|
चामरकल्प फुलोरा चवरीसारखा, एका बिंदूतून अनेक फुले निघालेली, तथापि सर्वात लहान (कोवळी) फुले मध्यभागी व सर्वात जून बाहेरच्या बाजूस अशी मांडणी (व उमलण्याचा क्रम) असलेला अकुंठित फुलोरा, उदा.रूई, कांदा, कोथिंबीर, लोखंडी (Memecylon umbellatum Burm.) u. compound संयुक्त चामरकल्प फुलोरा साध्या चामरकल्प फुलोऱ्यातील प्रमुख अक्षावरच्या टोकास असलेल्या अनेक दुय्यम अक्षावर साधे चामर कल्प फुलोरे येऊन बनलेला अकुंठित फुलोरा (अभिमध्य) उदा. गाजर, ओवा इ. u. cymose कुंठित चामरकल्प फुलोरा सकृद्दर्शनी चवरीसारखा, परंतु अपमध्य (फुलांच्या उमलण्याचा क्रम केंद्राकडून परिघाकडे) असलेला फुलोरा, उदा. भांड (Geranium) पेलार्गाएनियम, नार्सिसस. indefinite racemose inflorescence.
|