-
वि. १ चिन्हित ; खुणा केलेलें . ' कां मातापितर मरणें । अंकित जे दिवस ॥ ' - ज्ञा १८ . ११० . २ मर्यादित ; सांगितलेलें ; ज्याचा मार्ग किंवा वागण्याची रीत ठरवून दिली आहे असा . ३ सेवक . ( अंकित = खुणा केलेला , राजाच्या सेवकाच्या अंगावर कांहीं तरी सेवकपणाचें चिन्ह असतें त्यावरून ); ताबेदार ; गुलाम . ' जो श्रीहरीभजनी होईल रत । कळिकाळ अंकित होय त्याचा । ' तैसा मी संताचा अंकित । ' - दा १ . ६ . २० . ४ वश ; आज्ञा उल्लंघन न करणारा . ' केलीं नारायणें आपुलीं अंकित । तोचि त्यांचें हित सर्व जाणें । ' - तुगा ११ . सामाशब्द आज्ञांकित = आज्ञेनुसार वागणारा ; श्रमांकित = थकलेला ; नियमांकित ; पापांकित . ( सं .)
-
वि. आधीन , कह्यात , गुलाम , ताब्यात , वश ;
-
adjective ज्याच्यावर एखादी खुण केलेला आहे असा
Ex. मजकुरातील महत्त्वाचे शब्द लाल शाईने अंकित केले आहेत
-
Wifegoverned; henpecked; नियमांकित, नीत्यंकित, पापांकित, पुण्यांकित, कर्मांकित, श्रमांकित, क्लेशांकित, शोकांकित, सुखांकित, दुःखांकित, रूद्यंकित, योगांकित, विषय-वासना-व्यसन- भक्ति-भाव-कपट-क्रोध-लोभ-काम-मोह-मद-मत्सर-रस- माया-प्रेम-गर्व-अभिमान-विनय-ज्ञान-बुद्धि-स्वामी-पति- शास्त्र-सूत्र-अंकित. From this sense Marked out, arises the popular acceptation Subject or obedient unto. Ex. जो श्रीहरीभजनीं होईल रत॥ कळिकाळ अं0 होय त्याचा॥
Site Search
Input language: