-
भोकर कुल, बोरॅजिनेसी
-
भोकर कुल, बोरॅजिनेसी
-
भाकर, छोटा कल्प, धत्रंग (दत्रंग, अजानवृक्ष) त्रिपक्षी, गोंदणी, लिचरडी इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल याचा अंतर्भाव बेसींच्या पद्धतीत भोकर गणात (पोलेमोनिएलीझ) केला असून हचिन्सनच्या पद्धतीत भोकर गण (बोरॅजिनेलीझ) वरच्याहून अलग केला आहे. या कुलाची प्रमुख लक्षणे- फुलोरा- वृश्चिकाब वल्लरी, फुले द्विलिंगी, बहुधा नियमित, पंचभागी, पाकळ्या जुळलेल्या, नलिकाकार, विविधाकृति पुष्पमुकुट, केसरदले पाच व पाकळ्यास तळाशी चिकटलेली, दोन किंजदलांचा ऊर्ध्वस्थ किंजपुट, फळ अश्वगर्भी किंवा चार कपालिकांचे, वृंत्ताक कुल (सोलॅनेसी) व हरिणपदी कुल यांचे या कुलाशी आप्तभाव असून त्यांचाही अंतर्भाव याच गणात (पोलेमोनिएलीझमध्ये) केला जातो.
Site Search
Input language: