Dictionaries | References

अड

   
Script: Devanagari
See also:  अडवा , अडवें

अड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
are numerous: nor, lastly, with formations from अडवा Cross. अडकाठी, अडकाष्ठा, अडकुडता, अडकुशीं, अडकूट or ड, अडखिळी, अडगांठ्या, अडगात, अडगात्या, अडघात, अडचावट, अडचोर, अडताळा, अडदिवस, अडपडदा, अडपदर or द्रा, अडपाट, अडफट, अडफांटा, अडफांट्या, अडबाजूचा, अडबाजूस, अडभिंत, अडमार्ग, अडमोरा, अडमोहरीं, अडरान, अडरानी, अडवण or अडवीण, अडवळण, अडवळणी, अडवाट, अडवाट्या, अडवेळ, अडसंधि, अडसर, अडसांठा. For these see, according to the explication of अड and आड afforded above, under आड.
Obstruction, impediment, hinderance. 2 Obstinacy, stubbornness, pertinacity: also restiveness. 3 Penalty or forfeit:--as attached to engagements. अडभरीं भरणें To revel or run riot in doggedness or piggishness; to indulge stubbornness.

अड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Obstruction. Obstinacy. Penalty.

अड     

पु ; हट्ट ; हेका ; अठ . ' त्याचा अड असा आहे . कीं , बोलाचाली झाली नसतां आधीं कोकटनुरांत व तेलसिंग्याचें ठाण्यांत आपले लोक आधी घ्यावे , मग बोलाचाली करणें ती करावी .' - पेद ११ . १२ . ( का . अटट )
 स्त्री. 
अ.  कमीपणा , उणेपणा , दुय्यमपणा , न्यूनता , गौणता दर्शविणारें उपपद . हें लागून कित्येक सामासिक शब्द बनतात ; जसें अडघोडा , अडधोतर ; अडलंड , अडसर . इ० . अडच्या ऐवजीं कधींकधीं आड असें रुप येतें सामान्यत : देशावरील लोक अड असें योजितात ; कोंकणांत आड असें वापरतात तेव्हां अड आणि आड यांनीं आरंभ होणारे शब्द एकमेकांत घुसडले जातात . त्याकरिता इष्ट शब्द एकाखालीं नसल्यास दुसर्‍याखालीं सांपडेल . सूचना :- संकृत अर्ध या शब्दापासून बनलेले व कानडी अड्ड ( = अडवा , हट्ट ; दुराग्रह ) या शब्दापासून बनलेले सामासिक शब्द यांचा घोंटाळा होऊं देऊं नये , म्हणून प्रथम अड - अर्ध पासून संभवलेले शब्द दिलेले आहेत ; नंतर कानडी अड्ड पासून साधलेले शब्द घेतले आहेत . कांहीं शब्द या दोन्ही वर्गांतहि पडतील ; पण ते कोंठेंतरी एका ठिकाणीं दिले आहेत . ज्यांचा संबंध या दोहों अडनीं नाहीं किंवा जे महत्त्वाचे वाटले , ते स्वतंत्रच दिले आहेत . [ सं . अर्ध ; प्रा . अड्ढ ].
आड पहा .
०कणी  स्त्री. तांदूळ , डाळ , इत्यादिकांची मोठी कणी ; प्रसंगविशेषीं ही तांदूळ - डाळींतहि मोडते ; फुटका , अर्धवट दाणा ; कणी . कापुरांचिआं भांजनियां । वाटौनि मौक्तिकांचिआं अडकणियां ॥ - शिशु ५९१ .
अडथळा ; अटकाव ; आडकाठी ; प्रतिबंध .
०काष्टा  पु. धोतर वगैरेचा आखुड किंवा अपुरा मुडपा , काष्टा . आडकाष्टा पहा .
दुराग्रह ; हट्ट ; हेका .
बोली ; अट ; शर्त वगैरे . इतर सर्व अर्थी अट पहा . [ का . अड - ड्ड = आड , अडविणें , अडवा येणें , अडथळा करणें , विरुध्द जाणें ( तुल० ) हिं . अड = भांडण ].
०कुडतें  न. लहान कुडतें ; कुडतें पहा .
०खंड  पु. तुकडा ; अर्धवट , अपुरा भाग . मालांत माती नसून अडखंड नसावेत . - मुंव्या २६ .
०कट   कंठ - पु . आडमार्ग ; आडवाट ; कठीण वाट . येई प्राणायामाचेनि अडकंठें । वरौता गा ॥ - ज्ञा ६ . ५५ . [ आड + कट = वाट , + कंठ ].
०कथा  स्त्री. 
०खप्या वि.  
अंगमेहनतीनें कांहीं कामें करुन पोट भरणारा मुलगा ; पोर्‍या .
उपकथा ; सहज , ओघानें आलेली गोष्ट ; प्रसंगोपात्तकथा . आतां असो हे आडकथा । दशरथा लागली अवस्था ॥ - कथा ३ . ३ . १६ .
विषयांतर ; अवांतर कथा ; आगंतुक गोष्ट .
किरकोळ काम करणारा नोकर ; आडाकाम्या ; बगल्या ; दुसर्‍याच्या हाताखालीं काम करणारा .
वाह्यात किंवा बाष्कळ भाषण .
०खोल  न. 
०कर वि.  
बांधून न काढलेली , सरासरी खणलेली विहीर ; रेताड जमीनींत खणलेली व न बांधलेली विहीर .
केरकचरा टाकण्याची विहीर , खड्डा ; होरलेली विहिर ; अर्धीच खणून टाकलेली विहीर .
हट्टी ; हेकेखोर ; अटखोर पहा .
अडून बसणारा ; अडेल -( घोडा )
०गडी  पु. कामकर्‍याच्या हाताखालचा गडी किंवा मजूर ; मदतनीस ; हस्तक ; अडखप्या .
०गांव  पु. न . लहान खेडेंगांव ; मोठी बाजार पेठ नसलेलें पण ज्याच्या जवळपास मोठे रहदारीचे रस्ते नाहींत असा भररस्त्यावर नसलेला गांव ; खेडें ; वाडी ; गांवढें गांव .
गच्च बसणारा ; कठीण ; जड ( कपडा इ० ). [ अड = अट + कर ].
०गोखमा   अडबाप्या ; पोरगा ; गोखमा पहा .
०काठी  स्त्री. आडकाठी पहा .
०काम  न. 
०गोण  स्त्री. बैल वगैरेवरुन वाहून नेतात ती धान्याची लहान गोणी .
दुसर्‍या कामाच्या आनुषंगिक काम ; मुख्य कामांत निघालेलें किरकोळ काम ; बारीक काम ; अडप झडप .
०घर  न. मुख्य घराजवळ बांधलेलें लहानसें घर किंवा छप्पर ; झोंपडें ; सोपा ; पडवी . आउट हौस
सडा , संमार्जन , भाजी चिरणें इत्यादि स्वयंपाकाच्या अंगभूत गौण कामें .
०घोडा  पु. लहान घोडा ; प्रसंग - विशेषीं मोठ्या घोड्याचेंहि काम करणारा घोडा ; तट्टू .
०जात   आडजात पहा .
०काम   काम्या - वि . अडकामाच्या , किरकोळ कामाच्या उपयोगी ; बारीक सारीक कामें करणारा .
०कूट  न. कुडण ; कुंपण ; कांपाउंड . आडकूट पहा . [ आड + कूट ].
०जिना  पु. दुसरा लहान जिना ; उपयोगानें कांहींसा नादुरुस्त झालेला . वापरलेला ; निरुपयोगी .
०खर्च  पु. संसारास नित्य लागणार्‍या अन्नवस्त्रादि जरुरीच्या मुख्य खर्चाखेरीज ( प्रसंगविशेषीं उद्भवणारा पानसुपारी , ख्यालीखुशाली वगैरे संबंधीं ) किरकोळ खर्च , किंवा जादा खर्च .
०जुना   जून - वि . अर्धवट जुना ; उपयोगानें कांहींसा नादुरुस्त झालेला . वापरलेला ; निरुपयोगी .
०खळ   खुळा खूळ - पु . स्त्री . न .
०दाणा  पु. घोड्यास खावयास हरभर्‍याव्यतिरिक्त , दिलेलें धान्य , दाणा ; ( घोड्याचा दाणा म्हणजे हरभरा ).
अडथळा ; अटकाव ; व्यत्यय ; अडचण ; अडगळ . ( क्रि० करणें , घालणें , लावणें ). कर्माकर्म अव्यक्तमूर्ती । कैशापरी अडखळ ॥ - भावि १४ . १५४ .
०दाळ  स्त्री. डाळीमधला मोठा किंवा जाडा चुरा ; अडकणी .
०धोतर  न. लहान धोतर किंवा मोठा पंचा . अडपंचा पहा .
ठेंच लागण्यासारखी , अडथळा होण्याजोगी जागा . [ अडखळणें ].
०खाणें   खाद खाद्य - न . जेवणाशिवाय फळफळावळ , मेवामिठाई , यांसारखें दुय्यम खाणें ; फराळ ; उपहार ; किरकोळ खाणें .
०नर  स्त्री. स्त्रीत्त्व नसणारी ; स्त्री - इंद्रिय असून ऋतु प्राप्त होत नाहीं अशी .
०खोर वि.  अडेल ; आग्रही ; हेकेखोर ; हट्टी ; अटखोर . गल्ली स्त्री . बारीक बोळ ; लहान गल्ली ; मोठ्या रस्त्याला फुटणारा लहान रस्ता ; चिवळ वाट .
०पंचा  पु. अगदीं लहान पंचा ;
०पडदणी  स्त्री. न्हातांना वेढून घेण्याची लहान पडदणी , वस्त्र ; जुनेर .
०गाळा  न. ( बे . ) बैलगाडीचा साटा . [ म . गाळा किंवा का . गळे = वेळू , बांबू ]
०गिराइक   गिर्‍हाइक गिराइकी - वि . दुकानदारापासून प्रत्यक्ष विकत न घेतलेला किंवा त्याला विकत न दिलेला .
०पन्हळ  पु. अडनळ पहा .
०पेठ  स्त्री. अडगांव ; छोटासा बाजारगांव .
०गिराइक   गिर्‍हाइक - पु . न . दुकानदारापासून प्रत्यक्ष विकत न घेणारा माणूस ; दुकानदार नसलेला ; बिनउदमी .
०फळें  न. अव . अटपळें पहा .
०गोष्ट   अडकथा पहा .
०बंदर  न. 
०ग्राईक   ग्राईकी ग्राहक ग्राहकी - अडगिराइक पहा .
लहान किंवा विशेष व्यापारी महत्त्व नसलेलें बंदर .
०तट्टू  पु. 
अडणारा , अडून राहणारा तट्टू ; अडेल तट्टू .
गलबतांना तात्पुरतें नांगरण्याला पुरेसें , लहान , किंवा सुरक्षित नसणारें बंदर .
( ल . ) अडून बसणारा ; तिरसटपणा , हेकेखोरपणा धरुन सरळ न वागणारा ; अडलंड पहा .
०बाप्या  पु. बालपण गेलें पण अजून बाप्या झाला नाहीं असा जवान पोर्‍या ; तरणा बांड ; सोळा सतरा वयाचा मुलगा ; प्रौढपणा न आलेला माणूस .
०ताळा  पु. 
०बायको  स्त्री. वधूटी ; नुकतीच वयांत आलेली मुलगी ( बारा - तेरा वर्षाची ); अर्धवट प्रौढ बायको .
०मुलगा  पु. मुलगा ; पोर्‍या ; छोकरा ; अडबाप्या .
अडथळा पहा . कांहींच सद्वक्तां नसे अडताळा ॥ - दावि ५ . [ अडथळा अप . ].
हिशेबाचा पडताळा . [ अड + ताळा ]. ( क्रि० घेणें , पाहणें ).
०म्हातारा  पु. म्हातारपणांत प्रवेश करणारा ; जरा उतार वयाचा माणूस ; मध्यमवयस्क .
०नळ  पु. 
०शहर  न. लहान शहर . देऊळ जवळच हांकेवर होतें . आडशहरांतलें तें , किती मोठें असणार ? - सुदे २४ .
रहाटगाडग्याच्या कोळंब्यापासून मोठ्या पन्हळापर्यंत पाणी जाण्यास घातलेला दोन्हीं तोंडें बंद असलेला व एका टोंकास खालच्या बाजूस पाणी पडण्यासाठीं भोंक असलेला लहान आडवा पन्हळ .
०सोंग  न. नाटकांतील दुय्यम किंवा हलका नट ; हलकें , गौण पात्र .
०स्वयंपाक   सैंपाक - पु . चटण्या , कोशिंबिरी , भाज्या वगैरे ; मुख्य पदार्थांखेरीज इतर किरकोळ स्वयंपाक .
दार लावतांना दारावर बसविण्याची चिमणी .
पाण्याचा पाट चालू रहावा म्हणून मध्यें घातलेला लहान पन्हळ .
०पसारा  पु. सटरफटर ; अडगळ ; फालतूक वस्तू . भिंत स्त्री . आडवी भिंत ; आडोसा . अडभिंत तेथ लुगडें आहे । - सप्र २ . १२ .
०मार्ग  पु. आडवाट .
०मिळकत   प्राप्ति - स्त्री . जादा मिळकत - नफा ; नेहमींच्या ठराविक प्राप्तीशिवाय मिळणारी अधिक मिळकत ; नेहमींच्या प्राप्तीच्या मार्गाशिवाय इतर मार्गानें होणारी मिळकत .
०रान  न. 
आडमार्ग ; एकीकडची जागा - स्थळ ; रस्त्यापासून दूरचा प्रदेश .
( ल० ) वावविवादप्रसंगी बोलण्याची , सरळ रीत सोडून धरलेली वांकडी रीत ; विषयांतर ; सरळ मार्ग सोडणें ; आडरान पहा .
०वळण   वळणी - न . राजरस्त्यांत नसलेला , एका बाजूस असणारा प्रदेश ; एकीकडचें , एकांत स्थळ . - वि . आडवळणांत असलेला ( गांव वगैरे ). - क्रिवि . मर्यादेपलीकडे ; एके बाजूस ; एकीकडे .
०सट्टा  पु. 
अजमास ; अंदाज ; बेत . ( क्रि०पाहणें ).
टप्पा ; पोहोंच ; धांव ; आवांका .
( खा . ) अडचण . [ हिं . अडसट्टा ; सिं . अठिसठो ; गु . अडसट्टो ].
०सट्ट्यांत   - ( व . ) अडचणींत येणें ; कचाट्यांत सांपडणें .
येणें   - ( व . ) अडचणींत येणें ; कचाट्यांत सांपडणें .
०सर  पु. आडसर पहा .

अड     

आड, आडवें पहा.

अड     

Shabda-Sagara | Sanskrit  English
अड   r. 1st cl. (अडति) To strive or endeavour. 5th cl. (अडोति) To occupy or possess, (peculiar to the Vedas.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP