|
अ. निराळेपणा , भिन्नपणा दाखविणारा परंतु सामान्यत : अभाव किंवा अन्यथाभावदर्शक अरबी अव्ययशब्द किंवा प्रत्यय . याचा मनसोक्त ( विशेषत : हिंदुस्थानी शब्दाबरोबर ) उपयोग करितात . या शब्दाचे पुढील कांहीं अर्थ होतात - १ इतर ; अन्य . गैर पथकें येऊन मोर्चेबंदी केली आहे . - रा १२ . १२५ . २ अयोग्य ; अन्यायाचा . हें तुम्हीं गैर केलें . - मदरु १ . १०६ . ३ ( नामाच्या किंवा विशेषणाच्या प्रारंभी जोडल्यास ) अवास्तविक , उलट ; विपरीत . ४ विना ; वांचून . गैर अन्याय मला गांजतो . गैर अपराध दंड घेऊं नये . [ अर . घैर = निराळा , व्यतिरिक्त ] ( वाप्र .) अदबी - स्त्री . असभ्यता ; अपमान ; अनादर . गैर अदबी बोलला सबब पातशाहा यास राग येऊन डोळे काढिले . - मदरु २ . ७० . ०अदा वि. रद्द ; न पटलेलें . शिंदे कडील वरात आली तर मग गैरअदाही व्हावयाची नाहीं . - ख १० . ५२ . ७९ . ०अब्रू स्त्री. अप्रतिष्ठा . गैर - अब्रू फारशी न करणें . - वाडबाबा २ . ७५ . ०अमली वि. परस्वाधीन ; दुसर्याचें . चार लक्षाचे भरतीस अमली महालांपैकीं बेरीज कमी आल्यास गैर - अमली महाल आहेत त्यांपैकीं भरतीस कमाल आकाराचे बेरजेचा महाल लावून देणें . - रा . १० . ३२१ . ०आबादी वि. ओसाड ; उजाड ; बेचिराख . ०आरामी स्त्री. अस्वस्थता . हज्रतांचे शरिरास दोन दिवस गैराआरामी आहे . - दिमरा २ . ३२ . ०इतबार पु. अविश्वास . तमाम फौजेस गैरइतबार जाहला . - भाब ८० . ०इमान न. इमान नसणें ; द्रोह ; अनिष्ठा . आमचें गैरइमान असतें तरी आम्हीं आजपर्यंत येथे तुम्हापाशीं न ठरतों . - भाब १११ . ०कबजी वि. परस्वाधीन ; गैरअमली पहा . सरंजाम गैरकबजी , कांहीं सुटला त्यांत वस्ती नाहीं . - ख २ . ४२ . ०कायदा वि. बेकायदेशीर ; असनदशीर . ( इं . ) इल्लीगल . ०कायदा स्त्री. ( कायदा ) गुन्ह्याचें कृत्य करण्याच्या इराद्यानें पांच किंवा पांचाहून अधिक एकत्र जमलेले इसम . ( इं . ) अनलॉफुल असेंब्ली . मंडळी स्त्री. ( कायदा ) गुन्ह्याचें कृत्य करण्याच्या इराद्यानें पांच किंवा पांचाहून अधिक एकत्र जमलेले इसम . ( इं . ) अनलॉफुल असेंब्ली . ०किफायत स्त्री. तोटा ; नुकसान . किफायत , गैरकिफायत समयासमयास चित्तांत आणून किफायतीचीं कांमें करीत आलां , पुढें त्याचप्रमाणें करावीं - रा १ . ३४६ . ०कौली वि. परवाना किंवा अभयपत्र न दिलेलें ; बिगर परवाना . - मराआ . ०खर्च पु. १ जादा , किरकोळ खर्च . २ गैरवाजवी , अयोग्य खर्च . ०खुशी खुषी - वि . नाकबूल ; नाखूष ; रुष्ट . खुषी किंवा गैरखुषी असा हा कौल बायकांशी । - पला १०४ . ०चलन चलनी - वि . १ चालू नसलेलें ( नाणें ). २ ( ल . ) अव्यवस्थित ; बेशिस्त ; अशिस्त ( वर्तन ). ०चलन स्त्री. १ चलनाचा अभाव ; चलन नसणें . २ ( क्क . ) गैर वर्तन ; बदचाल . ०चाकर वि. बडतर्फ ; माजूल . जखमी जहाले त्यांस गैरचाकर करून जागिरा तगीर करविल्या . - जोरा ७५ . ०जप्त वि. गैरअमल ; गैरकबजी ; परस्वाधीन . गैरजप्त देश साधावे . - चित्रगुप्त ११० . ०जबाब पु. उध्दटपणाचें , अनादराचें उत्तर . ०दस्त दस्ती - वि . सरकारसार्याची सूट असलेली ( जमीन ). ०नफा फायदा - पु . तोटा ; नुकसान . येणेंकडून तुमचा गैरनफा जाहला . - जोरा १४ . अत्यंत वोढ केल्यास पाटीलबावांचा गैर फायदा आहे . - जोरा ४७ . ०प्रकारचा वि. १ इतर ; भिन्न ; दुसरा . २ चमत्कारिक ; हास्यापद ; तर्हेवाईक ; विलक्षण . ०बर्दार वि. बहार नसलेला ; फळहीन . पोकळी गैर - बदर , शेंडे वाळलेल्या आहेत . - रा ११ . ७९ . ०मजुरा क्रिवि . ( हिशब ) मजुरा ( वजा ) टाकल्याशिवाय ; वजावाट न करितां . [ गैर + मजुरा - मुजरा ] ०मंजूर वि. नामंजूर करून एकपक्षी तह केला . - रा १२ . १२२ . ०मर्जी स्त्री. अवकृपा ; रुष्टता ; इतराजी ; नाराजी . ०मसलत मनसुबा - स्त्रीपु . मूर्खपणाचा , वेडगळपणाचा बेत , कट , योजना . ०महसर्दार वि. अप्रतिष्ठित . - रा ८ . ४३ . [ अर . माआसिर = थोरवी ] ०महसूल पु. जुलमी करापासून किंवा अन्याय्य मार्गानें काढलेला वसूल ; योग्य सरकारसार्याबिरहित वसूल . विजापुराहून एक हवालदार गैरमहसूल पैदागिरी कबूल करून आला . - इऐ ५ . १०० . ०माकूल मूर्ख ; अडाणी ; गैर ; वाईट . कार्बारास खलेल करणें हें गैरमाकूल गोस्टी आहे . - रा १८ . ३३ . - क्रिवि . मूर्खपणें . लोक गैरमाकूल आम्हांस न कळत वर्तले तरी त्याची बदलामी आपणावरी न ठेवावी . - रा ८ . १० . ०मान्य वि. अमान्य ; असंमत . ०मार्ग पु. गरशिस्त आचार , रीत ; दुराचरण . ०माहीत वि. १ अपरिचित ; अनोळखी . २ अजाण ; नेणता . साठे आहेत ते गैरमाहीत . - ख ७ . ३५५१ ०माहीतगार वि. अज्ञानी ; अडाणी . ०मिराशी वि. वंशपरंपरा मालकी नसलेला . मातकदीम मिरासी खरी जाहली . काणव मजकूर गैरमिरासी मुतालीक ऐसे जाहले . - इऐ ५ . १०२ . ०मेहनत स्त्री. निरुद्योग . परंतु मेहनत , गैर - मेहनत सर्व एक ईश्वरी क्षोभानें वायां गेल्या . - ऐ ५ . मेहेरबानी - स्त्री . अवकृपा ; इतराजी . सांगितल्यावरून मनांत गैर मेहरबानी न धराबी . - रा ८ . १० . ०मोसम हंगाम - पु . अवेळ . गैर मोसमांत ( पौष वद्य १२ स ) आंबे आले यावरून कौतुक वाटलें . - रा २२ . ५ . ०रजावंद वि. नाराज ; नाकबूल . तो क्रियेस गैररजावंद जाहला . - वाडशाछ १३२ . [ फा . ] ०रहा रीत - स्त्री . बदचाल ; अयोग्य रीत ; वाईट आचरण . - वि . बदचालीचा - सलुकाचा . भुजंगराव याची वर्तणूक गैररहा दिसते . - ख ११ . ५७७६ . ०राजी वि. असंतुष्ट ; नाराज . पाटसकर गैर - राजी जाले . - रा ६ . २६ . ०राबता वि. १ बंदी ; मनाई ; खंड ( मार्ग , मिळणे , येणें - जाणें , वहिवाट , चाल यांमध्यें ). नाना फडणीस लष्करांतून आल्यापासून गैरराबता बहुत करूं लागले , कोणाचीच गांठ पडत नाहीं . - ख ८ . ४१५१ . २ वहिवाट , चाल यामध्यें अनभ्यास ; अपरिचय ; अवापर ; वळण नसणें . ०रास्त वि. गैरवाजवी ; असत्य ; खोटा . ०रुजू वि. १ गैरहजर . २ मंजूर किंवा दाखल किंवा मान्य न केलेले ( हिशेब ). ०लायक वि. अयोग्य ; नालायक ; अनुचित . ०वळण न. १ गैरराबता . त्या मार्गास सध्यां गैरवळण जाहे . २ एकीकडे असणें ; आडवळण ; दळणवळण नसणें . हा गांव गैरवळणांत पडला . ३ गबाळ , वाईट लिखाण . ४ सरावांत नसणें ; संवय नसणें ; निरुपयोग . ०वाका पु. खोटी किंवा बनावट गोष्ट ; गैरसमजूत ; लबाडी . ऐसा गैरवाका सांगितला . - रा ८ . ५२ . - वि . वेडावांकडा . - शर [ फा . घैर - वाकिअ ] ०वाजवी वाजिवी - वि . अयोग्य ; अनुचित ; फाजील ; अन्याय्य . त्यांचा अभिमान गैर - वाजवी यांणीं नच धरावा . - रा १२ . ७९ . [ फा . घैर + वाजिवी ] ०वाजवी पु. ( कायदा ) अयोग्य वजन . ( इं . ) अनडयू इन्फ्लुअन्स . दाब पु. ( कायदा ) अयोग्य वजन . ( इं . ) अनडयू इन्फ्लुअन्स . ०वास्तविक वि. खोटा ; असत्य ; वस्तुस्थितीस सोडून . विलग - क्रिवि . आडबाजूस ; आडवळणी . - वि . ( विलगसाठीं चुकीनें योजलेला ) न मिळणारा ; न जुळणारा . ०विल्हईस विल्हेस विल्हे - क्रिवि . आपल्या ( योग्य ) ठिकाणाच्या विरुध्द जागीं ; भलतीकडे . ०विल्हेस , विल्हेस पडणें - १ दुसरीकडे किंवा चुकीच्या ठिकाणीं लागणें ; क्रमवार नसणें . २ योग्य ठिकाणाहून गहाळणें ; गमावणें . ३ गोंधळ होणें , अव्यवस्थित असणें . लागणें , विल्हेस पडणें - १ दुसरीकडे किंवा चुकीच्या ठिकाणीं लागणें ; क्रमवार नसणें . २ योग्य ठिकाणाहून गहाळणें ; गमावणें . ३ गोंधळ होणें , अव्यवस्थित असणें . ०शर्ती स्त्री. माफीजमीन म्हणून ठरविल्यानंतर जिला इतर दुसर्या कोणत्याहि अटी पाळावयाच्या नसतात अशी जमीन . ०शिस्त वि. बेशिस्त ; अव्यवस्थित ; विना रीतभात ; नियमबाह्य ; असभ्य ; फाजील ( माणूस , वर्तन , भाषण ). - स्त्री . बेशिस्तपणा ; अव्यवस्थितपणा ; अयोग्यपणा ; अनियमितपणा . ०शेरा शरा - वि . धर्मशास्त्रविरहित . काजीपासून गैरशेरा अमल होऊन आला . - वाडसनदा १५ . [ अर . घैर + शरअ = धर्मशास्त्र ] ०संधी स्त्री. अवेळ ; गैरमोसम ; अवकाळ . ०सनदी वि. १ बेसनदशीर ; बेकायदेशीर ; सनदेनें अधिकृत नसलेलें . २ जादा मंजुरीशिवाय . गैर - सनदी खर्च करावयाची सरकारची आज्ञा नाहीं . - ख ५ . २३५३ ०समजाविशी स्त्री. ( कायदा ) गैरसमजूत ; ( इं . ) मिसरिप्रेझेंटेशन ०समजूत स्त्री. उलट , चुकीची समजूत ; चूक . ०सल्ला सलाह - गैरमसलत पहा . हे कपणी इंग्रजबहादूर यांचे सलाहानें अगर गैर सलाहानें ... - रा २२ . १२५ . ०साल वि. अनिश्चित वेळेचा ; वर्ष नमूद नसलेला . गुणनवरे यांनी कागद एक काढिला , तो बहुतां दिवसांचा , गैर - साल । - रा ६ . ८९ . ०सावध वि. १ बेसावध ; गाफील . २ बेशुध्द ; मूर्छित . ०साळ वि. १ खोटसाळ ; सरकारी टांकसाळींतून न पाडलेलें , इतर ठिकाणचें म्हणजे हिणकस , कमी किंमतीचें ( नाणें ). गैरसाळ तामगिरी । कोणी नवी मुद्रा करी । - दा १० . ८ . १४ . ( त्यावरून ) खोटा ; बनावट ; लबाडीचा . २ ( ल . ) बेशिस्त ; अनभ्यासी ; गांवढळ ; अडाणी ( माणूस ); अयोग्य ; अनुचित ( वर्तन ). ३ अशिष्ट ; अडाणी ; हलका ; राकट ; बेडौल ; गांवठी इ ००सोई सोय - स्त्री . अडचण ; त्रास ; हाल ; अप्रशस्तता . ०सोईचा वि. अडचणीचा ; सोईचा , सुखकर नसलेला . ०हंगाम पु. गैरमोसम पहा . त्यास गैरहंगाम , हल्ली खरबुजीं तयार मिळालीं ते आठ सेवेसीं पाठविलीं असेत . - रा ३ . ३१२ . हजीर , हाजीर - वि . मोजदादीच्या वेळीं समक्ष नसलेला ; अविद्यमान ; अनुपस्थित . [ फा . ] ०हिसाबी हिशेबी - स्त्री . अन्याय ; अव्यवस्थितपणा . - क्रिवि . अन्यायानें . आपले जागिरींत नाहक गैरहिसाबी पादशाह खलल करविताती । - इमं ६७ . ०हुकुमी वि. अनधिकृत ; संमति , अज्ञा नसलेलें ; नामंजूर . ०हुर्मत स्त्री. अप्रतिष्ठा ; बेअब्रू .
|