-
न. कलीचें राज्य . कलियुग . ' कालांतरानें सत्ययुग संपुन जिकडेतिकडे कल्याण झालें .' - भुभ्र ३१७ . ( सं . कलि + आयान )
-
न. १ क्षेम ; कुशल ; शुभ ; चांगलें ; बरें ; हित ; फायद्याची गोष्ट . ' चित्तीं धरीं जो हें बोल । त्याचें कल्याण होईल । ' २ गायनांतील एक थाट ; राग . राग पहा . यांतील स्वर शुद्ध षड्ज , शुद्ध ऋषभ . शुद्ध गांधार , तीव्र मध्यम , शुद्ध पंचम , शुद्ध धैवत व शुद्ध निषाद . ' कल्याण गोडी श्रीराग । मुरलींत आवळीं श्रीरंग ' - ह १० . ११७ . ' दीप भूप कल्याण तूं गातां प्रकाश सार्या स्थळीं पडतीं । - प्रला १३७ . ३ श्रीसमर्थ रामदास स्वामीचा पट्टशिष्य ; याचें मूळ नांवं अंबाजी , गांव डोमगांव , हा ब्रह्माचारी होता . समार्थांनीं सांगून यांनीं दासबोध लिहिला .( यावरुन लक्षणेनें ) पट्टशिष्य . ' केसरीकारांस रावबहादुरांचा मत्सर झाला आहे . इत्यादि कांहीं कुत्सित कल्पना रा . ब च्या कल्याण शिष्यानें काढल्या . ' - टि ४ . ४ . ४ ( द्राविड ) लग्न . ' शके १६०४ मध्यें लक्ष्मीनारायण कल्याण नावांचें एक मराठी नाटक तंजावर येथें रचलें गेलें . ' येणें रीती नांद्यारंभ करून लक्ष्मीनारायणकल्याण नाटक निर्विघ्नसिद्धि सर्व जनास संतोष देवो .' - ग्रंथमाला .
-
Well-being, welfare, weal. 2 m A Rág or musical mode. See राग.
-
ना. कुशल , चांगले , बरे , भले , मंगल , शुभ , हिताची गोष्ट , क्षेम .
Site Search
Input language: