|
घोड्याची बाहात्तर अशुभ लक्षणें. हीं पुढीलप्रमाणें आहेत. अंसुढाळ किंवा अंसुपात, शृंगी, अंजनी ( चांदणी ) द्वयखुरी, कुखावर्त, एकांगुळ, त्रिकर्णी, थनी, हीनदंती, अंडावर्त, अधिकदंत, काळवदन, विक्राळ, पंचनखी, कराळ, अहीमुख, तुटपट्टा, वाणिया, वाशिंग, आसनखऊ, सर्मिंण, कृष्णांजनी, खानखऊ, गोमीपांच, हरिणांग, पित अंजनी, काखावर्त, सारभूकण ( सारभाजन ) एकांडी, काळांजनी, अंगावर्त, दाढशृंखळ, पुसावर्त श्वेतांजनी, लेंडावर्त शून्यमस्तक, ह्रदावर्त, नासावर्त, पोटावर्त, तळावर्त, शिळावर्त, नेत्रावर्त, भाळलोचन, व्याघ्रकांत कृष्णटाळू, कपिमुख जानूवर्त, आर्जळ कर्णमूळ, शिंपला, पंचनखी, मेंढसुख, खरमुख, रावामुख, कौस्तुकी, हयभंग, केरसुण्या, मध्यदंती, खुंटीउपाड अश्रुपात सेनाभंजन, ढाशी, पोटसूळ, खळतो, रातांधळ, लीदखातो, माथेशूळ, पडमुत, रक्त मुततो, पाण्यांत बसतो, चर्हाटे खातो, डसतो, बुजतो. याशिवाय इतर खोडी उतरड, चिमटा, डंकी, बोंबल्या, एका अंगावर झुलणें, बसला असतां उठतांना गुढगे टेकून उठणें, मगरुरी करणें, फार हिंडणें, मित्रेपणा, उड्या मारणारा, पळण्याची खोड, लाथ मारणें, भांडखोर, पुढें आलेल्या जिनसावरुन उडून जाणें, चावणें, दोन पायावर उभे राहणें, नालबंदी करुं न देणें, पंचवाख, बांधटीनाख ( हरिनाख ) उपानयन, जीनपाठक, तंगावर्त, मांडवर्त, चित्री, शाखी, दोसीना, रुईकांती, जंबावर्त, पंचवर्त गुदक, पापवर्ण.
|