडा विड्या , ओढून चंद्रबळ नको आणा . यला . ' - मोर३२ . २ महात्वाचा , परिणामाचा उगाच बाऊ दाखविणें . ( क्रि० आणणें ). ३ भाषणाची , वाक्यांची ओढाताण करणें ; दुरान्वय लावणें . ( क्रि० आणणें ). ४ मारून मुटकुन बळेंच संपादन केलेली गोष्ट ( धैर्य , उमेद ); नसतें अवसान . ५ ( शब्दशः ) कोणत्याहि शुभ कार्याच्या वेळीं अवश्य लागणारें लाकुंडलींतील चंद्रांचें बळ अनुकूल नसतांना ओढून ताणून ते अनुकुल करून घेणें . ( वाप्र .) ओढून चंद्रबळाचा - १ वळेंच आणलेला ; वर दाखविलेला , घरलेला ; कृत्रिम . २ अयोग्य रीतीनें हक्क सांगितलेला , दाखविलेला . ३ बळेंच ओढाताण केलेला ; वळ जबरी केलेला ; दुरान्वित .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP