-
न. १ ( क्रियेचें आधिक्य , जोर किंवा पदार्थांची रेलचेल दाखविण्यासाठीं अनियमितपणें या शब्दाचा उपयोग करतात ) धांगडधिंगा ; धुमश्चक्री ; खिदडा ; धुडगूस . ( क्रि० घालणें ; मांडणें ). २ चमचमाट ; खाणें , पिणें , गाणें , बजावणें इ० प्रकारांची चैनबाजी ; धूमधडाका . ३ ( पावसाची , खाद्यपदार्थाची , पिकांची ) रेलचेल ; चंगळ ; लयलूट ; समृध्दि ; विपुलता . साहित संगीत प्रसंग मानें । करावीं कथेचीं घमशानें । - दा १८ . ३ . १८ . त्याच्या घरीं खाण्यापिण्याविषयीं तोटा नाहीं , घमशान आहे . ४ दांडगाई ; लाथाळी ; तुडावणी . माझ्या अंथरुणावर घमशान घालून दुर्दशा करून टाकली . ५ पराभव ; फडशा ; धुव्वा ( वाद , शिवीगाळ इ० मध्यें ). - वि . १ धिप्पाड ; भक्कम ; धटिंगण ; दांडगा ( मनुष्य ). २ भव्य ; शोभिवंत ; छानदार ; नामी ( इमारत इ० ). ३ भक्कम ; दणगट ; मजबूत ; टिकाऊ ( कापड , दोर इ० ). ४ घमंडानंदन ; विलासी ; चैनबाज ; खुशालचंद ( मनुष्य ). [ तुल० सं . घोर + श्मशान ? हिं . घमसान = तुंबळ युध्द ; गु . घमशाण = नासाडी , धुडगूस ; सिं . घम्शानु = गर्दी , गडबड ; सं . घस्मर ? ]
Site Search
Input language: