-
पु. १ हिंडणें ; फिरणें ; भ्रमण ; वापर . जेथे संचार राक्षसांचा । - गुच २९ . ८ . २ अंगात येणें ; भूतपिशाच्चादिकानी व्यापणें . भूतसंचार , विषयसंचार , वातसंचार . भूतसमंधी संचार अंगी वसे । - दा २ . ३ . २४ . देखा मंत्रज्ञु बरळु जाय । मग तेथ का तैसा संचारु होय । - ज्ञा १ . १९० . ३ प्रवेश ; रिघाव ; गति . म्हणोनि वर्तता तेथ पापा । संचारु नाही । - ज्ञा ३ . ८१ . ४ दूरान्वय ; स्खलन ; दोष ; विस्तार ; विषयांतर . आत्मस्तुती होतां । संचार असे । - ज्ञा १२ . २१७ . ५ पाठांतरांतील चूक ; दोष ( क्रि० जाणें ). [ सं . संचर ] संचारणें - उक्रि . प्रवेश करविणें ; शिरकावणें ; घुसविणें . - अक्रि . संचरणें पहा . संचारलेखन - न . मध्यस्थाकडून आपोआप केलेले लेखन . ( इं ) ऑटोमॅटिक राइटिंग . संचारिका - स्त्री . मध्यस्थ स्त्री ; दूती . संचारित - धावि . गति दिलेलें ; भ्रामित ; व्यापिलेले ; घुसलेले . संचारी - पु . ( संगीत ) चीजेचा तिसरा भाग . संचारी वर्ण - पु ( संगीत ). स्थायी , आरोही व अवरोही यांच्या मिश्रणानें झालेला वर्ण .
-
ना. फिरणे , भ्रमण हिंडणे ;
-
m Penetration into and occupation of, pervasion; as भूतसंचार, विषसंचार, वातसचार. Lively motion or action in; passage, progress.
-
Penetration into and occupation of; pervasion; as भूतसंचार, विषसंचार, वातसंचार. 2 Stirring about in; lively motion or action in. 3 Passage, progress, advance made into. 4 A slip; a turn aside; a devious or erring step; esp. a slip or blunder in a recitation. v जा g. of s.
Site Search
Input language: