-
पु. कवडीच्या जातीची मोठा , उंच व पांढरी शिंप .
-
वि. १ मोकळा ; उघडा ; बंदिस्त नसलेला ( माल , जागा , गठ्ठा ). २ बोडका , अनाच्छादिक ( अम्बारीविरहित हत्ती , खोगिराशिवाय घोडा , पलाणाखैरीज उंट ). ३ रिते ; खाली ; मोकळें ( भांडे , घर , जागा ). ४ मनमोकळा ; कुढा नसलेला . ५ ( ल .) अनिश्चित ; अनियत्रिंत ; स्वतंत्र . इ० लाक्षणिक अर्थ ; जसें - खुली मुदत - अनिश्चित व ठरविलेली मुदत ; खुली चाकरी - मनास येईल तेव्हा सोडतां येण्यासारखी चाकरी . ६ स्पष्ट ; उघड ; खडखडीत ; साफ ( भाषण ). ७ ( चंद्रपुरी ) फोड ; तुकडा ; काप . ८ ( व .) वाळविलेली फळभाजी ; उसच्या . ( अर . खुलास = मोकळा ; हिं खुला ) ०कागद - पु . मोकळा कागद . बंद न केलेलें पत्र .
-
०कारभार व्यापार धंदा काम - पुन मोकळा , उघडा उघड , प्रामणिक व्यापार , धंदा , काम - पुन . मोकळा उघडा उघड प्रामनिक सचोटीचा , चोख कारभार किंवा व्यवहार .
-
०पदर पु. सदाचारी ; निष्पाप वर्तन ( विवाहित स्त्रीच्या बाबतींत ). ' माझी खुला पदर आहे कोण खार लावितो ?'
Site Search
Input language: