-
वि. ( वयाने ) लहान ; कनिष्ट . येथ सत्त्व ते उत्तम । रज ते मध्यम । तिहीमाजी तम । साविया धारे । - ज्ञा १४ . १३९ . मोठा सर्वातहि हा होय महावीर पांडव , न धारा । - मोभीष्म १२ . २२ . [ प्रा . धार = लहान , छोटा ]
-
स्त्री. १ ( शस्त्र इ० कांची ) तीक्ष्ण कड , धार . तंव दापतियां धारांचे । सुदर्शन काढिले डांबेचे । - शिशु १०७८ . २ ( शस्त्र इ० कांचे ) पाते , पान . लोखंडाचे एक शस्त्र त्याला तीन धारा । - भज ४७ . [ सं . ]
-
स्त्री. १ धार ; पाणी , पाऊस इ० जोराने पडतांना , फुटक्या भांड्यांतून पाणी , द्रवपदार्थ गळतांना दोरीसारखा दिसणारा पाण्याचा , द्रवपदार्थाचा आकार . २ प्रवाह . ३ वर्षाव . मजवरी फिरली हे दैवदुर्वारधारा । - सारुह ३ . ७३ . ४ विवाह समारंभातील स्वर्णाभिषेकाचे द्रव्य . ५ ( ल . ) संतति ; प्रजा . [ सं . ]
-
पु. १ ( भाडे , विक्री , चाकरी , धंदा इ० व्यवहाराविषयीचा ) संप्रदाय , शिरस्ता , वहिवाट , नियम . शिवाजी महाराज यांचे वेळचे धारे यांनी राज्य चालवावे . - मराचिथोशा ३२ . दहा कोसांस एक रुपया द्यावा असा आमच्या गांवांत भाड्याचा धारा पडला आहे . २ ( शेत जमीन , बागाईत इ० कांवरील ) सरकारी कर , वसूल , सारा . [ सं . धृ ; म . धारा ; प्रा . धार . हिं . धारा ; गु . धारो ] सामाशब्द -
Site Search
Input language: