|
पु. १ ठोक ; चोप ; ताडण . ( क्रि० देणें ). देते झाले वीर सुभद्राकृष्णाकुमार मारा ज्या । - मोभीष्म ७ . ३८ . २ बंदूक , तोफ इ० कांच्या गोळ्यांचा प्रक्षेप , हल्ला ; भडिमार . त्याच्या गुलालाचा मार । आमच्या वेण्या झाल्या लाल । - मसाप २ . ३० . ३ ( ल . ) हल्ला ; गर्दी ; कहर . ते तसें बोलतात , हे असें बोलतात . एकूण मला दोहोंकडून मार . ४ निग्रह करणें . मनाचा हन मारु । - ज्ञा ६ . २८९ . ६ विपुलता ; कडेलोट ; रेलचेल . सालमजकुरीं अंब्यांचा मार झाला आहे . ७ एखाद्या गोष्टीचा धबडगा , भारी प्रमाण . त्या विहिरीवर सगळे गांवाचा आठ दिवस मार पडतांच आटली . ८ क्रियेचा झपाटा , अतिरेक , निष्काळजीपणा दाखविणार्या भाषणसंप्रदायांत प्रकषार्थी व पादपूरणार्थी , योजतात . उदा० मार पगडी फेंकून , मार डौलानें चालतो . ९ न्यूनाधिक असणारें जमीनीचें माप . जसें - विठ्ठलपंती - रायरी - सुलतानी - मार . [ मारणें ] ( वाप्र . ) पु. मदन . मानी अहंकृति शिवे असि मार - माते । - वामन , रुक्मिणीविलास २ . [ सं . मृ = मरणें ] ( संक्षेप ) मजकूर . ०देणें १ जिंकणें . २ एखाद्यास चोपणें , ठोकणें . ०पडणें मारा पडणें ; हल्ला होणें . बहुकोस मागें सारिला मार पडली हुजरातिला । - ऐपो २८३ . ०बसणें माराला पात्र , विषय होणें ; मार मिळणें . ०मारणें देणें - निश्चयानें व नेटानें हल्ला करणें ( अभ्यास , काम इ०कांवर ). मार मार मारे मारे करणें फिरणें हिंडणें करीत फिरणें - आपलें दुःख सांगत फिरणें . ०कूट स्त्री. मारणें व धबकणें ; बुकलणें व कुटणें . [ मारणें + कुटणें ] ०कूट , झोड , पीट , माराकुटी करणें - क्रि . बेदम ठोकणें , मारणें ; पिटणें . [ मारणें + कुटणें ] ०खाऊ वि. नेहमीं मार खाणारा . ०गिरी - स्त्री . १ तोफांच्या किंवा बंदुकीच्या गोळ्यांचा हल्ला ; मारा ; भडिमार . २ लक्ष्य वेधण्याचें कौशल्य . ३ नेमक्या ठिकाणीं गोळा इ० जाण्याजोगी किल्ला इ० कांवर केलेली सोय . या किल्ल्याची चहूंकडून मारगिरी साधली . ४ माराचा प्रयोग ; मारा . [ मार + फा . गरी ] ०झोड - स्त्री . मारणें ; झोडणें ; कुदलणें . [ मारणें + झोडणें ] ०पकड स्त्री. लाठी खेळण्याच्या प्रकारांपैकीं स्वतःचें संरक्षण करावयाचा प्रकार . - के ३६ . ११ . ३५ . ०पीट - स्त्री . सडकणें व दांडकणें ; मारठोक ; मारहाण . [ मारणें + पिटणें ] ०वण स्त्री. ( एखाद्याकडून ) मारविण्याची क्रिया . जेथें नसे मारण । जेथें नसे मारवण । - यथादी २ . ५७६ . [ मारवणें ] ०हाण माराहाण - स्त्री . हाणणें व ठोकणें ; मारणें व सडकणें मार , जखम इ ०मारकट कणा मारका - वि . १ ( कों . ) हुंदाडण्यास , लाथा झाडण्यास संवकलेला . २ मारण्याची संवय , खोड असलेला . [ मारणें ] मारकोंडा , मारखुंडा - वि . ( व . ना . ) मारका , अंगावर धांवून येणारा ( बैल इ० ). मारका - पु . दबडगा व ओझें ; जीव घेणारा , लोळंवणारा , जमिनदोस्त करणारा ( विशेषतः कामाचा ) दबडगा . ( क्रि० लावणें ; पडणें ; बसणें ; असणें ). [ मार ] मारसा - वि . ( राजा . ) मारका ; हुंदाडण्याची व लाथा झाडण्याची संवय असलेला .
|