Dictionaries | References

शेटी शेटी खंय वतां? म्हाड्डोळां म्हाड्डोळां ! शेटी शेटी खंय आसलो गा? मसणांत

   
Script: Devanagari

शेटी शेटी खंय वतां? म्हाड्डोळां म्हाड्डोळां ! शेटी शेटी खंय आसलो गा? मसणांत

   ( गो.) एक गृहस्थ म्हादोंळच्या जत्रेला जात असतां कुंडई गांवच्या चढणीवर दुसर्‍या एका माणसानें त्याला विचारलें कीं ‘ तूं कुठें चाललास ? ’ त्यावेळीं ‘ म्हाड्डोळा, म्हाड्डोळा,’ असें जोरांत उत्तर देऊन तो पुढें सरकला. त्यावेळीं त्याला उमेद होती कीं, जत्रेंतल्या जुगारांत आपण खूप पैसे मिळवूं आणि रात्रभर सर्व प्रकारची मजा करुं. पण प्रकार घडला उलटा. त्याचे सगळे पैसे जुगारांत खपले आणि रात्रभर वेडयासारखें भटकत त्याला जाग्रण करावें लागलें. सकाळीं परत घरीं जात असतांना त्याच चढणीवर दुसरा एक माणूस त्याला भेटून त्यानें विचारलें कीं, ‘ कुठें गेली होती स्वारी ? ’ तेव्हां ‘ मसणांत ! ’ असें त्याला उत्तर मिळालें. कारण कालचा त्याचा नूर यावेळीं पार ओसरला होता. माणूस उमेदीवर असला कीं त्याला कोणाचीहि पर्वा वाटत नाहीं आणि संकटें व हानि झाली कीं मग त्याला स्वतःच्या जिवाचासुद्धां उबग येतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP