|
पु. कोटाच्या , किल्ल्याच्या भोंवतालचा खंदक , खांच ; लांबलचक खळगा ; खाई ; खड्डा ; हरळ ; टरळी ; जमिनीखालीं केलेलें भुयार . - पुस्त्री . १ ( घासल्याच्या , चोळण्याच्या योगानें किंवा इतर कारणानें पडलेला ) ओरखडा ; चरा ; ओरबाडा ; ( क्रि० पडणें ). २ चिडणें ; चिघळणें ; चरत जाणें ( जखम , व्रण , इ० ). ३ केषाकर्षणामुळें द्रवपदार्थ पसरणें . [ हिं . म . चरणें ] न. १ अंतरिक्षांतील तारादिकांचें लंकेस ( लंकेवरून प्रथम याम्योत्तर जातें असें मानलें आहे ) उगवणें आणि त्यांचे एखाद्या विवक्षित स्थळीं उगवणें या दोहोंच्या कालांतील अंतर ; रेखांतर ; स्पष्टपरिधि . २ ( फलज्योतिष ) सोमवार . ३ ( सांकेतिक ) गमन . - वि . १ हलणारा ; जंगम ; चालणारा ; सरणारा ; जाणारा ; चलनशील ; ज्याचें स्थित्यंतर करतां येतें असा ( वस्तु किवा पदार्थ , मालमत्ता , चीजवस्तु ). चरद्रव्य ; जलचर ; खेचर ; भूचर ; वनचर . स्थिरचर व्यापुनि अवघा तो परमात्मा दशांगुलें उरला । - धुंडिराजकृत प्रल्हादचरित्र . २ स्वाती , श्रवण , धनिष्ठा , शततारका इ० नक्षत्रें . ३ मेष , कर्क , तुला , मकर इ० राशी ; एखादी गोष्ट किंवा कार्य करण्यास आरंभ या नक्षत्रराशींच्या वेळीं केल्यास फलनिष्पत्ति लवकर होते , परंतु तें कार्य चिरस्थायी व्हावें असें वाटत असल्यास या काळांत आरंभ करतां कामा नये असें फलज्योतिष सांगतें नक्षत्रें , राशी , लग्नें यांचे तीन पुढील प्रकार केले आहेत :- १ चर = चरस्वभाव . २ स्थिर = स्थिरस्वभाव व ३ द्विस्वभाव . चरराशी :- मेष , कर्क , तुला , मकर . स्थिरराशी :- वृषभ , सिंह , वृश्चिक , कुंभ . द्विस्वभाव - मिथुन , कन्या , धनु , मीन . ४ ( व्यापक ) चालण्याच्या , सरण्याच्या , पळण्याच्या बेतांत असलेला ; गमनोन्मुख झालेला ; निघण्याच्या बेतांत असलेला ; निघायला अगदीं तयार झालेला [ सं . चर = चालणें ] सामाशब्द - क्रि.वि. १ फाडतांना , टरकतांना , भाजतांना जो आवाज होतो त्या सारखा ध्वनि होऊन ; टरकन . ( क्रि० फाटणें ; चिरणें ). २ एकदम शहारे येऊन ; वेदना उत्पन्न होऊन ; व्यथा पावून . पु. ( कोळी ) कोळयाजवळ असलेला मोठा सुरा . - गुजा६८ . ०खंड न. चर अर्थ १ पहा . विषुवांशासंबंधीं अंतर ; चरार्ध ; चरदल . ०ज्या स्त्री. चराची ज्या . ०मूर्ति स्त्री. छबिना , अगर दिंडीच्या वेळीं मिरविण्यांत येणारी लहान मूर्ति ; उत्सवमूर्ति .
|