|
न. चलन ; पैसा ; देवघेवीचे साधन ; नाण्याची किंमत प्रत्येक नाण्यांत असलेल्या धातूच्या किंमतीवर अवलंबून असते , नाण्याची स्वतंची किंमत करता येत नाही . तर त्यावरुन फक्त इतर पदार्थाची किंमत केली जाते . - टि १ . ७६ . २ मुद्रा , मोहोर , पुतळी , पैसा इ . रुपद्रव्य . [ स . नाणक ] पुन . एक जंगली झाड . याची पाने शिताफळीच्या पानांएवढी मोठी असून लांबट असतात ; लाकूड इमारती कामास उपयुक्त . ही कोंकणात फार होतात यांपासून स्थळांना नावे पडली आहेत . उदा० नाणेघाट , नाणेमावळ . इ . नाणावणे - अक्रि . १ नांवाजणे . २ नांव काढणे ; विख्यात होणे . नाणावलेला - वि . नांवाजलेला ; विख्यात . ०परीक्षक पु. नाण्याची पारख करणारा ; पोतदार . ०परीक्षा स्त्री. नाण्याची पारख करणे . ०शास्त्र न. जुनी नाणि मिळवून त्यांवरुन इतिहास संशोधणे . या शास्त्राचा इतिहासास फार उपयोग होतो . मुद्राशास्त्र . नाणवट न . १ टांकसाळीतून निघणार्या अनेक जातींच्या नाण्यांचा जमाखर्च . यांत नाणेउतार , कस , सौदागिरी जिन्नस इ० सर्व बाबी येतात . - अह १८३४ . २ नाणे . नानवट असेहि रुप येते . खरे नानवट निक्षेपीचे जुने । काढिले ठेवणे समर्थाचे ॥ - तुगा २०१२ . नाणवटी , नाणावटी , नाणेवटी , नाणवट्टी , नाणेवट्टी पु . ( गु . ) लोकांत धंद्यावरुन पडलेले आडनाव आहे . - स्त्री . सराफीचा धंदा . नाणवठा पु . नाणे विक्रीची जागा . नानवटा पहा . नाणेझाडा मेळ पु . ( सराफी ) रोजच्या तसेंच ठराविक मुदतीच्या निरनिराळ्या सदरांखालील नाण्यांच्या रकमांच्या देवघेवीसंबंधी हिशेब ; तसा हिशेब काढणे . ( क्रि० काढणे ; लावणे ; मिळविणे ; निघणे ; लागणे ; मिळणे ) ०बाजार पु. नाण्यांचा व्यवहार चालण्याचे स्थान . व्यापार खालावत आहे . तरी नाणेबाजार महाग करणे इष्ट नाही . - के २ . १२ . ३० . नाणेंभिड स्त्री . नाण्यांची अडचण , टंचाई ; नाण्याची बाजारांत कमतरता , दुष्काळ . नाणेवार क्रिवि . निरनिराळ्या प्रकारच्या नाण्यांत किंवा नाण्यांच्या रुपाने ( देणे , घेणे ). उदा० नाणेवार भरणा - इरसाल - पावती - शिल्लक . ०वारी वि. निरनिराळ्या चलनांत असलेल्या नाण्यांसंबंधी ; चलनांनी युक्त , बनलेले .
|