-
पु मल ; विष्ठा ; गू ( मनुष्य , पशु इ० चा ). [ सं . हद् ]
-
०ओक वक --- स्त्री . ( पटकीतील ) जोराचे ढाळ , ओकारी वगैरे . [ हगणें + ओकणें ] हगटणें --- अक्रि . ( क्रोध - तिरस्कारार्थी ) हगर्णे . ससें उठलें कुत्रें हगवलें . हगुटणें पहा . हगणवट --- न . जनावराचें गुदद्बारे . हगणें --- उक्रि . १ मल , विष्ठा शरीराबाहेर टाकणें ; मलविर्सजन करणें . २ बाहेर टाकणें , पडणें ( डोळ्यांतील चिपडें , पू ). ३ वर टाकणें - येणें ( समुद्रांतील घाण ) ४ वर , बाहेर फेंकणे , येणें ( जात्याचा खिळा ढिला झाल्यामुळें पीठ ). ( हें क्रियापद सकर्मक व अकर्मकहि आहे ). म्ह० हगल्या पेक्षां निपटणें बरें . हगंदरी , हगंदारी , हगदारी --- स्त्री . सार्वजनिक शौचाची जागा ; परसाकडेची जागा . जेथें मल , विष्ठा , घाण पडते अशी जागा . [ हगणें + दरी ]
-
.
-
०मुती मूत --- स्त्री . भीतींने , तीव्र वेदनेनें होणें . ( क्रि०सुटणें ; लागणें ) हगरड --- स्त्री . १ ढेंडाळी ; हगवण . २ विष्ठा . घाण इ० ढीग . हगरडा , हगरडें , हगिरडा , हगिरडें , हगुरडा , हगुरडें --- वि . १ शौच्याहून आल्यावर ढुंगण न धुतलेला . २ ( ल .) अपुरा ; अर्धवट राहिलेला ; मध्येंच बंद पडलेला ( काम , धंदा इ० ). ३ बिघडलेलं ; खराब झालेलें ( काम इ० ). ४ घाणेरडें ; ओंगळ ; किळसवाणें . ५ क्षुल्लक ; निरुपयोगी ; बिनकिंमतीचें . हगरा --- वि . १ सदोदित हगणारा . २ ( ल .) भिन्ना ; भ्याड . ३ ( व्यापक ) वाईट ; ओंगळ ; घाण ; किळसवाणी ( व्यक्ति , वस्तु , गोष्ट इ० ) ४ क्षुद्र ; गबाळ ; निरुपयोगी ; कुचकामाचा . हगरी रें --- स्त्रीन , १ शौचासाठीं केलेली व्यवस्था ; ठाकोली . २ शौचची लांदडी घडवंची ; गलबतावरील मलविसर्जनाची जागा . ३ या घडवंचीचें भोंक . ४ ( गुर्हाळ ) चुलाण्यांतील राख ज्या थारोळ्यांतून खाली पडतें त्याचें भोंके . ५ ( हगरी ) शेतांत ठिकठिकाणीं ठेवलेल्या खताच्या राशी - प्रत्येकी . ६ शेतांत खत न्यावयाच्या गाडीत खत भरण्यासाठी असलेल्या कुरकुलांचे मागील दार , झडप , हगरें --- न . ( अशिष्ट ) १ सोरा ; यवक्षार . २ टाईप पाडण्याचे यंत्र . हगली मुतली , हगर्लेमुतलें --- स्त्री . न . १ क्षुद्र ; बारीकसारीक गोष्ट ; लहानसहान चुका , अपराध , गैरवर्तन ( दुसर्याजवळ गार्हाणी केलेलें ). २ एखाद्याच्या साध्या , स्वाभाविक , खासगी गोष्टी . ( क्रि० सांगणे ; कानावर घालणें ; पाहणें ). हा दिवाण चाकर लोकांची हगलीमुतली राजाच्या कानावर घालतो . ३ ( लहान मुलाच्या ) हगण्यानें भरलेले कपडे ; गुवेलें . हगवण --- स्त्री . अतिसार ; वारंवार शौचास होणें . म्ह० फुकाची भाजी हगवणीस काळ . हगवणकर , हगवणकरी --- वि . हगवणीचा आजार असलेला . हगवणें , हगविणें --- सक्रि . १ शौचास , परसाकडेस बसविणें ( मूल इ० ). २ ( ल .) ओशाळणे ; लाजविणें ; गोंधळविणे ; दांत पाडणें . ३ नाश करणें ; नायनाट करणें ; घाबरुन सोडणें ; रडकुंडीस आणणे ; बिघडविणें ( सल्ला , युक्ति , धाडसाचें काम ). ४ बलात्काराने काढणें ; परत देण्यास भाग पाडणें ( पैसा इ० ) हगाड --- स्त्री . हगंदरी पहा . हगीरडामुतीरडा --- वि . हगरडा अर्थ १ पहा . हगिरडें --- न . फुरसें ( एक जातीचा साप ). हगीर --- वि . हगरा पहा . हगीरमुतीर --- वि . ( ल .) घाबरगुंडी झालेला ; अतिशय गोंधळलेला ; दु : ख भीति इ० मुळें देहभान सुटलेला ; पांचावर धारण बसलेला . हगुटणें --- अक्रि . १ परसाकडेस घाई होणें ; परसाकडेस लागणें . २ हगणें ; हगटणें पहा . ३ ( ल .) गर्भगळित होणें . ४ घाबरगुंडी उडणें ; उगीच घाईत असणें . [ हग + उठणें ] हगूट --- पु . परसाकडेची घाई . गुदद्वारावाटे नुकताच बाहेर पडलेला किंवा पडत असलेला मळ ; विष्टा . हगूर --- वि . हलका . हगेरा , हगोला --- वि . गुवानें भरलेला , बरबरलेला ( कपडा ). हगेंरें , हगोलें --- न . गुवानें भरलेलें वस्त्र , दुपटें ; गुवेलें . हग्या हगिया --- वि . १ शौचास बसलेला , निघालेला . २ शौचास नेण्याचा ( तांब्या , जोदा इ० ) दुराणी हगियांसी ( जोड्यांनी ) मारुं लागले . -- भाब १४० . ३ हगावयास लावणारा . ४ ( ल .) अतिशय जोराचा ( मार इ० ).
Site Search
Input language: