Dictionaries | References

पुर्सभर उदकां वचून सुकी काष्टी दाखवप

   
Script: Devanagari

पुर्सभर उदकां वचून सुकी काष्टी दाखवप

   (गो.) पुरुषभर पाण्यांत जाऊन लंगोटी कोरडी दाखवणें. वास्तविक ही गोष्ट शक्य नाहीं. पण कुळवाडी वगैरे लोक नदींतून उतरुन जायला लागले कीं जसजसें पाणी जास्त होईल तसतशी आपली लंगोटी वर सरकवूं लागतात. आणि त्यामुळें गळ्यपर्यंत पाण्यांतून जरी ते पलीकडे गेले तरी त्यांची लंगोटी कोरडी ती कोरडीच. कांहीं दुर्दैवी माणसें अशीं असतात कीं, जिथें संपत्तीचा ओघ वहातो अशा ठिकाणी जरी तीं गेलीं तरी त्यांच्या हाताला कांहीं लागत नाहीं. अशांना उद्देशून म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP