-
पु. १ गतीचा जोर ; जोराची गति ; गतिमान् पदार्थाचा जोर . आणि मातलिया इंद्रियाचे वेग । - ज्ञा १६ . १९२ . २ त्वरा ; गडबड ; घाई ; झपाटा ; सपाटा ; जलदी . - ज्ञा २ . १७ . तुम्ही आतां वेग कीजे । नळाची शुध्दि लाविजे । - कथा १ . १० . ७५ . ३ आवेश ; जोर ; उत्साह . आटु वेगु विंदाणु । आशा शंका प्रतारणु । हे संन्यासिले अवगुणु । जिया वाचा । - ज्ञा १३ . २७१ . ४ वेदना ; कळ ; अंगांत भिनत असलेल्या बिषाच्या लहरी किंवा वेदनेच्या उसळया प्रत्येक ; पेटका . ५ मलमूत्र विसर्जनाची घाई ; गुदद्वारें मलविसर्जन होतांना येणारा आवेग , शीण ; जुलाब ; ढाळ . ६ हल्ला . कपीवीर चौताळला वेग केला । - राक १ . ६ . ७ एखादें काम करण्याची आकस्मिक उसळी , मनानें एकदम घेतलेलें वळण ; जोराचा उमाळा ; मानसिक शक्तीचा एकदम झालेला ; उद्रेक ; उसळी . ८ आधिक्य . [ सं . ] सामाशब्द - वेगत्तरू - क्रिवि . वेगवत्तर ; अतिवेगानें ; मोठया जलदीनें . घेऊनि निघाला बाहेरि । वेगत्तरू । - गीता २ . २३५५ . [ सं . वेगवत् + तर ] वेगमान - न . वेगाचें प्रमाण ; भ्रामकत्व . ( इं . ) मोमेटम . [ वेग + मान = मोजणी ] वेगमोड - स्त्री . वेग कमी करणारी वस्तु ; ढकली ; खर्डी ; घोरपड . [ वेग + मोडणें ] वेगलवार - पु . एक नोकर ; वेगंचार . - राव्य १ . १६ . वेगवतर , वेगवत्तर - क्रिवि . अति वेगानें ; ताबडतोब . कव्हणां नेणतां देवो चाले । कौंडण्यापुरा वेगवतरू । - धवळेपू २३ . ४ . वेगवंत , वेगवान् - वि . १ चपळ ; वेगानें जाणारा ; जलद धावणारा . २ जोराची गति असलेला ; मोठा वेग असलेला . वेगवती , वेगसंधी - स्त्री . घोडयाच्या गतीने निरनिराळे प्रकार . - अश्वप . १ . १८५ . वेगासार - क्रि . ( गो . ) लवकर . वेगा - क्रिवि . वेगानें ; वेगें . बिरडें घालूनिया वेगा । - मुसभा ९ . ८४ . वेगाघात - पु . जिनें चलनयुक्त पदार्थ दुसर्या पदार्थावर आपटतो ती शक्ति . हा वेगाघात पदार्थाचें प्रकृतिपरिमाण आणि वेग यांच्या गुणाकाराबरोबर असतो . - यंमू २१९ . वेगाडा , वेगाढा - वि . वेगवान् ; वेगवंत ; वेगाढय . वायेआं पासौनि बेगाडे । पर्वताहौनि दळवाडे । - शिशु ९ . ३४ ; गीता १ . ४५१ . पुढें जुंपिले सबळ घोडे । जे कां अनिळाहुनि वेगाढे । - ह २२ . ६३ . - ह २४ . १५ . [ सं . वेगाढय ] वेगाडा , वेगाढा , वेगाढें - क्रिवि . ( महानु . ) लवकर ; वेगानें ; त्वरेनें ; जोरानें . जेणें दोष माझे नाससी वेगाडे । तो अधिकार फुडे नाहीं मज । - ज्ञाप्र १३१ . यादव उठिले वेगाढे । रथीं जुंपिले जी घोडे । - एभा ३१० . वेगाडेपण - न . सवेगता ; अतिगतिमान् असण्याचा गुण . जैसें मनाचें वेगाडेपण । - कृमुरा २५ . १५५ . वेगातिशय - पु . वेगाचें आधिक्य . [ वेग + अतिशय ] वेगावत - क्रिवि . वेगानें . धांवति तो पोरें पळतां घरी वेगावत । - निगा ९३ . वेगाळ - वि . वेगवान् ; चांगली गति असलेला . वेगीं , वेगें - क्रिवि . त्वरेनें , वेगानें ; जलदीनें ; चटकन ; त्वरित . - ज्ञा २ . १७ . तात कोठें तो सांग मला वेगीं । - ध्रुवचरित्र ( नवनीत पृ . ४११ ).
-
ना. गडबड , घाई , जलदी , झपाटा , त्वरा , सपाटा ;
-
ना. आवेश , उत्साह , जोर , तडफ ;
-
.
Site Search
Input language: