-
न. १ प्रत्येक वस्तुजातांत असलेल्या तीन गुण किंवा धर्म यांपैकीं ( सत्त्व , रज , तम ) पहिला . हा सर्व सद्गुणांचा द्योतक आहे . सत्त्वाथिलियां आंतु । सत्त्व मी म्हणे अनंतु । - ज्ञा १० . २८७ . २ अस्तित्व ; स्थिति ; भाव ; अर्थत्व . ३ पदार्थ ; वस्तु ; द्रव्य ( ज्याविषयीं कांहीं गुणधर्मांचें विधान करतां येईल असें द्रव्य , वस्तु ). ४ कस ; सार ; अर्क ; सारभूत अंश ; तत्त्वांश . नराच्या ठायीं नरत्व । जें अहंभाविये सत्त्व । - ज्ञा ७ . ३५ . गुळवेलीचें सत्त्व . ५ बल ; तेज ; अभिमान ; शक्ति ; तत्त्व ; जीवंतपणा ; पाणी . दिसतें सत्त्व असें कीं पडतां न चळेल हेमनगहि वर । - मोवन ४ . २६० . ६ स्वभाव ; स्वभाविक गुणधर्म . सत्त्व टाकिती भाग्यवंत सकळ । चोर पुष्कळ सूटले । - ह २९ . ३२ . ७ खरेपणा ; सद्गुण ; थोरपणा . आलिया अतितां म्हणतसां पुढें । आपुलें रोकडें सत्त्व जाया । - तुगा १२४८ . याचें स्थिर असो सदा सत्त्व । - मोसभा ६ . ४२ . [ सं . अस् ] सत्त्व घेणें , सत्त्व पाहणें - कसून परीक्षा घेणें ; प्रचीति घेणें ; एखाद्याचा बाणा किंवा अभिमान किती टिकतो याची परीक्षा पाहणें . सत्त्व सोडणें - बल , कस , जोर , भरीवपणा , स्वाभाविक गुणधर्म नाहींसे होणें ( जमीन , औषध , मंत्र , देव , मूर्ति वगैरे संबंधीं योजतात ). सत्त्वास जागणें - सत्त्व राखणें ; अडचणीच्या प्रसंगींहि आपला मूळ स्वभाव , सद्गुण , अभिमान , नीतिधैर्य , वर्तन यांपासून न ढळणें . सत्परिचयेंच जडही समयीं सत्त्वास जागलें हो तें । - मो .
-
०गुण वि. सत्त्वगुण ज्यांत विशेष आहे असा .
-
०धीर वि. सत्य , इमान , औदार्य , पातिव्रत्य इत्यादि सद्गुण ; धैर्यशील ; दृढनिश्चयी .
-
०निष्ठ वि. सत्त्व न सोडणारा ; सद्गुणी ; सचोटीचा ; प्रमाणिक वगैरे .
Site Search
Input language: