-
m A sudden push; a shock. A loss in trade. A wharf. A parapet wall.
-
पु. १ एकदम , आकस्मित लागणारा हिसका ; ढका ; गचका ; हिसडा ; आंचका . ( क्रि० लागणे ; लावणे ). २ ( एका पदार्थाचा दुसर्यावर झालेला , केलेला ) प्रहार ; आघात ; तडाखा . ३ ( ल . ) ( एखादा व्यवहार , पदार्थ इ० कांत झालेली , आलेली ) अनिष्टापत्ति ; नुकसानी ; खराबी ; हानि . यंदा पाऊस चांगला न पडल्यामुळे पिकास धक्का बसला . ४ ( पाणी , वारा इ० कांचा नेट सांभाळण्यासाठी गलबत इ० किनार्यास लागण्याच्या सोयीसाठी ) नदी , समुद्र इ० कांच्या किनार्यावर बांधलेली भिंत , चौथरा , कट्टा . ५ प्रवाशांना विसाव्यासाठी , ओझी इ० खाली उतरुन ठेवण्याच्या सोयीची ( डोंगर इ० कांतील ) रस्त्याच्या , कडेलोटाच्या कडेला बांधलेली कठड्याची भिंत , वरवंडी . ८ ( एखादा पदार्थ ) विद्युतजागृत करण्याचे , वीज भरण्याचे यंत्र ( यास स्पर्श केला असतां धक्का बसतो म्हणून हे नांव ). ९ धोका ; भय ; संकट . [ सं . धाक = आधार , धीर , खांब ; सिं . धकु , धिको ; हिं . धक्का ; गु . धक्को ; का . ]
-
पु. १ हिसका ; हिसडा ; आंचका . २ ( एका पदार्थाने दुसर्यावर केलेला ) आघात ; तडाखा ; प्रहार . ३ भयंकर दुःख इ० कानी हृदयाला भरणारी धडकी ; ऊर धडाडणे . मातेला धक्का बसला । लागे ती नित्य झुराया । - विक १८ . ४ संकट ; धोका ; भय . आधी गाजवावे तडाखे । तरि मग भूमंडळ धाके । ऐसे न होतां धक्के । राज्यास होती । - राजे संभाजीचरित्र ९ . ५ रस्त्याच्या कडेलोटाच्या बाजूने बांधलेली कठड्याची भिंत , वरवंडी . धक्क्याच्या भिंती सुक्या दगडाच्या बांधतात . - मॅरट ४४ . इतर अर्थी धका पहा . [ धका . ध्व . ]
-
dhakkā, dhakkī , and their compounds and derivatives See under धका.
Site Search
Input language: