-
verb पंचा, धोतर, साडी इत्यादींसारखे न शिवलेले वस्त्र कंबरेभोवती विशिष्टप्रकारे गुंडाळणे
Ex. आज तिने मी दिलेली साडी नेसली.
-
न. १ ( ढुंगणाभोवती ) नेसायचे कटिसंबद्ध वस्त्र . सावरितां नेसणी । हांसे होतुसे । - शिशु ५३६ . २ अंगाला गुंडाळण्याची , अंगावर चढविण्याची , नेसण्याची क्रिया . ( क्रि० करणे ). हिचे नेसण होईल तेव्हां पाणी देईल . [ सं . निवस - निअस - न्येस - नेस - भाए १८३३ ] नेसणे - उक्रि . ( पंचा , धोतर , लुगडे इ० कटिवस्त्र ) परिधान करणे ; कंबरेभोवती गुंडाळणे . मुसळ नेसणे - निर्लज्ज होऊन दुर्भाषण , दुष्कर्म इ० करुं लागणे . नेसविणे - उक्रि . १ दुसर्याला धोतर वगैरे परिधान करविणे . २ ( ल . ) ( जमाखर्च ) खात्यावर चढविणे . लिहिणे ; खाती मांडणे . माझ्या भावाच्या नांवाखाली ज्या रकमा आहेत त्या माझ्या नांवाखाली नेसीव . ३ तपशीलवार खर्च लिहिणे ( मुख्य कलम व पोटकलमे इ० सर्व लिहिणे ). वर अमुक कलम ल्याहा या खाली ही कलमे नेसवा . ४ आगीने पेटविणे ; आग लावून देणे ( किल्ला , डोंगर , रान , जमीन इ०स ). ५ शाकारणे ( घर ).
-
noun नेसण्याची क्रिया
Ex. धोतर नेसणे त्याला कठीण जात होते.
Site Search
Input language: