|
पु. अजमास ; अंदाज ; गणती ; साधारण संख्या ; तर्क . ( क्रि० पहाणें ; काढणें ; करणें ; बांधणें ; येणें ; दिसणें ; होणें ). २ बेसुमार किंवा अंदाजाबाहेरची संख्या . विहिरीला पाण्याचा सुमारच नाहीं . ३ किमान मर्यादा ; मध्यम प्रमाण हा सुमारानें बोलतो . ४ निकटपणा ; सांनिध्य पौर्णिमेच्या सुमारावर या . ५ मर्यादा ; काळ . हा घोडा बसकणेच्या सुमारास आला . ६ भान ; शुध्दि . एवढा वेळ भलतेंसलतें बोलत होता , आतां सुमारावर आला . ७ प्रमाण ; नेम ; बेत . ८ रोंख . - वि . वाईट ; मध्यम प्रकारचें . हे आंबे सुमार आहेत . [ फा . शुमार ] सुमाराचा - वि . साधारण ; मध्यम प्रकारचा . सुमारणें - अक्रि . १ मर्यादेंत येणें , असणें . २ अंदाजापेक्षां जास्त होणें , भरभराटणें ( पीक , धंदा ). ३ किंचित फुगवटी येणें . सुमार माफक , सुमार वट - वि . सुमाराचा . सुमारी - वि . संख्येनें मोजतां येण्यासारखें , मापीच्या उलट . गणनीय ; संख्यवाचक . १ - स्त्री . सुमार पहा ( अर्थ ३ , ४ सोडून ). २ गणना ; गणती . खानेसुमारी . झाडसुमारी , गांवसुमारी , शेतसुमारी . सुमारें - क्रिवि . अंदाजे .
|