|
पु. १ हिंदु धर्मांतील कांहीं विशिष्टा आवश्यक विधि . हे त्रैवर्णिकांकरितां आवश्यक मानतात . हे सोळा प्रमुख मानतात पण त्यांचीं नांवें निरनिराळीं आढळतात . उदा० गर्भाधान , पुंसवन , अनवलोभन , विष्णुबलि , सीमंतोन्नयन , जातकर्म , नामकरण , निष्क्रमण , सूर्यावलोकन , अन्नप्राशन , चूडाकर्म , उपनयन , महानाम्नी , समावर्तन , विवाह , और्ध्वदेहिक . विदेशी मेले मरणें । तयास संस्कार देणें । - दा २ . ७ . ७७ . २ शुध्दिकरण ; पवित्र करणें ; कोणत्याहि गोष्टीच्या शुध्दीकरतां करावयाचा विधि ; दोषापकर व गुणजनन . - केसरी २४ . १ . ३६ . ३ तयार करण्याची कृति ; क्रिया ; परिपाक ( स्वयंपाक , औषधि , रसायन वगैरे पचन , भाजणें , चूर्ण करणें , पुट देणें , भावना देणें वगैरे क्रियांनी ). ४ उजळा देणें ; पूर्ण करणें ; साफ करणें ; विशदीकरण करणें ( क्रिया , वस्तु वगैरे ). ५ रूपांतर , बदल , नवीन विशेष छाप , ठसा ( उठणें ); कार्य , परिणाम ( दिसणें ). [ सं . सम् + कृ ] ०रहित विरहित - वि . ज्याचे संस्कार झाले नाहींत असा . संस्कारणें - क्रि . संस्कार करणें ; क्रिया , कार्य करणें . संस्कर्ता - पु . संस्कार करणारा . संस्कार्य - वि . ज्याचा संस्कार करावयाचा आहे तो ; संस्कार करण्या योग्य . संस्कारित - धावि . संस्कार झालेला . संस्कृत - स्त्रीन . गीर्वाण भाषा ; व्याकरणनियमांनीं बध्द अशी भाषा . - धावि . १ ज्यावर संस्कार , कृति , क्रिया घडली आहे असा . २ शुध्दीकृत ; पक्व . ३ अलंकृत ; व्याकरणशुध्द ; उजळा दिलेलें ; विद्वत्तापूर्ण . संस्कृति - स्त्री . १ संस्कार ; क्रिया ; पूर्वत्व . २ मनुष्यांचे जाति अथवा राष्ट्रस्वरूपी जे संघ त्यांचें भाषा , शास्त्रज्ञानादि रूपानें व्यक्त होणारें चरित्र . ज्ञातिराष्ट्रादि संघानां साकल्यं चरितम् । मानवी जातीची वौध्दिक , धार्मिक , नैतिक , सामाजिक , सुधारलेली स्थिति .
|