|
प्राथमिक कोशिका भित्ति कोशिकेतील जीवद्रव्याची पूर्ण वाढ होईपर्यंत असलेले, पातळ, कमी सेल्युलोजाचे, अधिक पेक्टिनचे व अस्तरित (थर नसलेले) आवरण, हे पुढे आवरणाची जाडी वाढल्यावर मध्यपटल म्हणून राहते. p. mycelium प्राथमिक कवकजाल गदाकवकांचे गदाबीजुक रुजून निर्माण झालेले एकगुणित कवकतंतू पहा Basidiomycetes. p. node प्राथमिक पर्व बी रुजून वाढ होत असताना दलिकांचे अक्षावरील उगमस्थान. p. sere प्राथमिक क्रमक वनस्पतींच्या भूमीवरील समुदायाच्या अनुक्रमणातील (विकासातील) आरंभीच्या अवस्थेतील समूह, या भूमीवर वनस्पतिसमुदाय अलीकडच्या भूशास्त्रीय कालात कधीही नव्हता. पहा succession, sere p. succession प्राथमिक अनुक्रमण अनावृत्त (अव्याप्त, नवीन) भूमीवर आरंभ झालेला वनस्पतींच्या समूहाचा विकास पहा bare area p. trisomic प्राथमिक त्रिसमसूत्री शरीरातील कोशिकेत नित्य आढळणाऱ्या दुप्पट रंगसूत्रांच्या संचाबरोबर, त्यातील एखाद्या जोडीत एक अधिक (म्हणजे एकूण तीन) असण्याचा प्रकार, पहा monosomic
|