|
पु. १ दिवा ; प्रकाशसाधन . २ दिव्याचे आधान ; लामण दिवा . ३ ( ल . ) प्रकाशक वस्तु , व्याख्यान , लेखन , विवरण ; फोड ( वर्णन इ० ). उदा० ध्यानदीप , चित्रदीप इ० ( पंचदशीमध्ये ध्यानदीप , चित्रदीप , नाटकदीप , कूटस्थदीप , तृप्तिदीप अशी पांच प्रकरणांची पांच नावे आहेत . ) ४ ( संगीत ) एक राग . दीपक पहा . हा राग आळविल्यास दिवे लागतात अशी समजूत आहे . दीप भूपकल्याण तूं गाता प्रकाश सार्या स्थळी पडती । - प्रला २३७ . पु. १ दिवा ; प्रकाशसाधन . २ दिव्याचे आधान ; लामण दिवा . ३ ( ल . ) प्रकाशक वस्तु , व्याख्यान , लेखन , विवरण ; फोड ( वर्णन इ० ). उदा० ध्यानदीप , चित्रदीप इ० ( पंचदशीमध्ये ध्यानदीप , चित्रदीप , नाटकदीप , कूटस्थदीप , तृप्तिदीप अशी पांच प्रकरणांची पांच नावे आहेत . ) ४ ( संगीत ) एक राग . दीपक पहा . हा राग आळविल्यास दिवे लागतात अशी समजूत आहे . दीप भूपकल्याण तूं गाता प्रकाश सार्या स्थळी पडती । - प्रला २३७ . न. पृथ्वीचा भाग ; खंड ; बेट ; द्वीप . या दीपीचेआ भाषामध्ये तैसी । बोली मराठी । - ख्रिपु १ . १२५ . [ सं . द्वीप ] न. पृथ्वीचा भाग ; खंड ; बेट ; द्वीप . या दीपीचेआ भाषामध्ये तैसी । बोली मराठी । - ख्रिपु १ . १२५ . [ सं . द्वीप ] ०क पु. १ दिवा . दीपपणे दीपकी । तेज जैसे । ज्ञा १३ . ८९२ . २ गाण्यांतील एक राग . या रागांत षड्ज , कोमल , ऋषभ , तीव्र गांधार , तीव्र मध्यम , पंचम , कोमल , धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . आरोहांत ऋषभ वर्ज्य व अवरोहांत निषाद वर्ज्य . जाति षाडव - षाडव . वादी षड्ज . संवादी पंचम , गानसमय सायंकाल . ३ काव्यांतील एक अलंकार . दृष्टांतात उपमान , उपमेय आणि सार्ध्यम्य यांत बिंब - प्रतिबिंबित भाव असतो . परंतु दीपकांत औपम्य गम्य असते व धर्म एकच असून त्याचे संबंधी कांही अप्रस्तुत असतात . उदा० अचल करीच असावा व्यवहारी शब्दसंगरी सदसि । ४ मदन . - वि . १ प्रबुद्ध करणारा ; फुलविणारा ; चेतविणारा . २ पाचक ; वर्धक ( औषध , अन्न ). दीपक औषधे वस्तुतः शक्ति न वाढवितां केवळ पचनव्यापार तत्काळ चेतवितात . सामाशब्द - ०क पु. १ दिवा . दीपपणे दीपकी । तेज जैसे । ज्ञा १३ . ८९२ . २ गाण्यांतील एक राग . या रागांत षड्ज , कोमल , ऋषभ , तीव्र गांधार , तीव्र मध्यम , पंचम , कोमल , धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . आरोहांत ऋषभ वर्ज्य व अवरोहांत निषाद वर्ज्य . जाति षाडव - षाडव . वादी षड्ज . संवादी पंचम , गानसमय सायंकाल . ३ काव्यांतील एक अलंकार . दृष्टांतात उपमान , उपमेय आणि सार्ध्यम्य यांत बिंब - प्रतिबिंबित भाव असतो . परंतु दीपकांत औपम्य गम्य असते व धर्म एकच असून त्याचे संबंधी कांही अप्रस्तुत असतात . उदा० अचल करीच असावा व्यवहारी शब्दसंगरी सदसि । ४ मदन . - वि . १ प्रबुद्ध करणारा ; फुलविणारा ; चेतविणारा . २ पाचक ; वर्धक ( औषध , अन्न ). दीपक औषधे वस्तुतः शक्ति न वाढवितां केवळ पचनव्यापार तत्काळ चेतवितात . सामाशब्द - ०कलिका स्त्री. दिव्याची ज्योत . पै होऊनि दीपकलिका । - ज्ञा १४ . २५७ . ०कलिका स्त्री. दिव्याची ज्योत . पै होऊनि दीपकलिका । - ज्ञा १४ . २५७ . ०कल्याण पु. ( संगीत ) एक राग . दीपक अर्थ २ पहा . ०कल्याण पु. ( संगीत ) एक राग . दीपक अर्थ २ पहा . ०किट्ट न. दिव्याची काजळी . [ सं . ] ०किट्ट न. दिव्याची काजळी . [ सं . ] ०गृह न. दिवादांडी पहा . ०गृह न. दिवादांडी पहा . ०चंदी स्त्री. १ होरीसारिखी गाण्यांतील एक चीज . २ ( ताल ) एका तालाचे नावं . यांत चौदा मात्रा व चार विभाग असतात . ०चंदी स्त्री. १ होरीसारिखी गाण्यांतील एक चीज . २ ( ताल ) एका तालाचे नावं . यांत चौदा मात्रा व चार विभाग असतात . ०दर्शन न. १ संध्याकाळी दिवे लावताक्षणी दिव्यास करावयाचा नमस्कार . २ ती वेळ ; दिवे लावणी . ०दर्शन न. १ संध्याकाळी दिवे लावताक्षणी दिव्यास करावयाचा नमस्कार . २ ती वेळ ; दिवे लावणी . ०दान न. और्ध्वदेहिक संस्काराच्या वेळी ११ व्या दिवशी द्यावयाच्या दानापैकी एक दान ; इतर धार्मिक व्रत - वैकल्याच्या प्रसंगी ब्राह्मणांस करावयाचे दिव्याचे दान . ०दान न. और्ध्वदेहिक संस्काराच्या वेळी ११ व्या दिवशी द्यावयाच्या दानापैकी एक दान ; इतर धार्मिक व्रत - वैकल्याच्या प्रसंगी ब्राह्मणांस करावयाचे दिव्याचे दान . ०पूजा स्त्री. दिव्याची पूजा दिव्याची आंवस पहा . ०पूजा स्त्री. दिव्याची पूजा दिव्याची आंवस पहा . ०माला स्त्री. दिव्यांची रांग . ०माला स्त्री. दिव्यांची रांग . ०माळ स्त्री. १ दिव्यांची ओळ . २ देवळापुढे उत्सवांत दिवे ठेवण्यासाठी बांधलेला दगडी खांब . ३ ( उप . ) उंच व किडकिडीत ( सुरेख नसणारी ) स्त्री . ४ एक झाड ; माथेशूळ . हे झाड सरळ पुरुषभर उंच वाढते . पाने कात्रेदार . यास हाताचे अंतरावर मुळापासून एकावर एक , फुलांनी युक्त असे झेंडू लागतात . या झेंडूवर तांबूस रंगाची बारीक फुले येतात . - वगु ४ . २२ . ०माळ स्त्री. १ दिव्यांची ओळ . २ देवळापुढे उत्सवांत दिवे ठेवण्यासाठी बांधलेला दगडी खांब . ३ ( उप . ) उंच व किडकिडीत ( सुरेख नसणारी ) स्त्री . ४ एक झाड ; माथेशूळ . हे झाड सरळ पुरुषभर उंच वाढते . पाने कात्रेदार . यास हाताचे अंतरावर मुळापासून एकावर एक , फुलांनी युक्त असे झेंडू लागतात . या झेंडूवर तांबूस रंगाची बारीक फुले येतात . - वगु ४ . २२ . ०मूळक न. दिव्याची मूळ ज्योत . नातरी दीपमूळकी । दीपशिखा अनेकी । - ज्ञा १४ . ५५ . ०मूळक न. दिव्याची मूळ ज्योत . नातरी दीपमूळकी । दीपशिखा अनेकी । - ज्ञा १४ . ५५ . ०वडू पु. लहान दिवा . की दीपवडु अंधकार प्रकाशु करी । - ख्रिपु १ . १ . ६९ . ०वडू पु. लहान दिवा . की दीपवडु अंधकार प्रकाशु करी । - ख्रिपु १ . १ . ६९ . ०वत वात - स्त्री . ( कों . ) देवळांत दिवे लावणे ; देवळांतील दिवे लावणी . ०वत वात - स्त्री . ( कों . ) देवळांत दिवे लावणे ; देवळांतील दिवे लावणी . ०वती स्त्री. दिवा . प्रतापाची दीपवती । उजळोनी । - शिशु ७३९ . ०वती स्त्री. दिवा . प्रतापाची दीपवती । उजळोनी । - शिशु ७३९ . ०वृक्ष पु. १ दिव्याची ज्योत . दीपशिखा अनेकी । - ज्ञा १४ . ५५ . दीपावलि स्त्री . १ दिवाळी . २ दिव्यांची रांग . दिवाळी पहा . दीपाराधन न . आरती . दीपाराधने निलांजने । देव ओवाळिजे जने । - दा १६ . ५ . २७ . दीपन न . १ पेटविणे ; चेतविणे प्रज्वलित करणे . ( शब्दशः व ल . ). जे अग्नीचे दीपन । जे चंद्राचे जीवन । - ज्ञा १३ ९२६ . २ भूक वाढविण्यासाठी औषध ; शक्तिवर्धक औषध . ३ ताप ; आग . आंगी न लावा गे चंदन । तेणे अधिकचि होतसे दीपन । - एरुस्व ५ . ७२ . दीपिका स्त्री . १ दिव्याची ठाणवाई . २ लहान मशाल ; समई ; दिवटी . तरी दीपिका पाजळाव्या सत्वर । - रावि २७ . ६५ . ३ ज्योती . जे प्रपंचाची भूमिका । विपरीतज्ञानदीपिका । सांचली ते । - ज्ञा १५ . ८२ . दीपोत्सव पु . १ दिवाळी सण . दिवे लावण्याचा उत्सव . २ रोशनाई . ३ दिवाळे ; नादारी . दीप्त वि . १ पेटलेले ; चेतविलेले ; प्रज्वलित ; उज्ज्वल . २ चकाकणारे ; प्रकाशणारे . ३ ( ल . ) सुरेख ; नामी ; उत्कृष्ट . दीप्ति १ उजेड ; प्रकाश ; तेज ; कांति . कनकासवे जैसी कांति " की सूर्या सवे जैसी दीप्ति । - एरुस्व १ . ११ . २ अग्नि . दीप्ति , जठरी किरीटी । मीचि जालो । - ज्ञा १५ . ४०७ . दीप्तिमान वि . कांतिमान ; तेजस्वी . ०वृक्ष पु. १ दिव्याची ज्योत . दीपशिखा अनेकी । - ज्ञा १४ . ५५ . दीपावलि स्त्री . १ दिवाळी . २ दिव्यांची रांग . दिवाळी पहा . दीपाराधन न . आरती . दीपाराधने निलांजने । देव ओवाळिजे जने । - दा १६ . ५ . २७ . दीपन न . १ पेटविणे ; चेतविणे प्रज्वलित करणे . ( शब्दशः व ल . ). जे अग्नीचे दीपन । जे चंद्राचे जीवन । - ज्ञा १३ ९२६ . २ भूक वाढविण्यासाठी औषध ; शक्तिवर्धक औषध . ३ ताप ; आग . आंगी न लावा गे चंदन । तेणे अधिकचि होतसे दीपन । - एरुस्व ५ . ७२ . दीपिका स्त्री . १ दिव्याची ठाणवाई . २ लहान मशाल ; समई ; दिवटी . तरी दीपिका पाजळाव्या सत्वर । - रावि २७ . ६५ . ३ ज्योती . जे प्रपंचाची भूमिका । विपरीतज्ञानदीपिका । सांचली ते । - ज्ञा १५ . ८२ . दीपोत्सव पु . १ दिवाळी सण . दिवे लावण्याचा उत्सव . २ रोशनाई . ३ दिवाळे ; नादारी . दीप्त वि . १ पेटलेले ; चेतविलेले ; प्रज्वलित ; उज्ज्वल . २ चकाकणारे ; प्रकाशणारे . ३ ( ल . ) सुरेख ; नामी ; उत्कृष्ट . दीप्ति १ उजेड ; प्रकाश ; तेज ; कांति . कनकासवे जैसी कांति " की सूर्या सवे जैसी दीप्ति । - एरुस्व १ . ११ . २ अग्नि . दीप्ति , जठरी किरीटी । मीचि जालो । - ज्ञा १५ . ४०७ . दीप्तिमान वि . कांतिमान ; तेजस्वी .
|