Dictionaries | References

१८

   { अष्टदश, अठरा }
Script: Devanagari

१८

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : अठारह, अठारह

१८

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : अठरा, अठरा

१८

Sanket Kosh | Marathi  Marathi |   | 
अष्टदश शाला (खाती - शिवकालीन)   
१ गजशाला, २ धान्यसंग्रह, ३ भेरीदुंदुभी, ४ यंत्रशाला, ५ विद्यशाला, ६ पारीयशाला ७ उष्ट्रशाला, ८ शिबिरशाला, ९ खेटकशाला, १० मल्लशाला, ११ रत्नशाला, १२ पाकशाला, १३ शस्त्रशाला, १४ तांबूलशाला, १५ रथशाला, १६ जिन्नसखाना १७ लेखनशाला आणि १८ नाटकशाला (पुण्यश्लोक शिवाजी महाराज).
अठरा ऋत्विज मनुष्यरूपी यज्ञाचे   
१-२ दोन डोळे ३-४ दोन कान, ५-६ दोन नाकाची भोकें, ७ एक त्वगिंद्रिय, ८-९ दोन हात, १०-११ दोनपाय, १२ एकमूत्रेंद्रिय, १३ एक गुद, १४ एक मुख, १५ वागिंद्रिय, १६ मन, १७ चित्त आणि १८ अहंकार, पुरुष म्हणजे मनुष्य हा एक यज्ञच आहे.
"पुरुषो वाव यज्ञः"([छांदोग्य ३-१६-१])
अठरा अति पुराणें   
१ कार्तव, २ ऋजु, ३ आदि, ४ मुद्रल, ५ पशुप्ति, ६ गणेश, ७ सौर, ८ परानन्द, ९ बृहद्धर्म, १८ महाभागवत, ११ देवी, १२ कल्लि, १३ भार्गव, १४ वासिष्ठ, १५ कौर्म, १६ गर्ग, १७ चण्डी व १८ लक्ष्मी.
अठरा अवतार श्रीशिवाचे   
१ लकुलीश, २ कौशिक, ३ गार्ग्य, ४ मैत्र्य, ५ कौरुष, ६ ईशान, ७ पारगार्ग्य, ८ कपिलाण्ड, ९ मनुष्यक, १० अपर कुशिक, ११ अत्रि, १२ पिङ्रलाक्ष, १३ पुष्पक, १४ बृहदार्य, १५ अगस्ति, १६ सन्तान, १७ राशीकर तथा आणि १८ विद्यागुप्त ([भारतीय वास्तुशास्त्र - प्रतिमाविज्ञान])
अठरा अक्षौहिणी दळभार   
११ अक्षौहिणी कौरावपक्षीय व ७ अक्षौहिणी पांडवपक्षीय असे अठरा अक्षौहिणी सैन्य भारतीय युद्धांत होतें,
एक अक्षौहिणी - २१८७० रथ, २१८७० हत्ती, १०९३५० पायदळ व ६५६१० घोडे. एकूण दोन लक्ष अठरा हजार सातशें, ([म. भा. भीष्म १६-२५])
अठरा आयुधें देवीचीं   
१ चक्र, २ त्रिशूळ, ३ शंख, शाक्ति, ५ शतघ्नी, ६ बाण, ७ धनुष्य, ८ वज्र, ९ घण्टा, १० दण्ड, ११ कमंडलु, १२ तलवार, १३ ढाल, १४ फरश, १५ पानपात्र, १६ कमल, १७ गदा व १८ कवच. ([देवी. भाग. स्कंध ५ अ. ८. ९])
अठरा आयुर्वेदसंहिता   
१ हारीत, २ सुश्रुत, ३ पराशर, ४ भोज, ५ भेड, ६ भृगु, ७ अग्निवेश, १४ आत्रेय, १५ अत्रि, १६ चंद्रमा, १७ शिव व १८ सूर्य.
अशा आयुर्वेदाच्या प्राचीन अठरा संहिता व शास्त्रकार होत. (हारितसंहिता)
अठरा उपधान्यें   
(अ) १ सजगुरा (बाजरी), २ भादली, ३ वरी, ४ नाचणी ५ बरग, ६ कांग, ७ खपले गहूं, ८ मका, ९ करडई, १० राजगिरा, ११ मटकी, १२ पावटा, १३ वाल, १४ मूग, १५ कारळ. १६ देवभात, १७ सातु आणि १८ अंबाडी.;
(आ) १ सजगुरा, २ नाचणी, ३ वरी, ४ मका, ५ मटकी, ६ राजगिरा, ७ शिरस, ८ पांढरफळी, ९ जिरे, १० मेथी, ११ वेणुबीज, १२ देवभात, १३ कमळबीज, १४ पाकड, १५ अंबाडी, १६ भेंडीबीज, १७ गोवारी आणि १८ कुड्डयाचें बीज.
यांत खसखस व पांढरा राळा धरून कोणी वीस संख्या मानतात. ([म. ज्ञा. को. वि. ६])
अठरा उपपुराणें   
(अ) १ भागवत, २ माहेश्वर, ३ ब्रह्मांड, ४ आदित्य, ५ पराशर, ६ सौर, ७ नंदिकेश्वर, ८ सांब, ९ कालिका, १० वारुण, ११ औशनस, १२ मानव, १३ कापिल, १४ दुर्वासस् ‌, १५ शिवधर्म, १६ बृहन्नारदीय, १७ नरसिंह व १८ सनत्कुमार ;
(आ) १ सन्त्कुमार, २ नृसिंह, ३ नंदी, ४ दुर्वास, ५ नारद, ६ कापिल, ७ मानव, ८ उशनस, ९ वारुण ; १० काली, ११ वासिष्ठलिंग, १२ माहेश्वर, १३ सांब्र, १४ सौर, १५ पाराशर, १६ शिव (धर्म). १७ मारिच व १८ भागवत (भार्गव);
(इ) ([देवी भागवत]) १ लघुकालिका, २ बृहत्कालिका, ३ पराशर, ४ सिंह, ५ नारद, ६ सनत्कुमार, ७ सौर, ८ दुर्वास, ९ कपिल, १० मानव, ११ विष्णुधर्मोत्तर, १२ शैवधर्म, १३ महेश्वर, १४ नंदी, १५ कुमार, १६ औशनस, १७ देवी व १८ वरुण (सर्स्वती कोश)
अठरा कारखाने   
१ उष्ट, २ खबुतर, ३ जनान, ४ जवाहीर, ५ जामदार, ६ चिकीर, ७ तालीम, ८ तोफ, ९ थट्टी, १० दप्तर, ११ दारू, १२ दिवान, १३ नगार, १४ पील, १५ फरास, १६ बंदी, १७ मोदी व १८ शिकार,
असे अठरा कारखाने मराठयांच्या राजवटींत सरकारी असून त्यांवर स्वतंत्र अधिकारी असत.
अठरा गृह्मसूत्रें   
१ बौधायन, २ आपस्तंब, ३ सत्याषाढ, ४ द्राह्यायण, ५ शांडिल्य, ६ आगस्त्य, ७ आश्चलायन, ८ शांभव, ९ कात्यायन ही नऊ पूर्वगृह्मसूत्रें आणि १० वैखानस, ११ शौनकीय, १२ भारद्वाज, १३ अग्निवैश्य, १४ जैमिनीय, १५ वाधूल. १६ माध्यांदिन, १७ कौंडिण्य व १८ कौषीतकी. ही नऊ अपरगृह्मसूत्रें होत. ([म. ज्ञा. को. वि. १२])
अठरा ज्योतिषशास्त्रप्रवर्तक   
१ सूर्य, २ पितामह, ३ व्यास, ४ वसिष्ठ, ५ अत्रि, ६ पराशर, ७ कश्यप, ८ नारद, ९ गर्ग, १० मरीचि, ११ मनु, १२ अंगिरा, १३ लोमश, १४ पुलिश, १५ च्यवन, १६ पवन, १७ भृगु व १८ शौनक.
लोमशः पुलिशश्चैव च्यव्नःपवनो गुरुः (भृगुः)।
शौनकोऽष्टादशैवैते ज्योतिःशास्त्रविशारदाह ॥ (सम्प्रदायवृत्तम् ‌)
अठरा तत्त्वें लिंगशरीराचीं   
१ बुद्धि, २ अहंकार, ३ मन, ५ पंचज्ञानेंद्रियें, ५ कर्मेंद्रियें व ५ पंचतन्मात्रा या अठरा तत्त्वाचें लिंग अथवा सूक्ष्म शरीर तयार होतें, असें वेदान्तशास्त्र मानतें.
अठरा दोष मोक्ष प्राप्तीच्या आड येणारे   
१ क्षुधा, २ तृषा, ३ जरा, ४ रोग, ५ जन्म, ६ मरण, ७ भय, ८ मद, ९ राग, १० द्वेष, ११ मोह, १२ चिंता, १३ अरति, १४ निद्रा, १५ विस्मय, १६ विषाद, १७ स्वेद व १८ खेद. ([रत्न - श्रावकाचार अ. १])
अठरा धान्यें   
१ गहूं. २ साळ, ३ तूर, ४ जव, ५ जोंधळा, ६ वाटाणा, ७ लाख, ८ चणा, ९ जवस, १० मसूर, ११ मूग, १२ राळा, १३ तीळ, १४ हरीक, १५ कुळीथ, १६ सांबा, १७ उडीद व १८ चवळी, यांत नऊ एकदल व नऊ द्विदल धान्यें आहेत.
गोधूमशालितुवरीयवयावनाल - वातनलंकचणकाअतसामसूराः ॥
मुद्रप्रियंगुतिलकोद्रवकाः कुलित्थाः। श्यामाकमाषचवला इतिअ धान्यवर्गः ॥ ([म. ज्ञा. को.])
अठरा नारू - अलुतेदार   
१ तेली, २ तांबोळी, ३ साळी, ४ सनगर, ५ शिंपी, ६ माळी, ७ गोंधळी, ८ डौरी, ९ भाट, १० ठाकर, ११ गोसावी, १२ जंगम, १३ मुलाणी, १४ वाजंत्री, १५ घडशी, १६ कलावंतु, १७ तराळ किंवा कोरबू आणि १८ भोई (गांवगाडा)
अठरा नांवें (श्रीगीतेचीं)   
१ गीता, २ गंगा, ३ गायत्री, ४ सीता, ५ सत्या, ६ सरस्वती, ७ ब्रह्मविद्या, ८ ब्रह्मवल्ली, ९ त्रिसंध्या, १० मुक्तिगोहिनी, ११ अर्धमात्रा, १२ चिदानंदा, १३ भवघ्नी, १४ भयनाशिनी, १५ वेदत्रयी, १६ परानन्ता, १७ तत्त्वार्थ व १८ ज्ञानमंजिरी.
गीता गङ्रगा च गायत्री सीता सत्या सरस्वती।
ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्या मुक्तिगोहिनी ॥
अर्धमात्रा मिदानंदा भवघ्नी भयनाशिनी।
वेदत्रयी परानन्ता तत्त्वार्थज्ञानमंजिरी ॥ ([कल्याण गीतातत्त्वांक])
अठरा नांवें (शिवाचीं)   
१ शिव, २ पशुपति, ३ मृत्युञ्जय, ४ त्रिनेत्र, ५ कृतिवास, ६ पञ्चवक्त्र, ७ शितिकण्ठ, ८ खण्डपरशु. ९ प्रमथाधिप, १० गङ्‌गाधर, ११ महेश्वर, १२ रुद्रा, १३ विष्णु, १४ पितामह, १५ संसारवैद्य, १६ सर्वज्ञ, १७ परमात्मा, व १८ कपाली. ([कल्याण शिवांक])
अठरा न्याय   
१ हंसक्षीर न्याय, २ उदंडापूप न्याय, ३ बीजांकुर न्याय, ४ लोहचुंबक न्याय, ५ वह्लिधूम न्याय, ६ स्थालिपुलक न्याय, ७ स्वाभिमृत्य न्याय, ८ रविघूक न्याय, ९ कूपमंङ्रक न्याय, १० सिंहावलोकन न्याय, ११ अरुंधतिदर्शन न्याय, १२ अंथचटक न्याय, १३ सूर्यजयद्रथं न्याय, १४ काकदंतगवेषण न्याय, १५ पंकप्रक्षालन न्याय, १६ पिष्टपेषण न्याय, १४ काकाक्षिगोलक, न्याय, व १८ घुणाश्वर न्याय,
असे अठरा न्याय, तर्कशास्त्रांत सांगितले आहेत. न्याय, म्हणजे निर्दोष विचारचर्चा, अनुमानें यांना अवश्य असे नियम.
अठरा पगड जात   
१ तांबट, २ पाथरवट, ३ लोहार, ४ सुतार, ५ सोनार, ६ कासार, ७ कुंभार, ८ गुरव, ९ धनगर, १० गवळी, ११ वाणी, १२ जैन, १३ कोळी, १४ साळी, १५ चितारी, १६ माळी, १७ तेली व १८ रंगारी,
अठरा पर्ठें (महाभारताचीं)   
१ आदि, २ सभा, ३ आरण्यक, ४ विराट, ५ उद्योग, ६ भीषम, ७ द्रोणा, ८ कर्ण, ९ शल्य, १० सौप्तिक, ११ स्त्री, १२ शांति १३ अनुशासन, १४ अश्वमेथ, १५ आश्रमवासिक, १६ मौसल, १७ महाप्रस्थान व १८ स्वर्गारोहण.
अठरा पक्कान्नें   
१ मांडे, २ वडे, ३ घृतपुर्‍या, ४ लडू, ५ तिळवे, ६ गुळवर्‍या, ७ तेळवर्‍या, ८ फेण्या, ९ कुरबंडीया, १० घार्‍या, ११ घारगे, १२ वडोरीया, १३ चोरवे, १४ वेठनीगे, १५ खांडवी, १६ शिखरणी, १७ सांजोर्‍या व १८ खिरी. ([क. क.])
अठरा पुराणें   
१ बृहद्विष्णु, २ शिव उत्तर खंड, ३ लघुवृहन्नारदीय, ४ मार्कंडेय, ५ वह्रि, ६ भविष्योत्तर, ७ वराह, ८ स्कंद, ९ वामन, १० वृहद्वामन, ११ वृहन्मत्स्य, १२ स्वल्पमत्स्य, १३ लघुवैवर्ण आणि पांच प्रकारचीं भविष्य पुराणें.
या सर्वां मिळून अठरा पुराणें होत.
अठरा पुराणें (वर्गीकरण)   
सहासात्त्किक - १ वैष्णव, २ नारदीय, ३ भागवत, ४ गारूड, ५ पाद्म व ६ वाराह, सहा राजस - १ ब्रह्मांड, २ ब्रह्मवैवर्त, ३ मार्कंडेय, ४ भविष्य, ५ वामन, व ६ ब्राह्म. सहा तामस - १ मात्स्य, २ कौर्म, ३ लिंग, ४ शैव, ५ स्कान्द व ६ आग्नेय ([भारत - दर्शन संग्रह])
अठरा पौराणिक विषय   
१ सृष्टि, २ प्रतिसृष्टि, ३ वंश, ४ बंशानु - चरित, ५ मन्वंतर, ६ आख्यान, ७ उपाख्यान, ८ गाथा, ९ कल्पशुद्धि, १० सिद्धान्त, ११ संहिता, १२ डामर (अद्‌‍भुंत) १३ जामल, १४ तंत्र, १५ ज्योतिश्चक, (खगोल), १६ भुवनकोश, (भूगोल) १७ वेद आणि १८ पुराण. (गीता विज्ञान भाष्य - भूमिका)
अठरा पंथ बौद्ध धर्माचे   
१ स्थविरवाद, २ महासंघिक, ३ गोकुलिक, ४ एकव्यवहारिक, ५ प्रज्ञाप्ति, ६ बाहुलिक, ७ चैत्य, ८ महींशासक, ९ व्रजीपुत्रक, १० धर्मोत्तरीय, ११ भद्रयानिक, १२ छन्नागरिक, १३ सम्मिति, १४ सर्वार्थवादी, १५ धर्मगुप्तीय, १६ काश्यपीय, १७ संक्रांतिक आणि १८ सूत्रवाद, (महावंस परिच्छेद ५)
अठरा प्रकार भूताचे   
१ देवग्रह, २ दैत्यग्रह, ३ गंधर्वग्रह, ४ सर्पग्रह, ५ यक्षग्रह, ६ ब्रह्मदग्रह, १२ औकिरणग्रह, १३ वेताळ, १४ पितृग्रह, १५ ते १८ गुरु, वृद्ध, ऋषि व सिद्ध यांचे शाप. ([वाग्भट अ. ४])
अठरा प्रकारचीं व्यसनें   
१ मृगया, २ जुगार, ३ दिवसा झोंप, ४ निंदा, ५ स्त्रियांबद्दल आसक्ति, ६ नशा करणें, ७ गीत, ८ वाद्य, ९ नृत्य, १० उगीचच भटकणें, ११ चहाडी, १२ वाईट काम, १३ विश्वासघात, १४ मत्सर, १५ द्वेष, १६ चौर्य, १७ कटु भाषण आणि १८ मारझोड करणें. (तत्त्व - निज - विवेक)
अठरा पकारचे सत्त्वगुण   
१ प्रीति, २ प्रसिद्धि, ३ उन्नति, ४ विनयशीलता, ५ सुख, ६ दैन्य न दाखविणें, ७ निर्मयता, ८ समाधान, ९ श्रर्द्धाळुपणा, १० क्षमा, ११ धैर्य, १२ अहिंसा, १३ शुचिर्मूतता, १४ अक्रोअध, १५ आर्जव, १६ समता, १७ सत्य व १८ निर्मत्सरता. ([म. भा. शांति - अ. ३४१ तळटीप])
अठरा प्रमुख उपनिषदें   
१० द्शोपनिषदें (१० चे अंकीं पाहा.) ११ श्वेताश्वतर, ११२ कौषीतकी, १३ मैत्रायणी, १४ बाष्कलमंत्रोपनिषद् ‌, १५ छागलेय, १६ आर्षेय, १७ शौनक आणि १८ जैमिनीय.
या प्रमुख अठरा उपनिषदांचा संकलित ग्रंथ - भगवद्नीता. ([भ. गी. साक्षात्कारदर्शन])
अठरा भार वनस्पति   
पृथ्वीवरील सर्व वृक्ष, वनस्पति यांस समुच्चयानें :- अठरा भार वनस्पतींची लेखणी. (व्यंकटेश स्तोत्र)
अठरा महारथी (पांडवाकडील)   
दहा हजार वीराशीं एकटा युद्ध करूं शकतो त्याला महारथी म्हणतात.- १ भीम, २ अर्जुन, ३ सात्यकि, ४ विराट, ५ द्रुपद, ६ धृष्टकेतु, ७ चेकितान, ८ काशिराज, ९ पुरुजित् कुंतिभोज, १० शैब्य, ११ युधामन्यु, १२ उत्तमौज, १३ अभिमन्यु, १४ प्रतिविंध्य, १५ श्रुतसोम, १६ श्रुतकीर्ति, १७ शतानीक आणि १८ श्रुतकर्मा, हे शेवटचे पांच द्रौपदेय होत.
अठरा महारथी (श्रीकृष्णपुत्रांत)   
१ प्रद्युम्न, २ अनिरुद्व, ३ दीप्तिमान्, ४ भानु, ५ सांब, ६ मधु, ७ बृहद्भानु, ८ चित्रभानु, ९ वृक, १० अरुण, ११ पुष्कर, १२ बेदबाहु, १३ श्रुतदेव, १४ सुनंदन १५ चित्तभानु, १६ विरूप, १७ कवि व १८ न्यग्रोध. भगवान् श्रीकृष्णाच्या पुत्रांत हे अठरा महारथी होते. 'तेषामुद्दामवीर्याणामष्टादश महारथाः ॥' ([भा. स्कं. १०. ९०-३२])
अठरा महापुराणें   
१ बाह्म, २ पद्म, ३ विष्णु, ४ शिव अथवा वायु, ५ भागवत, ६ नारद, ७ मार्कंडेय, ८ अग्नि, ९ भविष्य, १० ब्रह्मवैवर्त, ११ नृसिंह किंवा लिंग, १२ वाराह, १३ स्कंद, १४ वामन, १५ मत्स्य, १६ कूर्म, १७ गारुड आणि १८ ब्रह्माण्ड.
मात्स्यं च गारुडं चैव ब्रह्माण्डं च ततः परम् ।
अष्टादशपुराणानां नामधेयानि यः पठेत ॥
अष्ठादश पुराणें। तींची मणि भूषणें।
पदपद्धतिखेवणें। प्रमेय रत्नांचीं ([ज्ञा. ४-५])
अठरा पुराणकर्ते   
१ बकदालम्य - मस्त्य पुराण, २ मृकंडी - मार्कंडेय पुराण, ३ व्यास - भारत, ४ लोमहर्षण - भविष्योत्तर, ५ कूर्म - बृहन्नारदीय, ६ अगस्ति - ब्रह्मांड, ७ कश्यप - ब्रह्मवैवर्त, ८ भारद्वाज - वराहपुराण, ९ अंगिरा - वायुपुराण, १० श्रृंगऋपि - विष्णुपुराण, ११ कण्व - वामनपुराण, १२ अत्रि - आदित्यपुराण, १३ पराशर - लिंगपुराण, १४ पद्मऋषि - पद्मपुराण, १५ विभांडक - अग्निपुराण, १६ वसिष्ठ - कूर्मपुराण, १७ कर्तिक - स्कंदपुराण आणि १८ बृहस्पति - गुरुडपुराण, ([सिद्धान्तबोध अ. २३])
अठरा मर्म स्थानें (शरीरांतील)   
सर्व शरीरांतील बाय़ूचा निरोध करून त्याला शरीरांतील अठरा मर्मस्थानांच्या ठिकाणीं खिळून ठेवणें. या अठरा प्रत्याहार प्रेरणा होत. ([म. भा. शांति अ. ३७६])
अठरा मुनीश्वर   
१ जाबालि, २ नाचिकेत, ३ स्कन्द, ४ लोकाक्षि, ५ काश्यप, ६ लिखित, ७ सनत्कुमार, ८ शन्तनु, ९ जनक, १० ब्याघ्र, ११ कात्यायन, १२ बभरु, १३ जातुकर्ण्य, १४ कपिंजल, १५ बोधायन, १६ कणाद, १७ विश्वामित्र आणि १८ सुमन्तु. (यमलाष्टकतन्त्रम्)
अठरा जज्ञनामें   
१ अतियाज, २ अतिरात्र, ३ अनुयाज, ४ अश्वमेध, ५ इष्टापूर्त, ६ इष्टि, ७ उक्थ्य, ८ त्रिकद्रुक, ९ दर्शपैर्णिमास, १० परिवत्सर, ११ पशुयाग, १२ पितृयज्ञ, १३ पुरुषमेध, १४ प्रयाज, १५ प्रातःसव, १६ बृहस्पतीसव, १७ माध्यंदिनसव व १८ सोमयाग. ([ऋग्वेददर्शन]).
अठरा मंत्री विश्वराज्याचे   
१ जातवेदाअग्नि - शिक्षणमंत्री, २ इंद्र - युद्धमंत्री वा आंतर्बाह्म - संरक्षण, ३ उपेंद्र - उपयुद्धमंत्री, ४ रुद्र - सेनासंचलनमंत्री, ५ अश्चिनौ - आरोग्यमंत्री, ६ पूषा - पोषणमंत्री, ७ सूर्य - शोधनमंत्री, ८ भग - अर्थमंत्र, ९ विश्वकर्मा - उद्योगमंत्री, १० वास्तोष्पति - गृहमंत्री, ११ त्वष्टा - शस्त्रास्त्र - निर्माण - मंत्री, १२ ऋभु - लघुउद्योगमंत्री, १३ वरुण - नौका - युद्धमंत्री, १४ चंद्रमा - मानस समाधान मंत्री, १५ पर्जन्य - कृषिमंत्री, १६ वायु - जीवनमंत्री, १७ बल - संरक्षण मंत्री आणि १८ गुप्त -- संरक्षणमंत्री (पुरुषार्थ डिसेंबर १९६०)
अठरा योग (गीर्तेतील)   
१ अर्जुनविषादयोग, २ सांख्ययोग, ३ कर्मयोग, ४ कर्मबह्मार्पणयोग, ५ कर्मसंन्यासयोग, ६ आत्मसंयमयोग, ७ ज्ञानविज्ञानयोग, ८ अक्षरब्रह्मयोग, ९ राजविद्याराजगुह्ययोग, १० विभूतियोग, ११ विश्वरूपदर्शनयोग, १२ भक्तियोग, १३ क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग, १४ गुणत्रविभागयोग, १५ पुरुषोत्तमयोग, १६ देवासुरसंपद्विभागयोग, १७ श्रद्धात्रयविभागयोग आणि १८ मोक्षसंन्यासयोग. (अर्जुन उत्थानयोग - गीतातत्त्व मंजिरी) हे श्रीमद्भगवद्नीतेंतील अठरा अध्यायांत वर्णिलेले अठरा योग होत हे अठराहि योग मिळून गीतेचें योगशास्त्र होतें.
अठरा लक्षणें ज्ञानाचीं   
१ निरभिमानी, २ निष्कपट, ३ निरुपद्र्वी, ४ सहनशील, ५ सरल, ६ गुरुभक्ति, ७ निर्मलता, ८ द्दढनिश्चयी, ९ आत्मसंयमन, १० विषयवैराग्य, ११ अहंकाररहित, १२ जन्म, जरा, मृत्यु, वाधि आणि दुःख हे दोष आहेत असें समजणें, १३ अनसक्ति, १४ पुत्रदारागृहादिकांनाहि लिप्त नसणें, १५ स्थिरचित्तत्व, १६ एकनिष्ठभक्ति, १७ लोक समुदायाचा कंटाळा व १८ एकांताची आवड ([भ. गी. १३-७ ते १०])
मागा श्लोकाचेनि अर्धार्धें। ऐसें सांगितलें श्रीमुकुंदे।
ना उफराटीं इयें ज्ञानपदें। तेंचि अज्ञान ([ज्ञा. १३-८५३])
ज्ञानाचींच लक्षणें उलटीं केलीं म्हणजे तींच अज्ञान लक्षणें ठरतात.
एवं इयें अठरा। ज्ञान लक्षणें अवधारा। श्रीकृष्णें धनुधंरा, निरूपिली ॥ ([ज्ञा. अ. १३])
अठरा वादस्थानें (व्यवहारांत)   
१ कर्ज घेणें, २ ठेव ठेवणें, ३ धनी नाहीं अशा वस्तूंचा केलेला विक्रय, ४ समाईक व्यापार, ५ दिलेलें दान परत घेणें, ६ सेवकांचें वेतन, ७ केलेल्या संकेतांचे उल्लंघन, ८ विकत घेतलेली वस्तु पसंत न पडल्यानें उत्पन्न होणारा वाद, ९ धनी व गुराखी यांत जनावरांसबंधीं होणारा, वाद, १० ग्रामादि सीमा, ११ शिवीगाळ, १२ चोरी, १३ अपहार, १४ स्त्री, १५ स्त्री व पुरुषांची धर्मामध्यें व्यवस्था, १६ वडिलोपार्जित धनविभाग, १७ द्यूत आणि १८ पक्षीक्रीडा वगैरे बाबत, अशीं व्यवहारांत वाद उत्पन्न होण्य़ाचीं अठरा वादस्थानें आहेत.
स्त्रीपुंधर्मो विभागश्च द्यूतमाह्लय एव च।
पदान्यष्टदशैतानि व्यवहारस्थिताविह ॥ ([मनु. ८-७])
अठरा विद्या   
चौदा विद्या (चौदाच्या अंकीं पाहा) आणि १ आयुर्वेद, २ धनुर्वेद, ३ गांधर्व वेद आणि ४ अर्थशास्त्र हीं चार मिळून अठरा विद्या होतात.
आयुर्वेदो धनुर्वेदो गांधर्वश्वैव ते त्रयः।
अर्थशास्त्रं चतुर्थं तु विद्या ह्मष्टादशैव तु ॥ ([वायु. पूर्वार्ध. ३-६१])
अठरा व्यक्तिवैशिष्टयें - (श्री शिवछत्रपतीचीं)   
१ कमालीची ५ साक्षात्कारी, ६ आध्यात्मिक स्थायी भावाचा, ७ स्थितप्रज्ञ, ८ आपण यंत्र व ईश्वर यंत्री समजणारा, ९ भौतिक सुखाविषय़ीं उदासीन, १० अग्रगण्य मुत्सद्दी १२ विधायक बुद्धिमत्ता, १३ राजपुरुष, १४ श्रेष्ठसेनानी, १५ साहसी शूरयोद्धा, १६ सर्वंकषप्रतिभा १७ द्रष्टा व, १८ आजन्म - यशस्वी. (पु. छत्रपति शिवाजी भाग ४ था)
अठरा विदेशीय कालगणना (जगांतील विविध देशीय सन)   
१ चिनी, २ खताई, ३ पारसी, ४ मिश्री, ५ तुकीं, ६ आदम, ७ इसवी, ८ यहुदी, ९ इब्राहीम, १० मूसा, ११ युनानी, १२ रोमन, १३ ब्रह्मा, १४ मलयकेतु, १५ पार्थियन, १६ इराणी, १७ जावा आणि १८ घृताचि. (भारतीय साम्राज्य)
अठरा विर्श्वे दारिद्रय   
(अ) विसवा म्हणजे रुका अथवा पै याचा १-२० भाग म्हणजे कमालीचें दारिद्रय,
(आ) 'विश्वें ' हें 'विसा' या शब्दाचें अकारण संस्कृतीकरण आहे, 'वीस' ही संख्या गणनाचें एक परिमाण म्हणून ग्रामीण भागांत अजूनहि वापरलें जातें. अठरा विसा म्हणजे ३६०. दिवस म्हणजे वर्ष. वर्षाचे सर्व दिवस म्हणजे सदासर्वकाळ दारिद्र्य, हा भाव.
अठराअ व्यसनें   
१० कामवासनेपासून उत्पन्न होणारीं (१० च्या अंकीं पहा) ११ चहाडी, १२ दुस्साहस, १३ द्रोह, १४ ईर्ष्या, १५ द्वेष, १६ अपहरण, १७ कटु भाषाण आणि १८ अत्यंत मारपीट. हीं क्रोधापासून उत्पन्न होणारीं आठ, मिळून अठरा.
अठरा शिल्पशास्त्रप्रणेते   
१ भृगु, २ अत्रि, ३ वसिष्ठ, ४ विश्वामित्र, ५ मय, ६ नारद, ७ नग्नजित् ‌, ८ विशालाक्ष, ९ पुंरदर, १० ब्रह्मा, ११ कुमार, १२ नंदीश, १३ शौनक, १४ गर्ग, १५ वासुदेव, १६ अनिरुद्ध, १७ शुक्र आणि १८ बृहस्पति.
अष्टादशैते विख्याता शिल्पशास्त्रोपदेशकः।
संक्षेपेणोपदिष्टं सन्मनवे मत्स्यरूपिणा ॥ ([मत्स्य. २५२-४])
अठरा संख्यान पदें (संख्यागणनेचीं स्थानें)   
१ एकम्, २ दहम्, ३ शतम, ४ सहस्त्र, ५ दशसहस्त्र, ६ लक्ष, ७ दशलक्ष, ८ कोटि, ९ दशकोटि, १० अब्ज, ११ खर्व, १२ निखर्व, १३ महापद्म, १४ शंकु, १५ जलधि, १६ अंत्य, १७ मध्य व १८ परार्ध,
अशीं हीं दहाच्या पटीनें वाढणारीं अठरा संख्या पदें होत. हीच प्राचीन भारतीय दशमानपद्धति होय.
अठरा सिद्धि   
१ अणिमा, २ महिमा, ३ लघिमा, ४ प्राप्ति, ५ प्राकाश्य, ६ ईशिता ७ वशिता आणि ८ प्राकाम्य - या आठ स्वाभाविक सिद्धि आणि १ अनूर्मिमत्व, २ दूरश्रवण, ३ दूरदर्शन, ४ मनोजव, ५ कामनासिद्धि, ६ पर कायाप्रवेस, ७ स्वेच्छा मृत्यु, ८ सुरक्रीडादर्शन, ९ संकल्पसिद्धि आणि १० अकुंठितता.
या दहा गुणमूलक सिद्धि. या दोन्ही मिळून अठरा सिद्धि योगशास्त्रांत सांगितल्या आहेत.
सिद्धयोऽष्टादश प्रोक्ता धारणा योगपारगैः।
तासामष्टौ मत्प्रधाना दशैव गुणहेतवः ॥ ([भाग ११-१५-५])
अठरा सिद्ध पुरुष   
सिद्धि प्राप्त करुन घेणें हेंच मुख्य कर्तव्य मानणारे अगस्ति वगैरे अठरा सिद्ध पुरुष होऊन गेले. ते अधिकारी (सिद्धि व मुक्ति) दोन्ही प्राप्त झाल्या होत्या.
अष्टादश प्रसिद्धास्ते सिद्धिप्राधान्यवादिनः।
अगस्त्यप्रमुखाः सिद्धीस्त्वधिकारादुभे गताः ([रामगीता १६-१५])
अठरा सिद्धान्त (ज्योतिषशास्त्राचे)   
१ ब्रह्मसिद्धांत, २ सूर्यसिद्धांत, ३ सोमसिद्धांत, ४ वसिष्ठसिद्धांत, ५ रोमक, ६ पौलस्य, ७ बृहस्पति ८ गर्गासिद्धांत, ९ व्यास, १० पाराशर, ११ भोज, १२ वराह, १३ ब्रह्मगुप्त ' १४ सिद्धांतशिरोरोमणि, १५ सुंदरसिद्धांत, १६ तत्त्वविवेक, १७ सार्वभौमसिंद्धांत व १८ लघु आर्यसिद्धांत, असे अठरा सिद्धांत ज्योतिषांत मानले आहेत. (बर्जेस - सूर्यसिद्धांत)
अठरा सूक्तद्रष्टे ऋषि   
१ कक्षीवान् २ कवष, ३ गय, ४ गृत्समद, ५ गौरविति, ६ नाभाक, ७ नाभानेदिष्ट, ८ नोधा, ९ परुच्छेप, १० बरु, ११ भरद्वाज, १२ वसिष्ठ, १३ वामदेव, १४ विमद, १५ विश्वामित्र, १६ शार्यात, १७ सुकीर्ति व १८ हिरण्यस्तूप.
"ॠषयो मंत्रद्रष्टारः वसिष्ठादयः।" ([ऐ, ब्रा]) ([म. ज्ञा. को. वि. ३])
अठरा संख्याविशेष   
१ जाति अठरा,
२ पोषाख अठरा,
३ धान्यें अठरा,
४ उपधान्यें अठरा,
५ वनस्पति अठरा,
६ ज्योतिषी अठरा,
७ पुराणें अठरा,
८ महापुराणें अठरा,
९ अतिपुराणें अठरा,
१० उपपुराणें अठरा,
११ स्मृति अठरा,
१२ शिल्पशास्त्रप्रवर्तक अठरा,
१३ गीतोक्त योग अठरा,
१४ युगें अठरा,
१५ तत्त्वें अठरा,
१६ महापुराणकर्ते अठरा,
१७ सिद्धि अठरा आणि १
८ यज्ञांत ऋत्विज अठरा. ([छां. उपनिषद]).
असा अठरा संख्याविशेष भारतांत मानला आहे. त्यावरून भारताचे प्राचीन काळीं अठरा प्रमुख भाग असावेत असा तर्क आहे. (प्रा हिंदी शिल्पशास्त्रसार),
([महाभारतांतर्गत])-
१ महाभारताचीं पर्वें अठरा,
२ भारतांतर्गत भगवद्नीतेचे अध्याय अठरा,
३ भारतीय युद्ध अठरा दिवस झालें,
४ भारतीय युद्धांत सैन्य अठरा अक्षौहिणी होतें,
५ भारतीय युद्धानंतर अठरा वर्षांनीं व्यासांनीं महाभारत लिहिलें,
६ पांडवांकडील प्रमुख वीर अठराच होते,
७ भारतीय युद्धानंतर अठरा वर्षाणीं धृतराष्ट्राचें पतन झालें,
८ युद्धारंमीं अठराहि दिवस राजा युधिष्ठिरानें पतिव्रता गांधारीचा 'यतो धर्मस्ततो जयः' असा आशीर्वाद घेतला होता,
९ राजा जनमेजयानें परीक्षिताच्या मृत्यूचा सूड म्हणून पिपीलिका पर्वतावर अठरा दिवसांनीं पूर्णाहुति करावयाचा नरयाग आरंभिला,
१० या यज्ञांना अठरा ऋत्विज होते. पण त्यांजवर भगवंतांनीं मोहिनी घातली तेव्हां यज्ञकार्य बंद पडलें. जनमेययानें सिंचन केलेल्या जलकणांमुळें ते ब्राह्मण मृत झालें,
११ व्यासांनीं तीं अठरा प्रेतें मंडपांत आणून अठरा हात कृष्णवस्त्र मध्यें धरून वैशंपायनाकडून जनमेजयास भारत ऐकविलें, प्रत्येक पर्वाबरोबर एकेक हात कृष्णवस्त्र पांढरें होत गेलें. संपूर्ण अठरा पर्वें भारत ऐकल्यावर ते अठराहि ब्राह्मण जिवंत झाले.
व्यासगुरुआज्ञेप्रमाणें। भारत सांगितलें वैशंपायनें।
अठरा पर्वें संपूर्णं। अनुक्रमेंसी ॥ ([क. क. स्तवक ८-५-५५])
(आधुनिक) कवि मोरोपंत यांनीहि   
अठरा या संख्या संकेताचा आपल्या आर्या भारतांत कटाक्षाने उपयोंग केला आहे. आर्याभारताची पद्यसंख्या १७१३६ येतें. या संख्याची वेरीजहि अठराच. (रोहिणी आगष्ठ १९६३)
अठरा संदेष्टे (कुराणोक्त)   
१ आब्राहाम - इब्राहिम, २ इसाक, ३ जेकब - याकुब, ४ नूह, ५ दाऊद, ६ सुलेमान, ७ अय्युब, ८ युसूफ, ९ मोझेस (मूसा). १० हारून - हरून, ११ जकरिय्या, १२ याहया १३ जीझस, १४ इलियास, १५ इस्माईल, १६ अल्‌‍यस‌आ, १७ युनुस आणि १८ लूत,
हजरत महम्मद पैगंबरापूर्वी हे अठरा संदेष्ट होऊन गेले आणि त्या प्रत्येकाला ईश्वरानें एकेक पुस्तक दिले अशी कथा आहे. ([कुराण अ ६ ऋचा ८४ ते ८७])
अठरा स्मृतिकार   
१ विष्णु, २ पराशर, ३ दक्ष, ४ संवर्त, ५ व्यास, ६ हारीत, ७ शातातप, ८ वसिष्ठ, ९ यम, १० आपस्तंब, ११ गौतम, १२ देवल, १३ शंख, १४ लिखित, १५ भारद्वाज, १६ उशना, १७ शौनक आणि १८ याज्ञावल्वय.
'शौनको याज्ञवल्क्यश्च दशाष्टौ स्मृतिकारिणः।' ([सु.])
अठरा हावभाव (श्रृंगारचेष्टा)   
१ भाव, २ हाव, ३ हेला, ४ माधुर्य ५ धैर्य, ६ लीला, ७ विलास, ८ विच्छिती, ९ विभ्रम, १० किलकिंचित् ‌, ११ मोट्टायित, १२ कुट्टमित १३ विव्वोक, १४ ललित, १५ कुतूहल, १६ चकित, १७ विहत आणि १८ हास. (प्रतापरुद्र)

१८

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : अठार

Related Words

१८   १८ औ   १८ तारीख   १८ पद्म   18   xviii   eighteen   18th   eighteenth   पुल्लीबाल   पोत्रांगुल   सुवाड   जसा वस्‍ताद तसा शागीर्द   रोपीतक   भोमगति   खीचपुरी   काकटी   विळपणें   वृध्दि   चांचेपणा   पदप्राप्ति   सावाइकें   खेंश   काळिया नाग   उभीं   आसोसी   अगिटी   विशो   समिंदर   वोरखंडा   वोरखडा   अव्यत्यय   अस्ताव   अलांछन   अविरजी   दुणवटणे   टाहुवा   बोलणें ह्रदयांत राहणें   मेहरा   निकुंज   बिसाट   अणणु   दुभीनणे   ठाणोरी   ठाणौरी   आडऊ   आपदणें   आवर्ण   खालां   खालारा   खुतला   कांटस   कान्हाई   कान्हाडे   का मि क   काहळ   किड्डी   उत्कळित   उद्दीपणें   उधळमाख   उमाणी   उशिटणें   इज्जती   इद्रज   उताडा   करू   उसनें उगविणें   उसनें घेणें   उसनें फेडणें   उससा   ऊर्ध्वी   कोक्या   कीजी   कुंठवणें   कुठवणें   कुरोंडी   कुरौंडी   अंशिक   विजावळी   सर्‍हास   सलंछ   सवासन   सक्लेश   सप्रभव   समीननिमीन   श्रीराज   संन्याव   संसाटी   वह्याळ   वह्याळी   वोइरणें   वोडगस्त   शरारू   अत्यागी   अधोरंध्र   अनुक्षणीं   अव्यावस्त   अव्यावेस्त   असुरवाड   अन्यकारणक   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP