|
न. जग ; सृष्टि . तैसें व्यासमति कवळलें । मिरवे विश्व । - ज्ञा १ . ३९ . - वि . सर्व ; सगळें ; अचाट ; अगणित . [ सं . ] ०कर विश्वंकर - पु . सृष्टिकर्ता . ०कर्मा पु. १ ब्रह्मदेवाचा पुत्र व देवांचा शिल्पकार , सुतार , कारागीर . २ हुषार कारागीर ; शिल्पी . ०कारण न. ( काव्य ) सृष्टिनिर्माणकर्ता ; ब्रह्मदेव . ०कुटुंबवादी पु. सर्व जग हें एक कुटुंब असून सर्व लोक त्या कुटुंबांतील भागीदार आहेत असें मत असणारा . त्याचीं मतें नास्तिक्याकडे झुकत होतीं व तो जहाल विश्वकुटुंबवादी बनत चालला होता हें सुशीलेला ठाऊक नव्हतें . - सुदे २०६ . ०कुटुंबी पु. १ सर्वसृष्टि हें ज्याचें कुटुंब आहे तो परमेश्वर . २ ( ल . ) उदार आश्रयदाता ; जनकल्याणकर्ता ; मोठया कुटुंबाचा धनी . ०कोश पु. सर्व विषयांचें ज्ञान देणारा मोठा ग्रंथ . ०जनीन जनीय - वि . सर्वजगास योग्य , सोईस्कर , हितकर , लाभदायक , संबध्द . ०जित् पु. एका यज्ञाचें नांव ; जग जिंकणारा . ज्या विश्वजित् यज्ञांत यजमानानें आपलें सर्वस्व दान करावें असें सांगितलें आहे ... - टि ४ . ५१ . ०जीवन न. ( काव्य ) सृष्टीचा प्राण ; परमेश्वर . ०दुनी स्त्री. सर्वजग ; सर्वसृष्टि ; सर्व मानवजाति अलमदुनीया याप्रमाणें . देवा विश्वदुनीच्या भाग्यानें शेत पिको . [ विश्व + फा . दुनिया ] ०धाया पु. सृष्टीचा आधार ; परमेश्वर . ०नेत्र पु. सृष्टीचा , जगाचा डोळा ; परमेश्वर . ०पाल विश्वंभर - पु . जगाचें पोषणकर्ता ; जगाचें पालन करणारा ; परमेश्वर . ०प्रयत्न पु. अचाट प्रयत्न ; शक्य ते सर्व प्रयत्न . ०प्रामाण्य न. सर्व जगाला प्रमाण असें ; सर्व जगास योग्य वाटणारें तें . जे विश्वप्रामाण्याची मुदी । आणि तुझ्या हातें असे सुबुध्दी । - ज्ञा १६ . ४६८ . ०बाहु पु. ज्याचे हात सर्वत्र आहेत असा ; परमेश्वर . - ज्ञा १३ . ८७४ . ०बीज न. सर्वसृष्टीचें मूळ ; आद्यकारण ; परमेश्वर . ०ब्राह्मण पु. सुवर्णकार ; देवशिल्प करणारी जात . ०भेषज न. सार्वत्रिक औषध ; सुंठ . मध आणि विश्वभेषज हे पदार्थ दारूंत मिसळून द्यावेत - अश्वप २ . १३४ . ०मंगल न. सर्व सृष्टीचें कल्याण , सुख , सुदैव , शुभ . - वि . सर्वजगाचें कल्याण करणारा ; शुभदायक . ०मतिचालक पु. सर्व जगाच्या मनांत प्रेरणा करणारा ; सर्वांच्या बुध्दीस चालना देणारा . ०मूर्धा पु. ज्याचें डोकें सर्वत्र आहे असा ; परमेश्वर . - ज्ञा १३ . ८७८ . ०मोहिनी स्त्री. सर्व जगास भुरळ पाडणारी , भुलविणारी , मोहून टाकणारी . - ज्ञा १ . २१ . ०रचना स्त्री. सृष्टीची व्यवस्था ; घटना . - ज्ञा २ . ९५ . ०रूप वि. १ सर्व सृष्टीमधील वस्तूंचीं रूपें धारण करणारा ; सर्व सृष्टीमधील वस्तूंच्या रूपांत असणारा ; ब्रह्माचें उपपद . २ व्यापक ; महत्त्वाचा . म्हणतां जाय पाप । प्रश्न असे विश्वरूप । - गुच २६ . ९७ . ०विद्यालय न. विद्यापीठ ; अनेक विद्यांचें अध्ययन - अध्यापनादि कार्य करणारी संस्था . ( इं . ) युनिव्हर्सिटी . ०व्यापक व्यापी - वि . सर्वव्यापी ; सर्वत्र भरून राहिलेलें , सर्व वस्तुमात्राशीं संबध्द . ०व्याप्ति स्त्री. सर्व सृष्टीमध्यें भरून राहणें . ०संस्था स्त्री. ( ज्यो . ) सूर्य , चंद्र , ग्रह , तारे व इतर आकाशस्थ ज्योती ज्या आकाशाच्या प्रदेशांत कार्य करितात तो प्रदेश . ( इं . ) युनिव्हर्स . ०साक्षी वि. सर्व सृष्टीस पाहणारा . ०सृट् पु. सृष्टिकर्ता ; जग निर्माण करणारा ; ब्रह्मा . विश्वतः - क्रिवि . सर्व ठिकाणीं ; सर्वत्र . विश्वतश्चक्षु - पु . ज्याचे सर्वत्र डोळे आहेत असा , ज्याला सर्व दिसतें असा ; परमेश्वर . - ज्ञा १३ . ८७ . विश्वतोमुख - पु . सर्व बाजूंनीं ज्यास मुखें आहेत असा ; परमेश्वर . - ज्ञा ११ . २३३ . विश्वतोमुखीं - क्रिवि . सर्वांचें तोडीं ; सर्वतोमुखीं ; ज्याच्या त्याच्या तोंडी ; सर्वांच्या बोलण्यांत . विश्वाचा जिव्हाळा - पु . १ सृष्टीचाप्राण , जीव . २ ( संकेतानें ) शिव . विश्वात्मक - वि . सृष्टिस्वरूपी . - ज्ञा १५ . ५९५ . विश्वात्मा - पु . सृष्टीचा प्राण ; जगदात्मा ; सर्वव्यापी तत्त्व ; ब्रह्म . विश्वांप्रि - पु . ज्याचे सर्वत्र पाय आहेत असा . - ज्ञा १३ . ८७४ . विश्वानुसार - वि . सृष्टींतील पदार्थांप्रमाणें . - ज्ञा १६ . ९७३ . विश्वाभिराम - वि . जगाचा आवडता ; जगत्प्रिय ; परमेश्वर . विश्वाभिमान - पु . देह हा मी सर्व सृष्टि माझा भोग्य विषय होय असा अभिमान . विश्वेश - पु . सृष्टीचा स्वामी , मालक ; परमेश्वर . - ज्ञा १५ . ४० . विश्वेशराव - पु . सर्व सृष्टीचा प्रभु ; मालक ; परमेश्वर . - ज्ञा १८ . १८०१ . विश्वेश्वर - पु . १ सर्व सृष्टीचा प्रभु ; परमेश्वर . २ काशीक्षेत्रांतील मुख्य देवता . विश्वोदयपंथ - पु . माया . विश्वोध्दार - पु . सर्व सृष्टीचें रक्षण , तारण , उध्दरण . २ सृष्टितारक , रक्षक परमेश्वर . पु. सृष्टिकर्ता ; जग निर्माण करणारा ; ब्रह्मा . विश्वतः - क्रिवि . सर्व ठिकाणीं ; सर्वत्र . विश्वतश्चक्षु - पु . ज्याचे सर्वत्र डोळे आहेत असा , ज्याला सर्व दिसतें असा ; परमेश्वर . - ज्ञा १३ . ८७ . विश्वतोमुख - पु . सर्व बाजूंनीं ज्यास मुखें आहेत असा ; परमेश्वर . - ज्ञा ११ . २३३ . विश्वतोमुखीं - क्रिवि . सर्वांचें तोडीं ; सर्वतोमुखीं ; ज्याच्या त्याच्या तोंडी ; सर्वांच्या बोलण्यांत . विश्वाचा जिव्हाळा - पु . १ सृष्टीचाप्राण , जीव . २ ( संकेतानें ) शिव . विश्वात्मक - वि . सृष्टिस्वरूपी . - ज्ञा १५ . ५९५ . विश्वात्मा - पु . सृष्टीचा प्राण ; जगदात्मा ; सर्वव्यापी तत्त्व ; ब्रह्म . विश्वांप्रि - पु . ज्याचे सर्वत्र पाय आहेत असा . - ज्ञा १३ . ८७४ . विश्वानुसार - वि . सृष्टींतील पदार्थांप्रमाणें . - ज्ञा १६ . ९७३ . विश्वाभिराम - वि . जगाचा आवडता ; जगत्प्रिय ; परमेश्वर . विश्वाभिमान - पु . देह हा मी सर्व सृष्टि माझा भोग्य विषय होय असा अभिमान . विश्वेश - पु . सृष्टीचा स्वामी , मालक ; परमेश्वर . - ज्ञा १५ . ४० . विश्वेशराव - पु . सर्व सृष्टीचा प्रभु ; मालक ; परमेश्वर . - ज्ञा १८ . १८०१ . विश्वेश्वर - पु . १ सर्व सृष्टीचा प्रभु ; परमेश्वर . २ काशीक्षेत्रांतील मुख्य देवता . विश्वोदयपंथ - पु . माया . विश्वोध्दार - पु . सर्व सृष्टीचें रक्षण , तारण , उध्दरण . २ सृष्टितारक , रक्षक परमेश्वर .
|