|
वि. मेजवानीस , भोजनास बोलावलेला ( मनुष्य , पाहुणा ). कुटुंबांतील आळशी व निरुद्योगी इसम . ( क्व . ) मेजवानी देणारा ( यजमान ). ( मेसमन या इंग्रजी शब्दाशीं साम्य जोडून चुकीनें ) खानावळवाला ; खानसामा . [ फा . मेझबान - मान ] मेजबानकी , मेजमानकी , मेजवानकी , गी - स्त्री . मेजवानी देणें ; जेऊं घालणें ; आदरातिथ्य , सत्कार करणें . आदरातिथ्य ; पाहुणचार . स्वागतखर्च . नजराणा पांच हजार रुपये सरकारांतून मेजवानगी पाठविली - ख ९ ४७४३ . [ फा . मेजबानी ] मेजबानी , मेजमानी , मेजवानी - स्त्री . सोयरेधायरे , संपत्तिमान लोक यांस आदरानें मिष्टांन्नभोजन घालणें . थाटाचें जेवण ; आतिथ्य ; मेहमानी ; नजराणा . अदवानीकराकडील वकील मेजवानी व वस्त्रें घेऊन आले आहेत । - ख ६ . ३०९६ . [ फा . मेझ्बानी ]
|