-
स्त्री. एक जमावर ; चानी ; खडी . ( प्र . खार ) - पृ . सापाची एक जात .
-
पु. १ लवण , मीठ ( खनिज , अथवा वनस्पतिजन्य , स्वाभाविक अथवा कृत्रिम ). संचळ , सैधव , सवागी , तुरटी इ० क्षार २ अघाडा , माठ , पोकळा . इ० वनस्पती जाळल्यांवर राहिलेली राख शिजवून तें खारवणी गाळुन त्यांची वाफ करुन काढलेला अशुद्ध क्षार . ३खारटपणा . ४ लोणच्यांतील द्रव पदार्थ . ' झोंबतो व्रणि जसाबहु खार .' - कमं २ . ५६ . ५ ( ल .) खरावी ; नुकसान ; तोटा . - स्त्री . १ आंब्याच्या मोहोर , वालाची फुलें इ० जळुन जाण्यासारखें अभ्रांतुन पाडणारें देव . खारी घूई . ( क्रि० येणें ; पडणें .) २ हवेंतील अतिशय गारवा ; घुई ; बादल हवा ( क्रि० सुटणें ; पडणें ; होणें .) ( खार ही वामळेपासुन भिन्न आहे , वामळ हिंवाळा व पावसाळा यामध्यें मोथा पाउस पडल्या नंतर पडते आणि खार पक्त हिंवाळ्यांतच पडते ). ३ क्षारापासुन येणारा ओलसरपणा , दमटपणा , लोणा ( भितीवर , जमिनीवर ). ४ खर ; पावसाच्या शेवटी संध्याकाळी आकाशांत दिसदिसणारें तांबडे ढग . ५ समुद्र हटवुन हटुण मिळालेली जमीन खारट ; खाजण . ६ खारी दलदल जमीन ; भाताची खारी , जमीन ७ ( ल .) तोटा ; नुकसान . - न . १ सुकविलेले खोर मासें . २ ( गो .) शेतास खत मिलण्यासाठी समुद्राचें किंवा खाडीचें शेतांत साठविलेलें पाणी . ०वि . खारट ; क्षारयुक्त . ( सं . क्षार ; प्रा . खार ) ( वाप्र .) ०खाणें -( ना .) द्वेष करणें ; पाण्यांत पाहणें . खारणें - अक्रि . क्षारयुक्त होणें ; क्षारानें विकृत होणें . ( जमीन , शेत ) लोणचें इ०च्या अंगी मीठ इ० चा क्षार मुरल्यामुळें त्यांनी क्षारसविशिष्ट होणें . - सक्रि क्षारयुक्त करणेम .
-
स्त्री. लहान मुलांच्या दस्तापिंजर या खेळांतील एक संज्ञा शब्द . तीन अंक . - व्याज्ञा १ . १४२ .
-
०पाडणे ( कों .) सम्द्राच्या भरतीखालील जमिनी शेतीच्या उपयोगी करणें .
Site Search
Input language: