-
स्त्री. पाण्याचा मोठा प्रवाह ; मोठ्या प्रवाहास , सरोवरास , समुद्रास मिळणारा ओढा . [ सं . ] म्ह ० नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहूं नये = केवढीहि मोठी नदी असली तरी तिचा उगम एखाद्या लहानशा ओहोळांत किंवा अतिशय अडचणीच्या , वाईट जागी असतो . त्याचप्रमाणे एखाद्या परमपूज्य ऋषीचा जन्म अतिशय हीन कुलांत असूं शकेल . यावरुन पूज्यपणा , पवित्रता ही पूर्वपरंपरेवर अवलंबून नसतात तर व्यक्तीच्या अंगच्या गुणावर अवलंबून असतात ; किंवा मोठ्याचा मागचा इतिहास पाहण्याचा प्रयत्न करुं नये , तो चांगला नसावयाचाच .
-
०गर्क वि. नदीच्या पुरांत , पाण्यांत बुडणारी , बुडालेली ( जमीन इ० ). - बदलापूर ३६८ . [ नदी + अर . घर्क = बुडालेला , मग्न ]
-
०तीर न. नदीचा कांठ , किनारा . [ नदी + सं . तीर ]
-
०पति नदीन नदीप - पु . नद्यांचा पति ; नदी + सं . इन = ईश ; नदी + सं . पा = पालन , रक्षण करणे ]
Site Search
Input language: